Join us  

How to grate Coconut : नारळ पटकन किसून होण्यासाठी ३ सोप्या ट्रिक्स वापरा; स्वयंपाकाचं किचकट कामं होईल सोपं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:04 AM

How to grate Coconut : नारळ किसण्यासाठी तुम्ही विळी किंवा किसणीचाही वापरू शकता. नारळाचे तुकडे मिक्सरला लावण्याची चूक करू नका. त्यामुळे त्यामुळे नारळाचा किस व्यवस्थित होणार नाही.

मोदकाच्या सारणासाठी, डाळ, भाजीची चव वाढवण्यासाठी ओलं खोबरं आवर्जून घातलं जातं. जर जेवणात खोबरं नसेल तर जेवणाची मजाही येत नाही. पण नारळं फोडण्यापासून किसण्यापर्यंत बराच वेळ लागतो म्हणून काहीजण नारळाचे पदार्थ बनवायला कंटाळा करतात. कारण खोबरं किसण्याचं काम खूपच वेळखाऊ वाटतं.(How to grate coconut easily) म्हणूनच स्वयंपाकाचा वेळ वाचण्यासाठी खोबरं खवण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूया.  (How to grate Coconut) जर तुम्हाला उद्या काही नारळाचे पदार्थ बनवायाचे असतील तर आदल्या दिवशी नारळ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून  फ्रिजमध्ये ठेवा आणि १२ तासानं नारळ बाहेर काढा. करवंटी फोडून बाजूला करा. त्यामुळे खोबरं किसणं सोपं होईल.(3 Ways to Grate Coconut) गणपतीत तुम्ही उकडीचे मोदक बनवण्याच्या विचारात असाल तर  या ट्रिक्स वापरून तुम्ही पटापट नारळाचं सारण बनवू शकता.

पहिली ट्रिक

 करवंटी आधी भाजून ती थंड झाल्यानंतर अलगदपणे करवंटी आणि नारळ वेगळं करू शकता. नारळं गरम केल्यानंतर थोडं मऊ पडेल आणि लवकर किसलं जाईल.

दुसरी ट्रिक

नारळ किसण्यासाठी तुम्ही विळी किंवा किसणीचाही वापरू शकता. नारळाचे तुकडे मिक्सरला लावण्याची चूक करू नका. त्यामुळे त्यामुळे नारळाचा किस व्यवस्थित होणार नाही.

तिसरी ट्रिक

नारळ सोलण्यासाठी तुम्ही पहिल्या ट्रिकचा वापर करताना सुरीचा वापर करू शकता. सुरी किंवा साणचीच्या साहाय्यानं आधी खोबरं भाजून घ्या नंतर सालं काढून मऊ पडलेलं नारळ किसायला घ्या. किसलेलं नारळ तुम्ही मोदकाच्या  सारणासाठी,  भाजी किंवा डाळीवर वरून घालण्यासाठी वापरू शकता.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स