Lokmat Sakhi >Food > कितीतरी वेळ ताक घुसळलं तरी लोणी लवकर येत नाही? ३ टिप्स- लोणी आणि तूप दोन्हीही मिळेल भरपूर

कितीतरी वेळ ताक घुसळलं तरी लोणी लवकर येत नाही? ३ टिप्स- लोणी आणि तूप दोन्हीही मिळेल भरपूर

How To Get Fast Butter From Malai Curd: ज्या महिला सायीच्या दह्यापासून घरी तूप तयार करतात त्यांना बऱ्याचदा असा अनुभव येतो की दह्यापासून चटकन लोणी तयार होतच नाही. त्यासाठीच या काही खास टिप्स बघा..(3 tips for getting maximum butter and ghee from home made malai curd)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2024 11:53 AM2024-10-08T11:53:25+5:302024-10-08T19:47:18+5:30

How To Get Fast Butter From Malai Curd: ज्या महिला सायीच्या दह्यापासून घरी तूप तयार करतात त्यांना बऱ्याचदा असा अनुभव येतो की दह्यापासून चटकन लोणी तयार होतच नाही. त्यासाठीच या काही खास टिप्स बघा..(3 tips for getting maximum butter and ghee from home made malai curd)

how to get fast butter from malai curd, 3 tips for getting maximum butter and ghee from home made malai curd | कितीतरी वेळ ताक घुसळलं तरी लोणी लवकर येत नाही? ३ टिप्स- लोणी आणि तूप दोन्हीही मिळेल भरपूर

कितीतरी वेळ ताक घुसळलं तरी लोणी लवकर येत नाही? ३ टिप्स- लोणी आणि तूप दोन्हीही मिळेल भरपूर

Highlightsया काही टिप्स बघून एकदा सायीच्या दह्यापासून लोणी करून पाहा. लोणी अगदी चटकन निघेल, शिवाय तूपही भरपूर होईल.

हल्ली बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे तूप विकत मिळते. पण घरी केलेल्या साजूक तुपाला जी चव असते ती चव मात्र विकतच्या कोणत्याही तुपाला नाही, मग तुम्ही त्यासाठी कितीही पैसे मोजा.. त्यामुळेच तर घरी तयार केलेल्या साजूक तुपाचे मोल आणि त्याचे पौष्टिक गुण काही वेगळेच आहेत. अनेक जणींना घरी साजूक तूप तयार करण्याचा कंटाळा येतो. कारण सायीच्या दह्यापासून चटकन लोणी निघत नाही, त्यात खूप वेळ जातो असे त्यांचे म्हणणे आहे (How To Get Fast Butter From Malai Curd). तुम्हालाही घरी तूप तयार करताना हीच अडचण येत असेल तर या काही टिप्स बघून एकदा सायीच्या दह्यापासून लोणी करून पाहा. लोणी अगदी चटकन निघेल, शिवाय तूपही भरपूर होईल.(3 tips for getting maximum butter and ghee from home made malai curd)

 

सायीच्या दह्यापासून चटकन लोणी तयार होण्यासाठी टिप्स 

१. तूप तयार करण्यासाठीचा सगळ्यात पहिला नियम म्हणजे त्यासाठी आपल्याला रोजच्या दुधावरची साय दररोज नियमितपणे एका भांड्यामध्ये जमा करावी लागते. ती साय जास्त शिळी होऊ देऊ नका.

मनी प्लांट वाढतच नाही? मातीत टाका 'ही' खास गोष्ट, मनी प्लांट वाढेल भराभर- कधीच सुकणार नाही

आठवड्यातून एक दिवस ठरवून घ्या आणि त्या दिवशी नियमितपणे तूप करा. जास्तीतजास्त ७ ते ८ दिवस जमवलेल्या सायीचे तूप करावे. त्यामुळे ते चवीलाही चांगले होते आणि शिवाय त्याचे लोणीची चटकन निघते. 

 

२. साधारण ७ ते ८ दिवसांची साय पातेल्यात जमा केल्यानंतर ती फ्रिजमधून बाहेर काढून त्यात विरझण घालावे. यानंतर ती साय ८ ते १० तास रुम टेम्परेचरवर ठेवावी.

कितीही आवरलं तरी कपाटात कपड्यांचा पसाराच होतो? ३ टिप्स- कपाट नेहमीच राहील नेटकं- टापटीप

यामुळे मग सायीचे दही तयार सायीचे दही तयार झाल्यानंतर अनेक जणी वेळ नाही म्हणून पुन्हा ते फ्रिजमध्ये ठेवून देतात. पण असे करणे चुकीचे आहे. सायीचे दही एकदा लागले की लगेच त्याचे लोणी करावे.

 

३. सायीच्या दह्याचे लोणी करताना त्यात आपण कोणते पाणी घालतो हे देखील खूप महत्त्वाचे आहे.

चरबी वाढल्याने दंड खूपच जाडजूड दिसतात? ४ व्यायाम रोज करा, हात दिसतील नाजूक- देखणे

जर वातावरण गरम किंवा उष्ण असेल तर तुम्ही त्या दह्यामध्ये थंड पाणी टाका. जर वातावरण थंड असेल तर तुम्ही त्यात गरम पाणी टाका. असे केल्यास चटकन लोणी निघते. एकदा या काही टिप्स फाॅलो करून पाहा..
 

Web Title: how to get fast butter from malai curd, 3 tips for getting maximum butter and ghee from home made malai curd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.