दुधापासून तयार होणारं पनीर हा एक भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीन्स देणारा पदार्थ म्हणून ओळखला जातो. आहारतज्ज्ञही आठवड्यातून एकदा पनीर खाण्याचा आणि लहान मुलांनाही खाऊ घालण्याचा सल्ला देतात. बरीच लहान मुलं तर पनीर पराठे, पनीर पकोडे, पनीरची भाजी असे पनीरचे वेगवेगळे पदार्थ आवडीने खातात. पण आपण हेल्दी म्हणून खातो, ते पनीर खरोखरच आरोग्यदायी आहे ना, त्यात युरिया, डिटर्जंट अशा घातक पदार्थांची भेसळ तर केलेली नाही ना, हे एकदा तपासून पाहायलाच पाहिजे. कारण बाजारात बऱ्याचदा भेसळयुक्त पनीर आढळून येते. (How to identify adulteration in paneer?)
पनीरमधली भेसळ कशी ओळखायची?
१. पनीरचा एक लहानसा तुकडा तुमच्या हातात घेऊन दाबून पाहा. जर दाबल्यानंतर त्याचे लहान- लहान तुकडे होत असतील तर ते भेसळीचं पनीर आहे.
२. एका पातेल्यात पाणी घ्या. त्यात थोडं पनीर टाका आणि पाणी उकळायला ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा. आणि पाणी काेमट होऊ द्या. त्या पाण्यात आयोडीनचे काही थेंब टाका. जर पनीरचा रंग नीळसर झाला तर ते पनीर भेसळीचं आहे.
३. एका पातेल्यात पाणी घ्या आणि त्यात पनीरचा तुकडा टाकून ते पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. आता त्या पाण्यात तुरीच्या डाळीचं पीठ टाका. जर १० मिनिटांनी पनीरचा रंग लालसर झाला तर त्यामध्ये भेसळ आहे.
काय सांगता विद्या बालनकडे आहेत फक्त २५ साड्या? आणि त्या साड्याही अशा आहेत की....
४. बाजारात सुटे पनीर विकणारेही अनेक असतात. जर तसं पनीर घेत असाल तर ते खरेदी करण्यापुर्वी थोडं खाऊन पाहा. जर ते वातड आणि थोडं आंबूस चवीचं असेल तर ते भेसळीचं आहे.