Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात इडलीचे पीठ आंबत नाही? ३ टिप्स, सोडा न घालताही पीठ फुलेल भरभर, इडल्या होतील हलक्या...

हिवाळ्यात इडलीचे पीठ आंबत नाही? ३ टिप्स, सोडा न घालताही पीठ फुलेल भरभर, इडल्या होतील हलक्या...

TIPS AND TRICKS FOR MAKING IDLI BATTER SOFT AND FLUFFY : How to make Soft Idli batter : Perfectly Ferment Idli Dosa Batter in winter : Idli Batter Fermentation tips & tricks in winter : थंडीच्या दिवसांत इडलीचे पीठ पाहिजे तसे फुगत नाही, नक्की ट्राय करुन पाहा ३ टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2024 03:32 PM2024-11-25T15:32:36+5:302024-11-25T15:33:32+5:30

TIPS AND TRICKS FOR MAKING IDLI BATTER SOFT AND FLUFFY : How to make Soft Idli batter : Perfectly Ferment Idli Dosa Batter in winter : Idli Batter Fermentation tips & tricks in winter : थंडीच्या दिवसांत इडलीचे पीठ पाहिजे तसे फुगत नाही, नक्की ट्राय करुन पाहा ३ टिप्स...

How to Ferment Idli Dosa Batter in Winter Perfectly Ferment Idli Dosa Batter in winter Idli Batter Fermentation tips and tricks in winter | हिवाळ्यात इडलीचे पीठ आंबत नाही? ३ टिप्स, सोडा न घालताही पीठ फुलेल भरभर, इडल्या होतील हलक्या...

हिवाळ्यात इडलीचे पीठ आंबत नाही? ३ टिप्स, सोडा न घालताही पीठ फुलेल भरभर, इडल्या होतील हलक्या...

आपल्याकडे नाश्त्याला बरेचदा इडली, डोसा, मेदू वडा, उत्तपा असे साऊथ इंडियन पदार्थ आवडीने खाल्ले जातात. कधी आपण हे पदार्थ कुठल्या उडप्याकडून आणतो तर कधी घरीच बनवून खातो. इडली दिसायला पांढऱ्या शुभ्र रंगाची खाण्यासाठी मऊ आणि पचण्यासाठी हलकी असते. उडीद डाळ, तांदूळ भिजवून, बारीक वाटून, आंबवून इडली बनविली जाते(Perfectly Ferment Idli Dosa Batter in winter).

इडली हा असा पदार्थ आहे की तो योग्य पद्धतीने फुलून आला तरच खायला मजा येते. फुगलेली, मऊ, टम्म इडली खाण्यात जो आनंद आहे तो इतर कशातच नाही. इडली, डोसा हे पदार्थ बनवायचे म्हणजे त्याचे पीठ व्यवस्थित तयार करण्यापासून ते इडली, डोसा बनवून होईपर्यंत खूप मोठा टास्क एखाद्या गृहिणींपुढे असतो. इडली, डोशाचे पीठ तयार करताना त्यात डाळ व तांदूळ यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे. नाहीतर काहीवेळा हे पीठ फसू शकते. शक्यतो हिवाळ्यात वातावरणातील गारव्यामुळे काहीवेळा इडलीचे पीठ (Soft & Fluffy Idly) हवे तसे फुलून येत नाही. इडलीचे पीठ फुलून आले नाही तर अशा पिठाचा काहीच उपयोग होत नाही.  एकदा का इडलीचे पीठ फसले तर आपल्या मनासारख्या इडल्या तयार होत नाहीत. मग या न फुगलेल्या दडदडीत इडल्या खायला नकोशा वाटतात. इडल्या व्यवस्थित फुगून येण्यासाठी हिवाळ्यात इडलीचे पीठ तयार करताना लक्षात ठेवा काही महत्वाच्या टिप्स. या टिप्स वापरुन आपण ऐन हिवाळ्यातही सोड्याचा वापर न करता इडलीचे पीठ हवे तसे फुलवून आणू शकतो( Idli Batter Fermentation tips & tricks in winter).

हिवाळ्यात इडलीचे पीठ फुलून येत नाही तर करा हे ३ उपाय... 

