नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमेच्या दिवशी (raksha bandhan) तुम्ही भावासाठी इतर कोणताही मेन्यू करा. पण गोड पदार्थात मात्र नारळी भात त्या दिवशी हमखास केलाच जातो. कारण नारळी भाताचे (narali bhat recipe) या दिवशी विशेष महत्त्व आहे. एरवी आपण कधी वर्षभर नारळीभात करत नाही. त्यामुळे आता या दिवशीच करायचा आहे, तर तो मस्त, चवदार झाला पाहिजे असा आपला आग्रह असतो. पण नेमकी गडबड होते आणि नारळीभात गचका होऊन जातो (Cooking tips for fluffy non sticky rice). असं होऊ नये आणि भात अगदी मोकळा शिजावा, यासाठी काय करायचं याच्या या काही खास टिप्स (How to Cook Perfectly Fluffy White Rice)
भात मोकळा शिजविण्यासाठी टिप्स
या टिप्स तुम्हाला फक्त नारळीभात करण्यासाठीच उपयुक्त ठरतील असे नाही. तर पुलाव, मसाला भात, बिर्याणी, शेजवान राईस, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे प्रकार करायचे असतील तरी या पद्धतीने तुम्ही भात शिजवू शकता.
पाय खूपच जाड दिसतात- मांड्यांवरची चरबी कमीच होत नाही? ३ व्यायाम, चरबी कमी- पायातली ताकदही वाढेल
अगदी हॉटेल सारखा दाणा- दाणा मोकळा असणारा भात शिजेल. त्यासाठी पुढच्या काही टिप्स लक्षात ठेवा.
१. सगळ्यात आधी तर आपल्याला जेवढे पाहिजे असतील तेवढे तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या आणि कमीत कमी अर्धा तास ते जास्तीत जास्त २ तास इतक्या वेळेसाठी ते पाण्यात भिजत घाला.
२. यानंतर कुकरमध्ये किंवा एखाद्या जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात पाणी तापायला ठेवा. आपण जेवढा तांदूळ घेतला असेल त्याच्या दुप्पट पाणी टाकावे. म्हणजेच एक कप तांदळासाठी दोन कप पाणी टाकावे.
राखीपौर्णिमेसाठी स्पेशल लूक मिळेल फक्त १५ मिनिटांत, ६ टिप्स- दिसाल कमाल सुंदर
३. पाण्याला उकळी येऊ लागली की मग त्याच्यात आपण भिजवलेला भात टाका. भात टाकला की मग त्यात चिमूटभर मीठ, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा तूप किंवा तेल टाकावे.
४. आता जेव्हा पातेल्यात तांदळाचे उडणे बंद होईल, त्यावेळेस गॅस बंद करावा. अशा वेळेस भात जवळपास ८० टक्के शिजला असेल असे बघावे.
गूळ घालून करा पौष्टिक नारळीभात, चव अशी भारी की नारळीपौर्णिमा होईल स्पेशल
५. आता शिजलेला भात पातेल्यात उरलेल्या पाण्यासह चाळणीत टाकावा. उरलेले पाणी काढून टाकावे आणि भात चाळणीत राहू द्यावा. त्यावर गार पाण्याचा शिपका मारावा. हॉटेल सारखा छान मोकळा मोकळा भात तयार होईल.