Lokmat Sakhi >Food > कोथिंबीर स्वस्त झाली तर जास्तीची साठवून ठेवता येईल का? पाहा झटपट सोपी ट्रिक...

कोथिंबीर स्वस्त झाली तर जास्तीची साठवून ठेवता येईल का? पाहा झटपट सोपी ट्रिक...

How To Dry & Store Fresh Coriander For A Year : झटपट निवडून स्टोअर केलेली कोथिंबीर आपण आपल्याला हवी तशी हवी तेव्हा वापरु शकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2023 01:17 PM2023-03-08T13:17:33+5:302023-03-08T13:37:33+5:30

How To Dry & Store Fresh Coriander For A Year : झटपट निवडून स्टोअर केलेली कोथिंबीर आपण आपल्याला हवी तशी हवी तेव्हा वापरु शकता.

How To Dry & Store Fresh Coriander For A Year | कोथिंबीर स्वस्त झाली तर जास्तीची साठवून ठेवता येईल का? पाहा झटपट सोपी ट्रिक...

कोथिंबीर स्वस्त झाली तर जास्तीची साठवून ठेवता येईल का? पाहा झटपट सोपी ट्रिक...

'कोथिंबीर' हा आपल्या रोजच्या स्वयंपाकातील एक अविभाज्य घटक आहे. एखादी डिश बनवून पूर्ण तयार झाली की, त्यावर कोथिंबीर भुरभुरवून घातल्याशिवाय त्या पदार्थाला हवी तशी चव येत नाही. कोथिंबीरच्या पानांमध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक असतात. कोथिंबीरीच्‍या विशिष्ट्य स्‍वादयुक्‍त पानांमुळे इतर भाज्‍यांचा स्‍वाद वाढविण्‍यासाठी पदार्थामध्‍ये कोथिंबीरीचा वापर करण्‍यात येतो. कोथिंबीरीच्‍या वडया, चटणी असे अनेक पदार्थ लोकप्रिय आहे. कोथिंबीरीच्‍या विशिष्ट्य स्‍वादयुक्‍त पानांसाठी कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते. कोणत्याही पदार्थाची चव अधिक स्वादिष्ट्य करण्यासाठी त्यात कोथिंबीर आवर्जून घातली जाते. 

सध्या बाजारांत बारमही हिरवीगार कोथिंबीर विकत मिळतेच. परंतु काहीवेळा ही कोथिंबीर फारच महाग दरांत विकली जाते. अशावेळी, जेव्हा कोथिंबीरीचे दर फार कमी असतात तेव्हा ती व्यवस्थित स्टोअर करुन ठेवू शकतो. आपण बाजारांतून कोथिंबीर विकत आणतो. काहीवेळा कोथिंबीर स्वस्त किंवा कधी खूपच महाग मिळते. कधी कधी कामाच्या गडबडीत आपल्याला कोथिंबीर निवडून ठेवायला वेळ नसतो. अशावेळी आपण एक सोपी ट्रिक वापरुन कोथिंबीर वर्षभर स्टोअर करुन ठेवू शकता. झटपट निवडून स्टोअर केलेली कोथिंबीर आपण आपल्याला हवी तशी हवी तेव्हा वापरु शकता(How To Dry & Store Fresh Coriander For A Year). 

कोथिंबीर स्टोअर करून ठेवण्याची सोपी ट्रिक :- 

१. सर्वप्रथम बाजारांतून विकत आणलेली कोथिंबीर निवडून घ्यावी. या कोथिंबीरीचे देठ व त्याची पाने वेगळी काढून ती निवडून घ्यावी. 
२. आता कोथिंबीर निवडून त्याची पाने एका मोठ्या चाळणीत घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. 
३. आता थोडा वेळ कोथिंबीर तशीच चाळणीत ठेवून त्यातील पाणी निथळून जाऊ द्यात. 
४. जास्तीचे पाणी निथळून घेतलेली कोथिंबीर एका सुती किंवा कॉटनच्या कापडावर पसरवून संपूर्णपणे वाळवून घ्यावी. 

५. कोथिंबीर संपूर्णपणे वाळल्यानंतर ती बारीक चिरुन घ्यावी. 
६. आता एका मोठ्या डिशमध्ये किंवा ताटामध्ये ही कोथिंबीर पसरवून घ्यावी. 
७. ताटांमध्ये पसरवून ठेवलेली कोथिंबीर उन्हांत किमान ३ ते ४ दिवस संपूर्ण कोरडी होईपर्यंत सुकवून घ्यावी. 
८. आता ही वाळलेली कोथिंबीर एका बरणीत भरुन स्टोअर करुन ठेवावी. 

 वाळलेली कोथिंबीर बरणीत व्यवस्थित स्टोअर करुन ठेवल्यास वर्षभर आपल्याला हवी तेव्हा वापरता येते. 


 

झटपट कोथिंबीर निवडण्याची सोपी ट्रिक : -

विविध पदार्थांमध्ये कोथिंबीर घालून किंवा वरुन भुरभुरवून आपल्याला मुख्य पदार्थांची चव अधिक सुंदर करता येते. परंतु कोथिंबीर निवडणे हे तितकेच कंटाळवाणे काम आहे. कोथिंबीर निवडण्यासाठी भरपूर वेळ जातो. अशावेळी एक सोपी ट्रिक वापरून आपण झटपट कोथिंबीर निवडू शकतो. 

१. एक मोठी किसणी घेऊन त्या किसणीच्या छिद्रांतून कोथिंबिरीची एक काडी घालावी. 

२. छिद्रांतून कोथिंबिरीची काडी घाल्यानंतर छिद्रांच्या दुसऱ्या बाजूने ती कोथिंबिरीची काडी खेचावी. 

३. असे केल्याने कोथिंबिरीचा देठ वेगळा व पान वेगळी निवडून होतील. 

ही सोपी ट्रिक वापरून आपण झटपट कोथिंबीर निवडू शकतो.

Web Title: How To Dry & Store Fresh Coriander For A Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.