१. डाळ - तांदूळ भिजवलेले पाणी फेकून न देता त्याचा असा करा वापर :- इडलीचे बॅटर तयार करण्यासाठी सर्वात आधी डाळ, तांदूळ भिजत घालावे लागतात.  डाळ - तांदूळ व्यवस्थित ६ ते ७ तास पाण्यांत भिजत ठेवावेत. त्यानंतर डाळ - तांदूळ मिक्सरला लावून वाटून त्याचे जाडसर घट्ट बॅटर तयार करावे लागते. शक्यतो बरेचजण डाळ - तांदूळ भिजवलेले पाणी फेकून देतात परंतु असे न करता डाळ - तांदूळ वाटताना याच पाण्याचा वापर करावा. डाळ - तांदूळ भिजवलेल्या पाण्यांत बॅटर फर्मेंटेशनसाठी आवश्यक असणारे बुडबुडे तयार झालेले असतात. त्यामुळे इडलीचे बॅटर चांगले फुलून येण्यास अधिक मदत होते. त्यामुळे डाळ - तांदूळ भिजवलेले पाणी फेकून देता मिक्सरमध्ये बॅटर वाटताना याच पाण्याचा वापर करावा. यामुळे पीठ कमी वेळात दुप्पट फुलून येण्यास अधिक मदत होते. 

२. ब्रेड स्लाइस वापरा :- इडलीचे बॅटर चांगले फुलून येण्यासाठी आपण ब्रेड स्लाइसचा वापर करु शकता. यासाठी भिजवलेले डाळ - तांदूळ वाटून घेताना मिक्सरमध्ये ब्रेडच्या कडा काढून घेतलेला एक ब्रेड स्लाइस घालावा. यामुळे इडलीचे पीठ फुलून येण्यास अधिक मदत होते. 

३. पिठामध्ये घाला कांद्याचा तुकडा :- हिवाळ्यात गारव्याने इडलीचे बॅटर पाहिजे तसे फुलून येत नाही. यामुळे इडल्या व्यवस्थित होत नाहीत. अशावेळी वाटून तयार झालेल्या इडली बॅटरमध्ये कांद्याचा एक छोटासा तुकडा घालावा. त्यानंतर हे बॅटर झाकण ठेवून ६ ते ८ तासांसाठी झाकून ठेवावे. बॅटरमध्ये कांद्याचा वापर केल्याने इडलीचे पीठ ऐन थंडीतही दुपटीने फुगून येते. 

हिवाळ्यात लोणी लवकर निघत नाही? करा फक्त ३ गोष्टी- झटपट निघेल लोणी-तूपही भरपूर रवाळ...


खवलेलं नारळ फ्रिजमध्ये ठेवलं तरी सुकतंच? ‘हा’ पदार्थ कालवून ठेवा, खवट न होता टिकेल खूप दिवस...

लक्षात ठेवा इतरही टिप्स... 

१. इडल्या नीट फुगून न येता कडक किंवा दडदडीत, जाड होत असतील तर इडली बॅटर तयार करताना त्यात एक वाटी भिजवलेले पोहे घालावेत. या भिजवलेल्या पोह्यांमुळे इडल्या फुगून येण्यास मदत होते.   

२. इडल्या फुगून येण्यासाठी इडली बॅटर तयार करताना त्यात एक वाटी शिजवलेला भात घालावा म्हणजे इडल्या पाहिजे तशा फुलून येतात.  

 उडूपी सांबार मसाला करण्याची खास रेसिपी- झटपट आणि घरगुती! विसरुन जाल विकतचे मसाले कायमचे...

३. इडलीच्या बॅटरमध्ये टेबल सॉल्ट ऐवजी रॉक सॉल्ट वापरा. कारण त्यामुळे इडलीच्या आंबण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा येणार नाही. तुम्ही इडलीचे बॅटर तयार करताना अथवा ते आंबल्यावर असं कधीही मीठ त्यात टाकू शकता. थंडीत फर्मेटेशनची प्रकिया उशीरा होत असल्यामुळे शेवटी मीठ घालणं फायद्याचं ठरेल. उन्हाळ्यात मात्र जास्त फर्मेंटेशन टाळण्यासाठी तुम्ही रात्री पीठ तयार केल्यावरही त्यात मीठ घालू शकता.

४. इडली बॅटरसाठी पॉलिश केलेली उडीद डाळ वापरू नका कारण पॉलिश करण्यासाठी फॅक्टरीमध्ये त्यावर प्रोसेस करण्यात येते. या प्रोसेसमध्ये डाळीमधील आवश्यक बॅक्टेरिआ नष्ट होतात. डाळीतील हे बॅक्टेरिआ इडलीचे बॅटर आंबवण्याची महत्वाची (Fermentation) प्रक्रिया करतात.

Web Title: How to Ferment Idli Dosa Batter in Winter Perfectly Ferment Idli Dosa Batter in winter Idli Batter Fermentation tips and tricks in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.