आईच्या हातचं जेवण म्हणजे सुखच. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन कितीही प्रसिद्ध पदार्थ खाल्ले तरी, घरच्या जेवणाची सर कशालाच यायची नाही. पण स्वयंपाक म्हटलं तर कधीतरी चुका हे होतातच. पदार्थात कधी मीठ जास्त पडते. तर, कधी तिखट. पण पदार्थात तेल जास्त पडलं तर काय करायचं? असा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवला असेल.
सध्या नो ऑइलचा ट्रेण्ड सुरू आहे. लोकं कमी तेलाचे पदार्थ खाण्यास प्राधान्य देत आहेत. पदार्थात तेल जास्त पडल्यावर संपूर्ण पदार्थाची चव बिघडते. अतिप्रमाणावर तेल खाल्ल्यामुळे शरीरात विविध आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. मीठ आणि तिखट जास्त पडल्यावर पदार्थाची चव ठीक करता येते. पण तेल जास्त पडल्यावर काय करावे? या प्रश्नाचं उत्तर ४ ट्रिक्समध्ये दडलेलं आहे(How to filter oil from food if you add too much).
आईस क्यूबची मदत घ्या
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. ज्यात एका मोठ्या भांड्यात ग्रेव्ही शिजत होती. त्या ग्रेव्हीवर तेलाचा कट तरंगताना दिसून येत होता. हा कट काढण्यासाठी एका व्यक्तीने मोठा बर्फाचा तुकडा घेतला. व त्याच्या सहाय्याने तेल काढले. बर्फाला तेल एका थराप्रमाणे चिकटते. या ट्रिकमुळे तेल ही निघेल, व चवही बिघडणार नाही.
तुम्हाला जीवापाड आवडणारे ६ पदार्थ मूळचे भारतीय नाहीत, ठेवाल विश्वास? पाहा फोटो..
टिश्यू पेपरचा वापर करा
अतिरिक्त तेल शोषून काढण्यासाठी आपण टिश्यू पेपरचा वापर करतो. भजी किंवा इतर तळलेले पदार्थ आपण टिश्यू पेपरवर तळून ठेवतो. टिश्यू पेपर मऊ कापसासारखे असल्यामुळे ते तेल लवकर शोषून घेते. टिश्यू पेपरचा बॉल बनवा, व ग्रेव्हीवरील तेल हलक्या हाताने काढून घ्या. यामुळे तरंगत असलेले तेल निघून जाईल.
रेफ्रिजरेटरचा वापर करा
भाजीमध्ये जास्त तेल पडले असेल तर, भाजी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. भाजी अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवल्यास, तेलाचा वरचा थर घट्ट होण्यास सुरवात होईल. आपण हा थर चमच्याच्या मदतीने किंवा टिश्यूच्या मदतीने सहजपणे काढू शकता.
आता खा मस्त गारेगार नो ऑइल दही-वडा! सोपी रेसिपी-तेलकट खाण्याचं टेंशनच नाही..
रस्सा भाजी किंवा सूपमधून तेल काढण्याची ट्रिक
रस्सा भाजी किंवा सूपमध्ये तेल जास्त पडल्यावर आपण चमच्याची मदत घेऊ शकता. रस्सा भाजी किंवा सूप अशा द्रव पदार्थांमध्ये तेल वरच्या बाजूला तरंगते. त्यामुळे आपण चमच्याने तेल काढू शकता.