Lokmat Sakhi >Food > थंडीमुळे कडधान्यांना लवकर मोड येत नाहीत? लांब मोड येण्यासाठी वापरा सोपी ट्रिक; मिळेल भरपूर पोषण

थंडीमुळे कडधान्यांना लवकर मोड येत नाहीत? लांब मोड येण्यासाठी वापरा सोपी ट्रिक; मिळेल भरपूर पोषण

How To Grow Long Sprout At Home : विशिष्ट पद्धतीने कडधान्य बांधली तरच मोड येण्याची क्रिया सुलभ होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 03:44 PM2023-01-20T15:44:48+5:302023-01-20T15:48:25+5:30

How To Grow Long Sprout At Home : विशिष्ट पद्धतीने कडधान्य बांधली तरच मोड येण्याची क्रिया सुलभ होते.

How To Grow Long Sprout At Home : Does the cold cause the pulses to turn early? Use a simple trick to get long Sprout; Get plenty of nutrition | थंडीमुळे कडधान्यांना लवकर मोड येत नाहीत? लांब मोड येण्यासाठी वापरा सोपी ट्रिक; मिळेल भरपूर पोषण

थंडीमुळे कडधान्यांना लवकर मोड येत नाहीत? लांब मोड येण्यासाठी वापरा सोपी ट्रिक; मिळेल भरपूर पोषण

Highlightsमोड आलेल्या कडधान्यातून शरीराला चांगले पोषण मिळण्यास मदत होते कडधान्याला चांगली ऊब मिळाली आणि मोड येण्यास जागा मिळाली तर मोड येण्याची क्रिया सुलभ होते.

कडधान्ये खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते त्यामुळे नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात आवर्जून कडधान्यांचा समावेश असावा असे सांगितले जाते. कडधान्ये प्रोटीन्स आणि इतरही अनेक घटकांचा उत्तम स्त्रोत असल्याने कडधान्ये खाल्ली जातात. कडधान्ये खायची म्हणजे ती भिजत घालणे हे सर्वात महत्त्वाचे काम असते. अनेकदा घाईगडबडीत आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो आणि मग स्वयंपाकाच्या काही तास आधी कडधान्य भिजत घालतो. यामुळे ते भिजतात पण त्यांना मोड येतातच असे नाही (How To Grow Long Sprout At Home). 

मोड आलेली कडधान्ये पचायला जास्त हलकी आणि शरीराला भरपूर पोषण देणारी असतात. त्यामुळे कडधान्यांना मोड आणण्याची क्रिया योग्य पद्धतीने केल्यास चांगले लांब मोड येतात. मात्र थंडीच्या दिवसांत हे मोड यायला वेळ लागतात. इतकेच नाही तर विशिष्ट पद्धतीने कडधान्य बांधली तरच मोड येण्याची क्रिया सुलभ होते. पाहूया कडधान्यांना मोड येण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरायला हवी . 

(Image : Google)
(Image : Google)

 
१. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये मूग, मटकी असे आपल्याला हवे ते कडधान्य भिजत घालायचे. 

२. ८ ते ९ तास कडधान्य चांगले भिजले की ते फुलतात. एका जाळीत घालून पूर्ण पाणी निथळून काढून टाकावे.

३. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून काही वेळ हे कडधान्य तसेच ठेवायचे. 

४. मग एक पातळ सुती फडके घेऊन त्यावर हे कडधान्य काढायचे. कडधान्य थोडे वाळलेले असल्याने हे फडके खालच्या बाजुने थोडे ओले करावे.

५. मग हे कडधान्य भिजवलेली पुरचुंडी एका चाळणीत ठेवून त्यावर एक झाकण ठेवावे. साधारण ७ ते ८ तास कडधान्य असेच ठेवावे, त्यामुळे त्याला चांगले मोड येतात.

६. ही चाळणी एका पातेल्यावर किंवा भांड्यावर ठेवावी. म्हणजे खालच्या बाजूने हवा मोकळी राहते आणि वरच्या बाजुनेही कडधान्याला चांगली उब मिळून मोड येण्यास मदत होते. 

Web Title: How To Grow Long Sprout At Home : Does the cold cause the pulses to turn early? Use a simple trick to get long Sprout; Get plenty of nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.