Lokmat Sakhi >Food > विकत आणलेली हळद शुद्ध आहे की भेसळ? घरच्याघरी ओळखा हळदीची शुद्धता-पाहा ३ सोप्या टिप्स

विकत आणलेली हळद शुद्ध आहे की भेसळ? घरच्याघरी ओळखा हळदीची शुद्धता-पाहा ३ सोप्या टिप्स

How To Identify Adulterated Turmeric?: रोजच्या स्वयंपाकात वापरून तुम्ही जी हळद खात आहात ती शुद्ध आहे की भेसळीची हे ओळखण्यासाठी या काही टिप्स पाहा...(3 tips to identify purity of turmeric or fake haldi powder)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 02:34 PM2024-09-25T14:34:40+5:302024-09-25T17:04:02+5:30

How To Identify Adulterated Turmeric?: रोजच्या स्वयंपाकात वापरून तुम्ही जी हळद खात आहात ती शुद्ध आहे की भेसळीची हे ओळखण्यासाठी या काही टिप्स पाहा...(3 tips to identify purity of turmeric or fake haldi powder)

how to identify adulterated turmeric, 3 tips to identify purity of turmeric or fake haldi | विकत आणलेली हळद शुद्ध आहे की भेसळ? घरच्याघरी ओळखा हळदीची शुद्धता-पाहा ३ सोप्या टिप्स

विकत आणलेली हळद शुद्ध आहे की भेसळ? घरच्याघरी ओळखा हळदीची शुद्धता-पाहा ३ सोप्या टिप्स

HighlightsFood Safety and Standards Authority of India (FSSAI) यांनी हळदीमध्ये केली जाणारी भेसळ ओळखण्यासाठी एक अगदी सोपी पद्धत सांगितली आहे.

सणासुदीचे दिवस सुरू झाले की अन्नपदार्थांमधली भेसळ वाढते. मागणी वाढली की त्यानुसार अधिकचा पुरवठा करण्यासाठी किंवा जास्तीचा नफा मिळविण्यासाठी काही जण असा चुकीचा मार्ग निवडतात. म्हणूनच ग्राहक म्हणून आपली फसवणूक होऊ नये म्हणून कोणताही पदार्थ विकत घेताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा दुकानांमध्ये कोणतंही लेबल नसलेला हळदीचा पुडा विकण्यासाठी ठेवलेला असतो. शुद्ध हळद या नावाखाली तो ग्राहकांच्या माथी मारला जातो. बऱ्याचदा तर तर नेहमीपेक्षा त्याची किंमतही अधिक असते. पण ती हळद खरंच शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे (how to identify adulterated turmeric). म्हणूनच या काही टिप्स पाहा आणि तुम्ही खात आहात ती हळद शुद्ध की भेसळीची हे लगेचच तपासून घ्या... (3 tips to identify purity of turmeric or fake haldi powder)

 

भेसळयुक्त हळद कशी ओळखायची?

१. Food Safety and Standards Authority of India (FSSAI) यांनी हळदीमध्ये केली जाणारी भेसळ ओळखण्यासाठी एक अगदी सोपी पद्धत सांगितली आहे. यासाठी एक स्वच्छ काचेचा ग्लास घ्या.

कतरिना कैफ सांगते लिपस्टिक लावण्याची तिची खास पद्धत- म्हणते मी कधीच लिपस्टिक ओठांवर....

त्या ग्लासमध्ये पाणी टाका. नंतर त्यामध्ये १ टीस्पून हळद टाका. काही वेळाने ग्लासमधल्या पाण्याचं निरिक्षण करा. जर पाण्याला गडद पिवळा, केशरी रंग आला असेल तर ती हळद भेसळीची आहे. शुद्ध हळदीच्या पाण्याला हलकासा पिवळा, सोनेरी रंग येतो.

 

२. जेव्हा आपण वरीलपद्धतीने हळदीची तपासणी करतो तेव्हा जी हळद शुद्ध असते ती हळूहळू ग्लासच्या तळाशी जमा होते. तर भेसळयुक्त हळद पाण्यात तरंगताना दिसते. त्यापैकी खूपच कमी हळद ग्लासच्या तळापर्यंत जाते.

वजन कमीच होत नाही? रोज फक्त १० मिनिटांचा व्यायाम- आठवडाभरात १- २ किलो वजन उतरेल

३. एका ग्लासमध्ये एक चमचा हळद घ्या. त्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवा. जर मिश्रणाचा रंग बदलून गुलाबी झाला तर हळदीमध्ये मेटानिल हे रसायन टाकून तिला पिवळा रंग देण्यात आला आहे, हे लक्षात घ्या. ती हळद शुद्ध नाही. 
 

Web Title: how to identify adulterated turmeric, 3 tips to identify purity of turmeric or fake haldi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.