मोड आलेली कडधान्ये खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. यातून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात. त्यामुळे जे लोक शाकाहारी आहेत, त्यांनी प्रोटीन्ससाठी आठवड्यातून ३ वेळा तरी मोड आलेली कडधान्ये खायला पाहिजेत, असं आहारतज्ज्ञ नेहमीच सांगत असतात (Healthy food tips for winter). पण थंडीच्या दिवसात नेमकी पंचाईत होते कारण गारठ्यामुळे कडधान्यांना चांगले मोड येतच नाहीत (Tips and tricks for growing long sprouts). म्हणूनच ऐन हिवाळ्यातही कडधान्यांना छान लांबसडक मोड यावेत, यासाठी या काही टिप्स बघा.. (2 simple remedies for long and healthy sprouts in Marathi)
हिवाळ्यात कडधान्यांना चांगले मोड येण्यासाठी उपाय...
कडधान्यांना चांगले मोड येण्यासाठी त्यांना पुरेशी उब मिळणं आणि थोडं दमट वातावरण निर्माण करणं गरजेचं असतं. त्यामुळे ती अधिकाधिक उबदार आणि दमट वातावरणात कशी राहतील याची काळजी घेणं गरजेचं आहे.
बघा १ मिनिटांत कसं करायचं विकतसारखं चवदार केशर- बदाम दूध, गारेगार थंडीत प्या गरमागरम पौष्टिक दूध
कडधान्यांना मोड आणण्यासाठी सगळ्यात आधी कडधान्यं धुवून स्वच्छ करून घ्या आणि २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
त्यानंतर जवळपास ७ ते ९ तास कडधान्ये पाण्यात भिजत ठेवा. थंडीच्या दिवसांत थंड पाण्यात कडधान्ये भिजत घालण्याऐवजी काेमट पाण्यात भिजत घालावी. पण पाणी जास्त गरम करू नये.
कडधान्ये पाण्यात चांगली भिजली की पाणी काढून टाकावे. त्यानंतर कडधान्ये एका सुती जाडसर कपड्यावर चांगले पसरून ठेवावे. त्यांचा ओलसरपणा कमी झाला की त्यानंतर ते एका चाळणीत टाकावे. पुरणाची जाळी वापरली तरी चालते. ही जाळी ज्या भांड्यावर अगदी घट्ट बसू शकते, असे एखादे भांडे जाळीच्या खाली ठेवावे.
त्या जाळीवर आता कडधान्ये पसरवून टाका. खूप दाटीवाटीने टाकू नका, तसेच खूप मोकळे- मोकळेही ठेवू नका. यानंतर त्या कडधान्यांवर एक सुती कपडा ओलसर करून टाकावा. त्यावर एक प्लेट झाकून ठेवावी. ती प्लेट अगदी पॅक बसेल याची काळजी घ्या. यानंतर पुढच्या ७ ते ८ तासांत कडधान्यांना खूप छान मोड आलेले असतील.
असा उपायही करून पाहा..
हिवाळ्यात कडधान्यांना चांगले मोड येण्यासाठी कडधान्ये आणि मेथ्या एकत्र भिजत घाला. साधारण एक वाटी कडधान्ये असतील तर त्यात १ ते २ टीस्पून मेथ्या घाला. मेथ्यांमुळेही कडधान्यांना खूप चांगले मोड येतात.