Lokmat Sakhi >Food > दुधावर येईल घट्ट साय, दूध तापवताना लक्षात ठेवा ५ टिप्स; मिळेल भरपूर साय

दुधावर येईल घट्ट साय, दूध तापवताना लक्षात ठेवा ५ टिप्स; मिळेल भरपूर साय

How To Get Fresh Cream Malai From Milk : दुधावर घट्ट-जाड मलाई येण्यासाठी ५ सोप्या ट्रिक्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2024 11:30 AM2024-01-26T11:30:49+5:302024-01-26T11:35:01+5:30

How To Get Fresh Cream Malai From Milk : दुधावर घट्ट-जाड मलाई येण्यासाठी ५ सोप्या ट्रिक्स..

How To Get Fresh Cream Malai From Milk | दुधावर येईल घट्ट साय, दूध तापवताना लक्षात ठेवा ५ टिप्स; मिळेल भरपूर साय

दुधावर येईल घट्ट साय, दूध तापवताना लक्षात ठेवा ५ टिप्स; मिळेल भरपूर साय

दूध, दही, तूप यासह इतर दुग्धजन्य पदार्थ (Milk-Based Products) कितीही महाग झाले तरी, आपण प्रत्येक जण खातोच. मुख्य म्हणजे घरात तूप नसेल तर, काही लोकं खाणं टाळतात. पदार्थात तूप घालताच, पदार्थाची चव तर वाढतेच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. पण बाहेरच भेसळयुक्त तुपापेक्षा घरातलं फ्रेश तूप चांगलं. घरात तूप तयार करताना आपण आधी साय साठवून ठेवतो. पण बऱ्याचदा दुधाला हवी तशी मनासारखी घट्ट सायी येत नाही.

दुधावर घट्ट साय यावी यासाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो (Cooking & Kitchen Tips). पण प्रत्येक टिप्स उपयुक्त ठरतीलच असे नाही. जर दुधावर घट्ट साय यावी असे वाटत असेल तर, ४ टिप्स वापरून पाहा. या टिप्समुळे दुधावर घट्ट साय तयार होईल. ज्याचा वापर आपण तूप तयार करण्यासाठी करू शकता(How To Get Fresh Cream Malai From Milk).

- चपातीप्रमाणे दुधावर जाडसर मलाई हवी असेल तर, टोन्ड दुधाऐवजी फुल क्रीम दुधाचा वापर करा.

चपाती लाटताना फाटते? शेफ पंकज भदौरिया सांगतात ३ ट्रिक्स; पोळ्या होतील परफेक्ट

- दूध नेहमी मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. १० ते १५ मिनिटानंतर दुधाला उकळी आल्यानंतर गॅस कमी करा. जर दूध उकळून भांडयाबाहेर पडण्याची भीती असेल तर, त्यावर लाकडी चमचा ठेवा. यामुळे दूध उतू जाणार नाही.

- दूध अधिक वेळ उकळवत ठेवल्याने घट्ट होते. ज्यामुळे दुधावर जाडसर मलाई तयार होते.

- दुधाला उकळी आल्यानंतर लगेच त्यावर झाकण ठेवू नका. दूध कोमट झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर त्यावर जाळीदार झाकण ठेवा. यामुळे दुधावर चांगली मलाई तयार होईल.

- बरेच जण दुधाला उकळी आल्यानंतर लगेच फ्रिजमध्ये ठेवतात. असे न करता, कोमट किंवा थंड झाल्यानंतर ठेवा. ४ ते ५ तास दूध फ्रिजमध्ये सेट झाल्याने त्यावर जाडसर मलाई तयार होईल.

'वो स्त्री है...! केकमध्ये भरलं रगडा-गोड चटणी, कडेने लावली शेव..पाणीपुरी केकचा व्हिडिओ व्हायरल..

- घट्टसर मलाई साठवण्यासाठी आपण एका हवाबंद डब्याचा वापर करू शकता. हवाबंद डब्यात मलाई साठवून ठेवल्याने ते अधिक काळ टिकते, शिवाय हा डबा फ्रिजमध्ये ठेवा, यामुळे मलाई फ्रेश राहील, त्यावर बुरशी तयार होणार नाही.

- जितक्या वेळा आपण अशा पद्धतीने दुधाला तापवाल, तितक्या वेळेस दुधावर जाडसर मलाई तयार होईल.

Web Title: How To Get Fresh Cream Malai From Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.