Lokmat Sakhi >Food > टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याच्या ३ सिक्रेट टिप्स, फक्कड चहा पिऊन लगेच व्हाल फ्रेश

टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याच्या ३ सिक्रेट टिप्स, फक्कड चहा पिऊन लगेच व्हाल फ्रेश

Secret Tips For Making Super Tasty Tea: घरच्या चहाला टपरीसारखी कडक- फक्कड चव पाहिजे असेल तर चहा करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2024 04:45 PM2024-05-27T16:45:16+5:302024-05-27T16:46:28+5:30

Secret Tips For Making Super Tasty Tea: घरच्या चहाला टपरीसारखी कडक- फक्कड चव पाहिजे असेल तर चहा करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा...

How to do tea with perfect strong taste, how to make perfect tea at home, 3 secret tips for making super tasty tea | टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याच्या ३ सिक्रेट टिप्स, फक्कड चहा पिऊन लगेच व्हाल फ्रेश

टपरीवर मिळतो तसा कडक चहा करण्याच्या ३ सिक्रेट टिप्स, फक्कड चहा पिऊन लगेच व्हाल फ्रेश

Highlightsहे तिन्ही उपाय करून चहा केलात तर मग बघा तुमच्या चहाला कशी फक्कड चव येते... 

चहा म्हणजे अनेकांसाठी एनर्जीचा डोस आहे. हा डोस घेतला की त्यांना कशी काम करण्याची तरतरी येते, एखादी गोष्टी करण्याची बळ येतं. डोकं मोकळं होऊन अगदी फ्रेश- फ्रेश वाटू लागतं. पण हा एनर्जीचा डोस तेव्हाच जमून येतो जेव्हा चहा अगदी कडक होतो... काही वेळा घरच्या चहापेक्षा टपरीवरचा अधिक आवडतो. कारण तो एकच घोट प्यायला तरी कसं मस्त वाटतं (3 secret tips for making super tasty tea). मग घरच्या चहाला टपरीवरच्या चहासारखा कडकपणा का येत नाही, असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. आता त्याच तर प्रश्नाचं हे सोपं उत्तर बघा..(How to do tea with perfect strong taste?)

टपरीसारखा कडक, फक्कड चहा घरच्याघरी करण्याचा उपाय

 

१. मसाल्यांचा वापर

आपण घरच्या चहामध्ये कधी फक्त आलंच टाकतो तर कधी घरात तयार करून ठेवलेला चहा मसाला टाकतो.

 

सीटचा भाग खूपच वाढला? आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगतेय व्यायाम, बेढब शरीराला येईल आकार

पण टपरीवर जो चहा मिळतो, त्यासाठी ते लोक कोणताही मसाला तयार करून ठेवत नाहीत. ते रोजचा रोज ताजा मसाला करून घेतात. तसा मसाला घरी करण्यासाठी वेलची, दालचिनी हे दोनच मुख्य मसाले थोडे कुटून घ्या आणि त्याला फक्त ताज्या आल्याची जोड द्या..

 

२. चहा चांगला उकळू द्या

आपण घरचा चहा अगदी फटाफट करून मोकळे होतो. त्यामुळे मसाल्यांचा स्वाद चहाला म्हणावा तसा येत नाही.

यामी गौतमच्या आवडीचा 'चंबा का राजमा'- बघा हिमाचल प्रदेशची खास रेसिपी, चव घेताच म्हणाल आहाहा....

त्यामुळे चहा करण्यासाठी जे पाणी गॅसवर गरम करायला ठेवाल त्यात आधी मसाले, आलं टाकून ते १० ते १२ मिनिटे चांगलं उकळून घ्या. त्यानंतर त्यात चहा पावडर टाकून ती ५ मिनिटे उकळून घ्या आणि नंतर दूध घाला. बघा चहाला मसाल्यांचा कसा छान सुवास येईल...

 

३. निरसे दूध वापरा

आपण चहा करण्यासाठी जे दूध वापरतो ते तापवून घेतलेलं असतं. त्याची साय आपण काढून घेतलेली असते.

आलिया भट सांगतेय लेकीला ‘बेबी बी काईंड!’ छानछान गोष्टी सांगून मुलीला वळण लावणाऱ्या पुस्तकाची ओळख

पण टपरीवर जो चहा केला जातो, त्यासाठी निरसे म्हणजे कच्चे, न उकळलेले दूध वापरतात. तुम्हीही घरच्या चहाला निरसे दूध घालून पाहा. चहा घट्ट आणि जास्त चवदार होईल. हे तिन्ही उपाय करून चहा केलात तर मग बघा तुमच्या चहाला कशी फक्कड चव येते... 

 

Web Title: How to do tea with perfect strong taste, how to make perfect tea at home, 3 secret tips for making super tasty tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.