Lokmat Sakhi >Food > कांदा चिरण्याची ही युनिक ट्रिक पाहिली का? सुरीचा वापर न करता, डोळ्यात पाणी न आणता चिरा बारीक कांदा

कांदा चिरण्याची ही युनिक ट्रिक पाहिली का? सुरीचा वापर न करता, डोळ्यात पाणी न आणता चिरा बारीक कांदा

How to Cut Onions Without Crying and Knife : काही सेकंदात सुरीशिवाय चिरून होईल कांदा-फक्त ही ट्रिक एकदा पाहाच., काम होईल सोपं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2023 11:02 AM2023-12-11T11:02:55+5:302023-12-11T11:05:02+5:30

How to Cut Onions Without Crying and Knife : काही सेकंदात सुरीशिवाय चिरून होईल कांदा-फक्त ही ट्रिक एकदा पाहाच., काम होईल सोपं..

How to Cut Onions Without Crying and Knife | कांदा चिरण्याची ही युनिक ट्रिक पाहिली का? सुरीचा वापर न करता, डोळ्यात पाणी न आणता चिरा बारीक कांदा

कांदा चिरण्याची ही युनिक ट्रिक पाहिली का? सुरीचा वापर न करता, डोळ्यात पाणी न आणता चिरा बारीक कांदा

भाजी, आमटीला फोडणी देण्यासाठी कांद्याचा (Onion) वापर होतोच. कांद्यामुळे पदार्थाची चव वाढते. फोडणीत बारीक किंवा जाडसर कांदा चिरण्यात येतो. पावभाजी, मिसळ किंवा भाजीसोबत कच्चा कांदा खाण्याची अनेकांना सवय असते. पण या पदार्थांसोबत कांदा बारीक चिरलेलाच लागतो. कारण या पदार्थांवर जाडसर चिरलेला कांदा शोभत नाही. कांदा लांब, गोल, जाडसर किंवा बारीक आकारामध्ये चिरला जातो (Cooking Tips). पण सुरीने चिरताना कधी बोटाला इजा होते, शिवाय डोळ्यातून पाणी येतं ते वेगळंच.

जर आपल्याला डोळ्यात पाणी न येता, सुरीचा वापर न करत, कांदा चिरायचा असेल तर, ही ट्रिक नक्कीच आपल्याला मदत करेल (Kitchen Tips). या हटके ट्रिकमुळे सुरीविना कांदा झटपट चिरला जाईल, शिवाय चिरताना डोळ्यातून पाणीही येणार नाही(How to Cut Onions Without Crying and Knife).

ना बेसन-ना पाण्याचा एकही थेंब, पाहा कुरकुरीत कोथिंबीर वडी करण्याची नवी पद्धत-जिभेची चव वाढेल

सुरीशिवाय चिरा कांदा

कांदा चिरण्यासाठी सर्वप्रथम मधोमध त्याचे दोन भाग करा. नंतर कांद्याची साल काढून घ्या. कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये असे वाटत असेल तर, एका बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात चाळण ठेवा. चाळणी पाण्यात बुडेल अशी ठेवा. चाळणीवर अर्धा चिरलेला कांदा ठेवा. थोड्यावेळानंतर कांदा चाळणीमधून काढून घ्या.

पातेल्यात मऊ-मोकळा भात झटपट शिजवण्याची १ सोपी ट्रिक, प्रेशर कुकरमध्ये भात लावण्याची गरजच नाही

जर आपल्याला सुरीचा वापर करायचा नसेल तर, बटाटा पीलरचा वापर करा. पीलरचा वापर आपण बटाटा, सफरचंद, काकडी किंवा इतर गोष्टी सोलण्यासाठी करतो. याच्या वापराने कांदा सहज बारीक चिरला जाऊ शकतो. यासाठी अर्धा कापलेला कांदा घ्या, व बटाटा ज्याप्रमाणे सोलतो, त्याचप्रमाणे कांदा लांबट आकारामध्ये चिरून घ्या. या टीपमुळे कांदा झटपट चिरला जाईल. शिवाय चिरताना डोळ्यात पाणीही येणार नाही.

 

Web Title: How to Cut Onions Without Crying and Knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.