Join us  

फक्त ५ मिनिटांत नारळ फोडून आणि खवूनही होईल! खरं नाही वाटतं? पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 1:32 PM

How to Hollow Out a Coconut : नारळ फोडण्याची तसंच खवण्याची युनिक ट्रिक या व्हिडिओमध्ये पाहूया. यामुळे तुमचं काम सोपं होईल आणि कमी वेळात स्वादीष्ट पदार्थ तयार होतील.

नारळ फोडणं, किसणं म्हणजे खूपच किचकट काम.  नारळ फोडण्यापासून किसण्यापर्यंत तासनतास घालवावे लागतात.  अनेकांना स्वंयपाकात ओलं खोबरं रोजच लागतं. (How to Peel Coconut Easily) डाळींपासून भाज्यांपर्यंत अगदी गोड पदार्थांमध्येही चवीसाठी ओलं खोबरं वापरलं जातं. नारळ फोडण्याची तसंच किसण्याची युनिक ट्रिक या व्हिडिओमध्ये पाहूया. यामुळे तुमचं काम सोपं होईल आणि कमी वेळात स्वादीष्ट पदार्थ तयार होतील. (Easy Tricks for Peel Coconut Easily) 

नारळ फोडण्याच्या सोप्या ट्रिक्स

१) सगळ्यात आधी नारळाचे वरचे केस काढून घ्या. नारळाला तीन डोळे असतात. या तीन डोळ्यांपैकी एक डोळा अतिशय मऊ असतो. मऊ डोळ्यात स्क्रू ड्रायव्हरसारखे टोचून त्यातून पाणी बाहेर काढा. 

२) गॅसवर खोबरं मोठ्या आजेवर गरम करा. स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने नारळ फिरवा. जेणेकरून व्यवस्थित भाजलं जाईल.

वरण-भातासह तोंडी लावण्यासाठी करा खमंग बटाटा तवा फ्राय, जमेल फक्कड बेत - सोपी रेसिपी

३) नारळ गॅसवर गरम केल्यानंतर हळूहळू ते फुटेल. फुटल्यानंतरही काही सेकंद उच्च आचेवर ठेवा आणि सगळ्या बाजूनं व्यवस्थित गरम करून घ्या जेणेकरून सहज सोललं जाईल.

४) गरम नारळावर थंड पाणी घाला.  नारळाचं तापमान थोडं कमी झाल्यानंतर हळूहळू सगळ्या बाजूनं सोलून घ्या.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स