Lokmat Sakhi >Food > How To Get Rid Of Rice Weevil From Dal : डाळीतले किडे, दगडं काढण्याची सोपी ट्रिक वापरा; तासनतास न घालवता झटपट होईल काम

How To Get Rid Of Rice Weevil From Dal : डाळीतले किडे, दगडं काढण्याची सोपी ट्रिक वापरा; तासनतास न घालवता झटपट होईल काम

How To Get Rid Of Rice Weevil From Dal : पांढरे आणि काळे दोन्ही किडे डाळी हळूहळू खातात आणि त्यामुळे कधी कधी संपूर्ण डाळी वाया जातात. काही घरगुती उपाय करून आपण डाळीतल्या किड्यांना लांब ठेवू शकतो.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 03:21 PM2022-05-18T15:21:58+5:302022-05-18T16:49:33+5:30

How To Get Rid Of Rice Weevil From Dal : पांढरे आणि काळे दोन्ही किडे डाळी हळूहळू खातात आणि त्यामुळे कधी कधी संपूर्ण डाळी वाया जातात. काही घरगुती उपाय करून आपण डाळीतल्या किड्यांना लांब ठेवू शकतो.  

How To Get Rid Of Rice Weevil From Dal : How to remove bugs and dirt from uncooked dal | How To Get Rid Of Rice Weevil From Dal : डाळीतले किडे, दगडं काढण्याची सोपी ट्रिक वापरा; तासनतास न घालवता झटपट होईल काम

How To Get Rid Of Rice Weevil From Dal : डाळीतले किडे, दगडं काढण्याची सोपी ट्रिक वापरा; तासनतास न घालवता झटपट होईल काम

भारतात विविध प्रकारच्या कडधान्यांचा वापर आहारात केला जातो. रोजच्या जेवणात डाळींचाही वापर केला जातो डाळ हे प्रथिनेयुक्त धान्य अनेक रोगांसाठी देखील चांगले मानले जाते. (Kitchen Tips and Hacks)  डाळी विकत घेण्याचे आणि साठवण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु डाळ साठवताना नेहमीच एक समस्या उद्भवते ती म्हणजे डाळीमध्ये लहान दाण्यात किडे अडकतात. (How to remove bugs and dirt from uncooked dal)

पांढरे आणि काळे दोन्ही किडे डाळी हळूहळू खातात आणि त्यामुळे कधी कधी संपूर्ण डाळी वाया जातात. काही घरगुती उपाय करून आपण डाळीतल्या किड्यांना लांब ठेवू शकतो.  डाळीतले खडे ही देखील एक मोठी समस्या आहे म्हणून प्रत्येकवेळी डाळ शिजवण्याआधी  खडे निवडावे लागतात. नाहीतर खाताना दात आणि जीभेला खडे जाणवतात. (How To Get Rid Of Rice Weevil From Dal)

डाळीत किडे का होतात?

जेव्हा धान्य जास्त काळासाठी साठवले जाते तेव्हा त्यात कीटक होण्याची शक्यता जास्त असते. अनेक वेळा याचे कारण धान्यामध्ये असलेली कीटकांची अंडी असते. बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु ती आपल्यासाठी  योग्य नाहीत. कारण त्यात केमिकल्सचा वापर जास्त प्रमाणत असतो. 

१) हळदीचा वापर

हळद बाजारात सहज उपलब्ध असते आणि तिचा वासही खूप तीव्र असतो. जर तुम्ही जास्त कडधान्ये साठवत असाल, उदाहरणार्थ 20 किलो डाळी, तर त्यात 4-5 चिमूटभरून हळद टाका.  डाळ कीटकांपासून मुक्त ठेवण्याचा हा एक अतिशय सुरक्षित आणि नैसर्गिक मार्ग आहे. हे केवळ काळे कीटकच नाही तर पांढरे किडेही दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरते.

२) राईचं तेल

आता तुम्ही विचार करत असाल की डाळीतले किडे काढण्यासाठी मोहरीचे तेल कसे वापरले जाऊ शकते, परंतु ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे जी ओलसरपणापासून आणि कीटकांपासून देखील संरक्षण देते. 2-5 किलो प्रमाणे कमी कडधान्ये साठवायची असताना राईचं तेल वापरा. सर्व प्रथम, 2 किलो डाळीमध्ये 1 चमचे मोहरीचे तेल घाला आणि चांगले मिसळा. त्यानंतर डाळ उन्हात वाळवा. असे केल्याने त्यातील किडे तर निघून जातीलच शिवाय त्यात आणखी किडे होण्याची शक्यताही कमी होईल.

५ चुकांमुळे बाथरूममध्ये अचानक येऊ शकतो हार्ट अटॅक; सर्वाधिक लोक करतात दुसरी चूक

३) लसूण

किटकांपासून धान्यांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही लसूण देखील वापरू शकता. लसूण अतिशय तीव्र वास देतो ज्यामुळे कीटक पळून जातात. चार ते पाच लसणीच्या पाकळ्या डाळीच्या डब्यात ठेवा. या उपायानं किटक दूर राहण्यास मदत होईल. 

रक्ताची कमतरता दूर करतात रोजच्या जेवणातील १० पदार्थ; आजपासूनच खायला लागा, तब्येत राहील उत्तम 

४) तमालपत्र

तमालपत्र हे धान्यातील कीटक काढून टाकण्यासाठी नेहमीच एक चांगला पर्याय ठरू शकतात. धान्य साठवणुकीच्या डब्यात नेहमी तमालपत्र ठेवा. यामुळे नवीन किडे येणार नाहीत आणि जे कीटक आहेत तेही निघून जातील. तसेच, तमालपत्रासह लवंगा एका बंडलमध्ये ठेवा. डाळीचे खडे काढणे फार कठीण आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते धुतल्यानंतरही काढता येत नाही कारण ते खडे खूप जड असतात आणि ते पाण्यात स्थिर राहतात.  एका मोठ्या ताटात किंवा सुपात थोडी थोडी डाळ घेऊन तुम्ही डाळीतले खडे काढू शकता. 
 

Web Title: How To Get Rid Of Rice Weevil From Dal : How to remove bugs and dirt from uncooked dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.