नारळ फोडणं आणि किसणं म्हटलं तर खूपच किचकट काम. नारळ फोडण्यापासून ते किसण्यापर्यंत बरेच परिश्रम करावे लागतात. स्वयंपाकात नारळाचा किस वापरला नाही जेवण बेचवही लागतं. भारतातील अनेक राज्यात प्रत्येक भाजीत आणि डाळीत ओलं नारळ वापरलं जातं. (Cooking Hacks) ओल्या नारळ्याच्या वड्याही बनवल्या जातात. तर काहीजण सुकं खोबरं वापरतात. नारळ किसण्याची सोपी ट्रिक वापरली तर तुमचं रोजचं काम अधिकचं सोपं होऊ शकतं. एक किसलेलं नारळ तुम्ही फ्रिजमध्ये महिनोंमहिने साठवून ठेवू शकता. (How do you grate fresh coconut easily)
-सगळ्यात आधी नारळावर सुरीनं मारून नारळ फोडून त्यातलं पाणी काढून घ्या. नारळ्याच्या वाट्या वेगळ्या केल्यावर त्या २४ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. नंतर एका ताटात या वाट्या काढून घ्या.
-एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळ फुटल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून वाट्या पाण्यात घाला. पाण्यात या वाट्या थोड्यावेळ उकळ्यानंतर बाहेर काढा आणि थंड झाल्यावर नारळ करवंटीतून वेगळे करा.
- करवंटीतून नारळ वेगळे केल्यानंतर चॉपरच्या साहाय्यानं करवंटीचे बाहेरचे साल काढून घ्या. नंतर सुरीनं नारळचा आतला भाग कापून घ्या.
- नारळाचे बारीक काप करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. मिक्सरचं भांड जराही ओलसर नसेल याची खात्री करा. किसलेला चुरा स्वच्छ डब्यात भरा आणि हा खोबऱ्याचा किस फ्रीजमध्ये ठेवा.
नारळ फोडण्याच्या ट्रिक्स (How to open Coconut quickly)
१) नारळ व्यवस्थित स्वच्छ करून ओव्हनमध्ये ४० डिग्रीवर प्रिहीट करून घ्या. जवळपास १ मिनिटं शिजल्यानंतर ओव्हन बंद करा आणि नारळाचे साल हलके काढून घ्या.
२) रात्रभर फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर नारळाचं साल सहज काढता येईल.
३) नारळ गॅसवर २ ते ३ मिनिटांसाठी भाजून घेतल्यानंतरही सोप्या पद्धतीनं फोडता येतं.
४) ताजे नारळ विकत घेऊन आणल्यानंतर गरम पाण्यात 5 मिनिटे भिजत ठेवा आणि 5 मिनिटांनंतर तुम्ही नारळ हाताने घासून माती स्वच्छ करा. स्वच्छ झाल्यावर नारळ पाण्याने धुवा आणि कोरडे होण्यासाठी ठेवा. यानंतरच नारळातून पाणी बाहेर काढा.