Join us  

दुधावर घट्ट जाड साय येतंच नाही? टाळा ५ चुका, दुधावर भरपूर साय येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2023 5:54 PM

How to get Thick Malai in Milk दुधावर साय पातळ आली की दुधालाच दोष देतो, पण दूध तापवताना काही चुकतंय का?

प्रत्येक वयोगटातील लोकं साधारण दूध पितात. एक कप दूध प्यायल्याने शरीराला नवी उर्जा मिळते. दुधाप्रमाणेच दुधाची सायचे देखील अनेक फायदे आहेत. दुधाची साय खाद्यपदार्थ सजवण्यासाठी, तूप तयार करण्यासाठी, खाण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी होतो.

परंतु, अनेकांची अशी तक्रार असते की, दुधावर बाजारात मिळणाऱ्या सायप्रमाणे जाड साय तयार होत नाही. दुधावर साय कश्या पद्धतीने तयार करावी? साय घट्ट होण्यासाठी कोणतं दूध वापरावं? दुधाची घट्ट साय तयार करण्यासाठी कोणत्या टिप्स उपयोगी पडतील हे पाहूयात(How to get Thick Malai in Milk).

दुधावर जाड साय हवी असेल तर, ही ट्रिक फॉलो करा

दूधावर साय तेव्हाच जाड तयार होते, जेव्हा दूध चांगलं उकळलेलं असतं. दुधावर घट्ट साय हवी असेल तर, दूध उकळण्याची पद्धत बदला. यासाठी दूध थेट फ्रिजमधून काढल्यावर तापवू नका. शिवाय दूध नेहमी मंद आंचेवर उकळत ठेवा. दूध तापवल्यावर ते झाकून ठेवू नका. दुधात काही पडणार नाही, याची खरबरदारी घ्या.

गरमागरम इडली सांबार तर खाताच आता खाऊन पाहा इडली पकोडा, पावसाळ्यात खा नव्या पद्धतीची भजी

चमच्याने ढवळत राहा

दुधावर जाड - घट्टसर साय हवी असेल तर, दुधाला उकळी आल्यानंतर दर ५ मिनिटाला चमच्याने ढवळत राहा. चमचा स्वच्छ असावा. चमच्याने दुधावर येणारे बुडबुडे बाजूला करा. यामुळे दुधाला चांगली उकळी येईल, व बुडबुड्यांपासून जास्त जाड मलई तयार होईल.

दुधावर प्लेट झाकू नका

दूध झाकण्यासाठी प्लेट वापरू नका. कारण गरम दुधावर प्लेट झाकल्यामुळे वाफ आत राहते. यामुळे साय तयार होत नाही. अशावेळी प्लेट ऐवजी जाळीच्या झाकणाने दूध झाकून ठेवा.

पाकातले रवा लाडू करायची ही घ्या सोपी सुटसुटीत रेसिपी, लाडू ना बिघडतील ना कडक होतील

मातीच्या भांड्यात दूध गरम करा

दुधाला स्टीलच्या भांड्यात तापवू नका, त्याऐवजी मातीच्या भांड्यात गरम करा. कारण मातीच्या भांड्याच्या तापमानामुळे दूध संथपणे गरम होते. यामुळे दुधावर चांगली साय तयार होते.

दूध फ्रिजमध्ये कधी ठेवावे?

दूध गरम असताना फ्रिजमध्ये ठेऊ नका. जेव्हा दूध थोडं थंड होईल, तेव्हा फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे नंतर दूध गरम करताना त्यावर जाडसर साय तयार होईल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स