Join us  

दुधावर भाकरीसारखी जाड साय येईल; 'या' सोप्या टिप्स वापरा, कोणतंही दूध असो भरपूर साय मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 11:18 AM

How To Get Thick Malai On Milk : (Dhudavar Malai Yenyasathi kay karave) : दुधावर साय येण्यासाठी दुध गरम करताना काही खास ट्रिक्स वापराव्या लागतात.

लोकांची अशी तक्रार असते की त्यांच्या घरी जे दूध (Milk) आणलं जातं त्यावर घट्ट मलई येत नाही. याच कारणामुळे लोक घरी तूप बनवू शकत नाहीत. पूर्वीच्या काळी घरातच तूप तयार केलं जायचं तेव्हा घरच्या दुधाच्या सायीचा वापर केला जायचा. (How To Get More Malai From Milk) दुधावर साय येण्यासाठी दुध गरम करताना काही खास ट्रिक्स वापराव्या लागतात. तेव्हा दुधावर चपातीसारखी घट्ट साय तयार होते. दुधावर जाड साय आणण्याची खास ट्रिक पाहूया. (How To Get Thick Malai On Milk)

दुधावर जाड मलई येण्यासाठी काय करावे? (How to Get Heavy Malai From Milk)

ताज्या दुधाचा वापर करा

मलई काढण्यासाठी नेहमी ताज्या दुधाचा वापर करा. जेव्हा तुम्ही दूध उकळता तेव्हा ते जास्त फॅटफूल असते. जेव्हा थंड होते तेव्हा त्यावर मलई यायला सुरूवात होते. जर तुम्हाला घट्ट साय हवी असेल तर बाजारातून फुल क्रिम दूध आणा त्यात गाईच्या साध्या दुधाच्या तुलनेत अधिक क्रिम असते.  दूध उकळवणं ही फार महत्वाची पायरी आहे.

जाड साय कशी येते?

शर्मिसपॅशनच्या रिपोर्टनुसार दुधाला साय किती येणार हे तुम्ही कोणतं दुध वापरता यावर अवलंबून असते. दूध उकळवल्यानंतर ते घट्ट होण्यास मदत होते. तुम्ही जास्त साय येण्यासाठी दूध गरम झाल्यानंतर थोडावेळ मंद आचेवर दूध उकळू द्या नंतर गॅस बंद करा. हे दूध थंड करून फ्रिजमध्ये ठेवून द्या (Ref). अर्ध्या तासाने या दूधावर जाड  साय तयार झालेली दिसून येईल. दुध एकदा उकळवल्यानंतर संध्याकाळी जेव्हा तुम्ही पुन्हा फ्रिजमधून बाहेर काढाल तेव्हा दुधावरची साय एका भांड्यात काढून घ्या. 

शरीर सडपातळ आहे-लोक सुकडी म्हणतात? चहात 'हे' खास दूध घालून प्या; ताकद येईल-फिट दिसाल

त्यानंतर दुध गरम करून पुन्हा फ्रिजमध्ये ठेवा दुसऱ्या दुधाला खूपच पातळ साय येईल. साय जमा करण्यासाठी एका स्वच्छ भांड्याचा वापर करा. साय काढून ठेवल्यानंतर ही बंद डब्यातच ठेवा. फ्रिजमध्ये झाकण न  ठेवता साय ठेवल्यास त्यावर बुरशी येऊ शकते. रोज दुध गरम केल्यानंतर त्याच डब्यात किंवा भांड्यात साय साठवत राहा. 

जाड साय येण्यासाठी तुम्ही दुध कोणत्या पद्धतीने उकळवता ते फार महत्वाचे असते. यासाठी  मंद आचेवर काहीवेळ दुध उकळू द्या. दुधाला उकळ आल्यानंतर लगेच गॅस बंद करू नये. थोडावेळ उकळल्यानंतर गॅस बंद करा जेणेकरून मलई जाड होईल. दूध उकळल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवून द्या. यासाठी तुम्ही जाळीच्या झाकणाचा वापर करू शकता. दुधाच्या भांड्यावर जाळीचे झाकण ठेवल्यास दुध लवकर रूम टेंम्परेचरवर येते आणि जाड मलई येते.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न