Join us  

दुधावर भरपूर दाट साय येण्यासाठी दूध तापवताना लक्षात ठेवा १ ट्रिक्स वापरा; भाकरीसारखी जाड येईल साय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 12:00 PM

How to Get Thick Malai on Milk (Dudhavar say yenyasathi tips) : दुध उकळवण्याची पद्धतही घट्ट मलई येण्यासाठी  गरजेची असते.

कोणताही ऋतू असतो प्रत्येकाच्या घरात दुधाचा वापर केला जातो. (Milk) दुध हा एक परिपूर्ण आहार आहे. दूध प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. (Cooking Hacks) दुधाने कॅल्शियम मिळते याशिवाय रोगप्रतिकारकशक्तीही चांगली राहते. दूध चहा, कॉफी शिवाय इतरही पदार्थांमध्ये वापरले जाते. याशिवाय दूधापासून पनीर, बटर, तूप, दही असे पदार्थ तयार करता येतात. (How to Get Thick Malai on Milk)

दूधाला जर व्यवस्थित साय आली नाही.  घर तूप बनवणं कढीण होऊ शकतं. जितकी जास्त घट्ट मलई येईल तितकंच तूप बनवणं सोपं होईल. दुधावर जाड साय येत नाही, दूध लवकर खराब होतं अशी अनेकांची तक्रार असते. दूधावर घट्ट साय येण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. जेणेकरून तुम्ही दूध आणि मलईपासून घरातच अनेक पदार्थ बनवू शकता. (How to Make Thick Milk Cream)

दूध उकळवण्याची ट्रिक

दुध उकळवण्याची पद्धतही घट्ट मलई येण्यासाठी  गरजेची असते.  दुधाला व्यवस्थित उकळ आल्यानंतर झाकण ठेवून द्या. मलई घट्ट झाल्यानंतर दूध फ्रिजमध्ये ठेवून द्या. दूध मंद आचेवर किंवा हाय फ्लेमवर गरम न करता मध्यम आचेवर उकळत ठेवा यामुळे छान साय तयार होईल. दूध जवळपास ४ ते ५ मिनिटं व्यवस्थित गरम करून घ्या. दूधावर जाळीचे झाकण ठेवा. 

टपरीवर मिळतो तसा परफेक्ट चहा घरीच करा; दूधात घाला 'हा' पदार्थ, गारठ्यात प्या गरमागरम चहा

साय येण्यासाठी चमच्याचा वापर

दूध उकळायला ठेवल्यानंतर तुम्ही कोणतंही खास काम करत नसाल तर  एक ते दोन वेळा चमच्याने ढवळत राहा. दूध उकळण्याची ही पद्धत थोडी वेगळी आहे पण याचा इफेक्ट नक्की दिसून येईल. थंड दूध रूम टेम्पचेरवर ठेवून उकळून घ्या. पहिल्या पातेल्यात थोडं पाणी घालून त्यावर दूध घाला. मिडीयम फ्लेमवर शिजवून त्यात बबल्स आल्यानंतर थोडं बाजूला ठेवा. ही प्रोसेस तुम्हाला २ ते ३ वेळा करावी लागेल. 

दूध मातीच्या भांड्यात ठेवा

थंड दूध एकदम हाय फ्लेमवर ठेवलं तर त्यात व्यवस्थित मलई तयार होणार नाही. दूध मंच आचेवर  व्यवस्थित उकळवलं तर घट्ट मलई तयार होईल.  दूधाला घट्ट साय येण्यासाठी  मातीच्या भांड्याचा वापर करा जेणेकरून तुमचं काम आणखी सोपं होईल. मातीच्या भांड्याची दुधाबरोबर रिएक्शन लवकर होते.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स