Join us  

१० माणसांचा पुरणावरणाचा स्वयंपाक करा फक्त एका तासात! ‘अशी’ तयारी करा, स्वयंपाकाचं टेंशनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2023 1:46 PM

Cooking Tips For Puranpoli: पुरणाचा स्वयंपाक अगदी झटपट करायचा असेल तर अशी काही तयारी करून ठेवा...(How to do puran poli swayampak quickly?)

ठळक मुद्देआदल्या दिवशी रात्रीच जर अशी सगळी तयारी करून ठेवली तर अगदी ८- १० माणसांचा पुरणावरणाचा स्वयंपाक अगदी तासाभरातच करू शकाल

पुरणाचा स्वयंपाक करायचा म्हटलं की अनेकींना खूप टेन्शन येतं. त्यातही पाहूणे जेवायला येणार असतात. त्यामुळे सगळं वेळेवर होईल का, पटापट सगळं जमेल का, असं अनेकींना वाटतं. पुरणाच्या स्वयंपाकात दोन भाज्या, चटणी, कोशिंबीर, भात वरण, कटाची आमटी किंवा कढी, भजे आणि पुरणपोळ्या असं सगळं असतं. आता हे सगळं करायचं असेल तर काय पुर्वतयारी करून ठेवायची ते आता पाहूया (How to do preparation for puran poli swayampak?). आदल्या दिवशी रात्रीच जर अशी सगळी तयारी करून ठेवली तर अगदी ८- १० माणसांचा पुरणावरणाचा स्वयंपाक अगदी तासाभरातच करू शकाल (How to do puran poli swayampak quickly?). 

 

पुरणावरणाच्या स्वयंपाकाची तयारी कशी करावी?

१. पुरणाचा स्वयंपाक करायचा म्हटलं की भरपूर भांडी लागतात. त्यामुळे ३ ते ४ कढया, पळी, चमचे, ३- ४ पातेले, चाकू, विळी. कुकर, कुकरचे डबे अशी सगळी भांडी ओट्यावर एका कोपऱ्यात ठेवून द्या.

दोन हजारांची महागडी साडी तुम्ही किती वेळा नेसता? - सुधा मुर्ती सांगतात बचतीचा सोपा मंत्र

तसेच हात पुसायला, भांडे पुसायला २ नॅपकिनही शेजारी ठेवून द्या.

 

२. पुरणाच्या स्वयंपाकाला दोन भाज्या, कोशिंबीर असं सगळं लागतं. त्यामुळे ज्या भाज्या करायच्या आहेत, त्या रात्रीच धुवून, पुसून कोरड्या करून ठेवा.

कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका

त्यासोबतच थोड्या जास्तीच्या मिरच्या, टोमॅटो, कोशिंबीरीसाठी काकडी, गाजर असं सगळं धुवून स्वच्छ करून ठेवा. पालेभाजी, कोथिंबीर निवडून ठेवा. तसेच खोबऱ्याचा किस करून ठेवा. फोडभाजी किती करणार आहात तेवढीच एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवा.

 

३. किती लोक जेवणार आहेत, ते पाहून आपल्याला वरण भातासाठी डाळ- तांदुळाचा अंदाज आलेला असतो.

घटस्थापना करताना ऐनवेळी धावपळ नको, पूजेची तयारी करताना ४ टिप्स लक्षात ठेवा, निवांत करा पूजा

त्यामुळे तेवढे डाळ- तांदूळ आदल्या दिवशीच कुकरच्या डब्यात काढून ठेवा. एका भांड्यात कणिक, पुरणासाठी लागणारी डाळ, भज्यासाठी लागणारं बेसन पीठ, धने- जीरे पूड, दाण्याचा कूट असं सगळं काढून ठेवा. अशी सगळी तयारी करून ठेवलेली असली की मग बघा कसा झटपट पुरणाचा स्वयंपाक होऊन जातो.

 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३अन्नपाककृती