Lokmat Sakhi >Food > झटपट डाळिंब सोलण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, डाळींब चटकन सोलून पटकन खा !

झटपट डाळिंब सोलण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, डाळींब चटकन सोलून पटकन खा !

Fastest Way to Peel a Pomegranate : डाळिंब खायला सर्वांना आवडतात पण सोलायचं म्हंटलं की कुणी तयार नसतं, त्यासाठी खास झटपट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 03:55 PM2023-10-12T15:55:43+5:302023-10-12T15:56:40+5:30

Fastest Way to Peel a Pomegranate : डाळिंब खायला सर्वांना आवडतात पण सोलायचं म्हंटलं की कुणी तयार नसतं, त्यासाठी खास झटपट ट्रिक...

How to Cut a Pomegranate, Fastest Way to Peel a Pomegranate, Easy way to peel a pomegranate | झटपट डाळिंब सोलण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, डाळींब चटकन सोलून पटकन खा !

झटपट डाळिंब सोलण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, डाळींब चटकन सोलून पटकन खा !

सध्या लालचुटुक डाळिंबाचा सिजन सुरु असल्यामुळे सगळ्या बाजारपेठा या डाळिंबाने फुलून गेल्या आहेत. आतून बाहेरून भडक लाल रंगाचे असणारे हे डाळिंबाचे फळ दिसताना खूप सुंदर दिसते. परंतु ते सोलणे हे खूपच किचकट व वेळखाऊ काम असते. घरातील प्रत्येक व्यक्तीला लालचुटुक डाळिंबाचे दाणे खायला तर आवडतात पण ते सोलण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. आयते सोलून दिलेले डाळिंबाचे दाणे पटापट खाऊन फस्त करताना मिनिटही लागत नाही. डाळिंब सोलताना सर्वात आधी त्यावरची जाड व थोडीशी कठीण असणारी साल काढून घ्यावी लागते. मग अलगद हाताने आतील दाणे काढून घ्यावे लागतात(How do you peel a pomegranate easily?).

डाळिंब सोलताना किंवा कापताना ते एका विशेष पद्धतीने सोलणंच (How To Peel a Pomegranate The Fast Way) गरजेचं असत, नाहीतर आतील दाणे कुस्करले जातात. डाळिंब सोलताना (Quick & Easy Way to Peel Pomegranate) काहीवेळा त्याच्या आतील दाणे इकडे - तिकडे उडून वाया जातात. याचबरोबर घरात डाळिंब आणलेली दिसली की ती कधी एकदा खातो असं होत. पण ती सोलून, दाणे काढून कोण देणार याची वाट पाहिली जाते. अशातच काहीवेळा विकत आणलेली ही डाळिंब आठवडाभर (Easiest Way to Cut Open Pomegranate in 2 MIN) तशीच पडून राहतात. डाळिंब दीर्घकाळासाठी तसेच ठेवून दिल्यावर त्याची साल जाड व कठीण होऊन ते सहजरित्या कापले जात नाही. अशावेळी आपण २ सोप्या ट्रिक्सचा वापर करुन हे डाळिंब झटपट सोलून खाऊ शकतो. शेफ कुणाल कपूर व मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी डाळिंब सोलण्याच्या काही ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या पाहूयात(Easy way to peel a pomegranate).

डाळिंब सोलण्याच्या २ ट्रिक्स... 

ट्रिक १ : - 

१. डाळिंब कापताना सर्वातआधी ते एका सपाट पृष्ठभागावर आडवे ठेवून त्याचा देटाकडील भाग कापून घ्यावा. 
२. त्यानंतर कापलेल्या भागापासून उभे खालपर्यंत त्याचे चार भाग करुन घ्यावेत. 
३. डाळिंबाचे देट कापल्यानंतर आपल्याला ४ लाईन्स दिसतील या लाईन्सना फॉलो करुनच त्याचे उभे तुकडे करावेत. 

नवरात्र स्पेशल : साबुदाण्याची खिचडी - वडे नकोसे वाटतात ? ट्राय करा उपवासाची मऊ, जाळीदार इडली, झटपट रेसिपी...

४. हे तुकडे केल्यानंतर डाळिंबाचा आकार एखाद्या फुललेल्या फुलाप्रमाणे दिसेल. 
५. त्यानंतर अलगद हातांनी डाळिंबाचे दाणे काढून ते थंड पाण्यांत ठेवावेत. 
६. डाळिंबाचे दाणे पाण्यांत घातल्याने ताच्या आतील जी पांढरी साल असते ती पाण्यावर आपोआप तरंगू लागते. जेणेकरून आपण अतिशय सोप्या पद्धतीने ही पांढरी साल दाण्यांपासून वेगळी करु शकतो. 

गाजर न किसता अगदी १० मिनिटांत करा टेस्टी झटपट गाजर हलवा, जिभेवर ठेवताच अलगद विरघळेल असा स्वाद...

ट्रिक २ :- 

१. डाळींबाच्या पुढचे आणि मागचे देट सुरीच्या मदतीने कापून घ्यावे.  
२. त्यानंतर सुरीने डाळींबाच्या ४ उभ्या फोडी करुन घ्याव्यात. 
३. या फोडी एका बाऊलमध्ये उलट्या करुन त्यावर सुरीच्या मागच्या भागाने मारायचे. 

कारवार स्पेशल रवा थालीपीठ करण्याची पारंपरिक रेसिपी, फक्त १० मिनिटांत करा मस्त खमंग थालीपीठ...


४. यामुळे दाणे पटापटा खाली पडतात आणि डाळींब झटपट सोलले जाते. 
५. या उपायामुळे अगदी सोप्या पद्धतीने हे डाळींब सोलले जाऊन किचकट काम अगदी मिनिटभरात होते.

मेथीची भाजी, पराठे तर रोजच खातो, अस्सल गावरान ठसक्याच्या मेथी झुणक्याची सोपी रेसिपी...चव चाखून तर पहा...

Web Title: How to Cut a Pomegranate, Fastest Way to Peel a Pomegranate, Easy way to peel a pomegranate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.