Join us  

डाळ, तांदूळ - गव्हाच्या पिठात कीड - अळ्या झाल्या? ४ घरगुती उपाय - डब्याभोवती किडे फिरकणारही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 2:59 PM

How to Get Rid of Rice Weevils (4 Easy Steps), Follow Kitchen Hacks : गव्हाचे पीठ जास्त दिवस साठवल्यास किडे होतात?

स्वयंपाकघरातल्या (Kitchen) धान्याची स्वच्छता महिन्याला करायला हवी (Kitchen Hacks). अन्यथा तांदूळ, गहू आणि डाळीत किडे होतात. पोरकिड्यांमुळे धान्यांचे नुकसान होते. शिवाय या धान्यांचा वापर आपण आहारातही करू शकत नाही (Cleaning Tips). ज्यामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता जास्त असते (Grains). बरेच कीड धान्य पोखरून ठेवतात. ज्यामुळे धान्याच्या डब्यात काहीप्रमाणात पीठही तयार होते.

बऱ्याचदा थंडी किंवा पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसल्यामुळे, डब्यात ठेवलेल्या डाळी आणि तांदूळांवर किडे आणि बुरशीची लागण होते. त्यामुळे महिन्याला डाळ, तांदूळ आणि गहू स्वच्छ करणं गरजेचं आहे. जर तांदूळ, गहू आणि डाळीला कीड लागू नये, असे वाटत असेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. या घरगुती उपायांमुळे डब्यात धान्य  सुरक्षित राहतील. शिवाय त्यात कीड किंवा अळ्या तयार होणार नाही(How to Get Rid of Rice Weevils (4 Easy Steps), Follow Kitchen Hacks).

धान्याला कीड लागू नये म्हणून..

कोरडी कडुलिंबाची पाने

तांदूळ, गहू किंवा डाळींच्या डब्यात किड्यांनी घर केलं असेल तर, कडूलिंबाच्या पानांचा वापर करून पाहा. किडे घालवण्यासाठी डाळी आणि तांदळात कोरडी कडुलिंबाची पाने ठेवू शकता. त्याच्या तीव्र वासामुळे किडे आपोआप बाहेर येतील.  फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, कडूलिंबाची पानं पूर्णपणे कोरडी असायला हवीत.

ना डाएट - ना व्यायाम; फक्त दिवभारात 'एवढे' लिटर पाणी प्या; बघा वजनातला फरक झ्टपट

तमालपत्र

आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये आढळणारी तमालपत्रे धान्यातून किडे दूर ठेवण्यास मदत करते. त्याच्या सुगंधाने किडे पळू लागतात. आपण तांदूळ, गहू आणि डाळीच्या डब्यात तमालपत्र ठेवू शकता. कोणत्याही धान्याच्या डब्यात तमालपत्र ठेवता येईल.

लसूण

लसणाचा वास देखील कीटकांना दूर ठेवण्यास मदत करू शकतो. यासाठी डाळी आणि तांदळाच्या डब्यात लसणाच्या पाकळ्या  ठेवा. जेव्हा लसणाच्या पाकळ्या सुकतात. तेव्हा त्यांना काढून टाका. दुसऱ्या लसणाच्या पाकळ्या डब्यांमध्ये घाला. यामुळे धान्यांना कीड लागणार नाही.

काळी मिरी

आपण काळी मिरीच्या मदतीने कीटकांनाही दूर करू शकता. यासाठी काळी मिरी कापडात बांधून डाळी आणि तांदळाच्या डब्यात मधोमध ठेवा.

लेकीसाठी काहीपण! मार्क झकरबर्ग लेकीसाठी झाला नेल आर्टिस्ट, पाहा कशी लावली नेल पॉलिश

मॅच बॉक्स

धान्यांना कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी मॅच बॉक्स उपयुक्त ठरते. त्यात असलेल्या सल्फरमुळे कीटक पळून जातात. त्यासाठी माचिसची पेटी बांधून डब्यात ठेवा. 

टॅग्स :किचन टिप्सअन्नस्वच्छता टिप्स