Lokmat Sakhi >Food > कमीतकमी तेलात जास्तीतजास्त पुऱ्या कशा तळायच्या? ३ खास टिप्स, पुऱ्या तेलकट होणार नाहीत

कमीतकमी तेलात जास्तीतजास्त पुऱ्या कशा तळायच्या? ३ खास टिप्स, पुऱ्या तेलकट होणार नाहीत

How To Fry Poori Using Minimum Oil: आमरस पुरीचा बेत तुम्हालाही करायचा असेल तर कमीतकमी तेलात जास्तीतजास्त पुऱ्या कशा तळायच्या पाहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 03:28 PM2024-05-16T15:28:47+5:302024-05-16T15:29:59+5:30

How To Fry Poori Using Minimum Oil: आमरस पुरीचा बेत तुम्हालाही करायचा असेल तर कमीतकमी तेलात जास्तीतजास्त पुऱ्या कशा तळायच्या पाहा....

How to fry poori with minimum oil, 3 tips for making fluffy, non oily, non greasy poori | कमीतकमी तेलात जास्तीतजास्त पुऱ्या कशा तळायच्या? ३ खास टिप्स, पुऱ्या तेलकट होणार नाहीत

कमीतकमी तेलात जास्तीतजास्त पुऱ्या कशा तळायच्या? ३ खास टिप्स, पुऱ्या तेलकट होणार नाहीत

Highlightsअजिबात तेलकट न होणारी आणि कमीतकमी तेलात तळून होणारी पुरी कशी करायची याविषयीच्या या काही खास टिप्स पाहा...

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरोघरी होणारा एक पदार्थ म्हणजे आमरस. आता आमरसाचं जेवण असेल तर बहुतांश घरी त्यासाेबत पुरीचा बेत केला जातो. आमरस, पुरी, बटाट्याची भाजी, कुरकुरीत भजी आणि खमंग तळलेल्या कुरडया असा बेत असला की जेवणाची मजाच विचारायला नको. पण या जेवणाचा बऱ्याचदा हिरमोड होतो तो तेलकट पुरीमुळे (How to fry poori with minimum oil). म्हणूनच तर अजिबात तेलकट न होणारी आणि कमीतकमी तेलात तळून होणारी पुरी कशी करायची याविषयीच्या या काही खास टिप्स पाहा... (3 tips for making fluffy, non oily, non greasy poori)

पुऱ्या तेलकट होऊ नयेत म्हणून काय उपाय करावे?

 

१. पीठ घट्ट मळणे

पुऱ्या करण्यासाठीचं पीठ आपण जेवढं घट्ट मळू तेवढी आपली पुरी कमी तेल पिते. जर पीठ खूपच सैलसर मळलेलं असेल तर त्या पुऱ्या तळण्यासाठी हमखास खूप तेल लागतं.

नाश्त्यासाठी रोज काय करावं प्रश्नच पडतो? ७ हेल्दी- चटपटीत पदार्थ, झटपट होतील सगळ्यांना आवडतील

कारण तशा पिठाच्या पुऱ्या खूप तेल पितात आणि तेलकट होतात. त्यामुळे कमीतकमी पाणी वापरून पुऱ्यांसाठीचं पीठ मळा. पीठ मळल्यानंतर १५ मिनिटे फ्रिजमध्ये झाकून ठेवा आणि नंतर त्याच्या पुऱ्या करा. 

 

२. पिठाचा वापर टाळा

पुऱ्या लाटताना बरेच जण पिठाच्या गोळ्याला कणिक किंवा मैदा किंवा रवा लावतात आणि मग त्याची पुरी लाटतात. पण असं करणं टाळायला पाहिजे.

दिल्लीकरांनो आता बस्स!! इडलीसोबत केलेला 'हा' भयंकर प्रकार पाहून इडलीप्रेमी चिडले, व्हिडिओ व्हायरल

कारण यामुळे एकतर पिठाचा काही भाग कढईतल्या तेलामध्ये जातो आणि तळाशी सगळं पीठ साचून तेल खराब होतं. दुसरं म्हणजे पुरीला जे काही कोरडं पीठ लागलेलं असतं ते आणखी जास्त तेल शोषून घेतं आणि त्यामुळे मग पुरी तेलकट होते.

 

३. पुरी पुर्णपणे निथळून घ्या

बरेच जण पुरी तळून झाली की तिच्यातलं तेल अजिबात निथळू देत नाहीत. ती तेलातून तशीच झाऱ्यावर उचलतात आणि बाहेर काढतात. असं करणं टाळावं.

५५ वर्षांच्या भाग्यश्रीचा चेहरा एवढा सुंदर आणि तरुण कसा? बघा तिनेच सांगितलंय त्यामागचं सिक्रेट.... 

जी पुरी तळून झाली असेल ती झाऱ्याच्या मदतीने कढईच्या एका कोपऱ्यात आणावी. झाऱ्या थोडा तिरका करावा आणि ती पुरी १५ ते २० सेकंदासाठी तशीच कढईच्या काेपऱ्यावर अलगद धरून ठेवावी. यामुळे पुरीतलं अतिरिक्त तेल सगळं कढईतच निथळून जातं आणि पुरी तेलकट होत नाही. 

 

Web Title: How to fry poori with minimum oil, 3 tips for making fluffy, non oily, non greasy poori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.