उन्हाळ्यात आपण कलिंगड, टरबूज अशी फळं अधिक जास्त प्रमाणांत खातो. उन्हाळ्याचा सिझन अगदी संपेपर्यंत आपण कलिंगड विकत आणतोच. मस्त लालचुटुक, गोड, रसाळ कलिंगड (Stop Cutting Watermelon Wrong Here's the Right Way) खायला सगळ्यांना आवडतं. परंतु हेच भलंमोठं कलिंगड कापायचं काम अनेकांना कंटाळवाणेच वाटते. कलिंगड खायला जितकं सोपं आहे, तितकंच कापायला अवघड आणि किचकट काम आहे. हे मोठाले कलिंगड कापून त्याचे काप (How to cut WATERMELON without seeds) करणं, त्यानंतर त्याच्या आतील लालचुटुक भाग सालीपासून वेगळा करणं, मग त्याचे लहान लहान तुकडे करणं, बिया काढणे अशी खूप मोठी किचकट प्रक्रिया असते(Quick and Mess-free Way to Cut Watermelon).
एवढेच नव्हे तर कलिंगड कापताना त्याचा रस गळून ओटा, हात चिकट होतात. यासाठीच कलिंगड कापताना त्याचा फार पसारा होऊ नये. याचबरोबर, हे किचकट, वेळखाऊ काम अगदी सहजसोप्या पद्धतीने करता यावे म्हणून कलिंगड कापण्याची ही सोपी ट्रिक पाहूयात. कलिंगड कापण्याची ही ट्रिक फॉलो केल्याने ते सहज आणि पटकन कापले जाईल तसेच ते खाणं देखील सोपं जाईल.
कलिंगड मिनिटभरात कापणे होईल सहज सोपे...
सगळ्यात आधी कलिंगड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. याचबरोबर कलिंगड कापण्यासाठी नेहमी धारदार चाकू किंवा सुरीचा वापर करावा. बोथट किंवा कमी धार असलेल्या सुरीने कलिंगड कापणे अधिक अवघड होते तसेच यात बराच वेळ देखील जातो. indian_bawarchi या इंस्टाग्राम पेजवरुन कलिंगड कापण्याची ही भन्नाट ट्रिक शेअर करण्यात आली आहे.
वर्षभर प्या गारेगार आंबटगोड पन्हं! अस्सल मराठी चवीचं कैरी ‘पन्हं प्रिमिक्स’ करा १० मिनिटांत...
न कापता, चाकू-सुरी न वापरता खरबूज-टरबूज चिरा, पाहा ‘हे’ भन्नाट फ्रुट कटर...
सर्वातआधी सुरीच्या मदतीने कलिंगड बरोबर मध्यभागी उभे कापून त्याचे दोन भाग करून घ्यावेत. कलिंगडाचे दोन भाग कापून झाल्यानंतर त्यातील एक भाग पालथा ठेवून द्या. म्हणजेच लाल भाग खालच्या बाजूला येईल अशा पद्धतीने कलिंगड ठेवा. त्यानंतर कलिंगड आडवे धरून १ ते २ इंचाचे स्लाइस किंवा लांब आकाराचे काप कापून घ्यावेत.
कलिंगडाचे स्लाइस करुन झाल्यावर सगळे स्लाइस दोन्ही हातांनी एकत्रित धरून कलिंगड उभ्या आकारात येईल असे फिरवून घ्यावे. मग या कलिंगडाचे पुन्हा उभे काप करून घ्यावेत. असे केल्यानंतर तुम्हाला कलिंगडाचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे झालेले दिसतील. आता हा एक एक तुकडा उचलून आपण अगदी सहज पद्धतीने कलिंगड खाऊ शकता.
अशा पद्धतीने कलिंगड खाताना त्याची सालं वेगळी काढत बसण्याची गरज लागत नाही. तसेच अगदी सहज खाता येतील असे लहान लहान तुकडे तुमच्यासमोर तयार असल्याने ते पटकन खाणं सोपं जाईल. तसेच खाताना फारसा रस देखील गळणार नाही. परिणामी, हात, फरशी चिकट होणार नाही. या ट्रिकमुळे फारसा पसारा न होता कलिंगड अगदी सहज कापता येऊ शकते.