गव्हाचं पीठ अगदी घरोघरी खाल्लं जातं. ज्वारी, बाजरी या धान्यांचं पीठ एकवेळ नसेल. पण गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक मात्र प्रत्येक घरात असतेच. अगदी सकाळ संध्याकाळ त्या कणकेच्या गरमागरम पोळ्या करून खाल्ल्या जातात. पण गव्हाचं दळण करण्यासाठी अनेकींकडे वेळ नसतो. गहू निवडणे, मग गिरणीत जाऊन ते दळायला देणं, पुन्हा दळण गिरणीतून घेऊन येणं हे अनेकींना वेळखाऊ वाटतं. त्यामुळे मग हल्ली बऱ्याच वर्किंग वुमन एवढे सगळे सोपस्कार करण्यापेक्षा सरळ दुकानात जातात आणि ५ किलो, १० किलो किंवा जसं लागेल तसं गव्हाचं पीठ विकत घेऊन येतात. पण हे विकत मिळणारं गव्हाचं पीठ भेसळीचं तर नाही ना हे एकदा तपासून घ्या (Adulteration In Wheat Aata). कारण गव्हाच्या पिठातही भेसळ होत असल्याचा अहवाल FSSAI म्हणजेच Food Safety And Standard Authority Of India यांनी दिला आहे.(according to FSSAI guidelines how to check purity of wheat flour at home?)
गव्हाच्या पिठातली भेसळ कशी ओळखायची?
गव्हाच्या पिठातली भेसळ कशी ओळखावी याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ FSSAI ने सोशल मिडियावर शेअर केला आहे.
फक्त ३ गोष्टी करा- केसांच्या सगळ्या तक्रारी गायब! केस होतील दाट-काळेभोर, आयुर्वेदिक सल्ला
तुम्हाला घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने गव्हामधली भेसळ ओळखता येईल. त्यासाठी कोणत्याही लॅबमध्ये जाण्याची गरज नाही.
हा प्रयोग करण्यासाठी एक काचेचा ग्लास घ्या आणि त्यामध्ये साधारण अर्धा ग्लास भरेल एवढे पाणी टाका.
Is your wheat flour pure? Watch this quick test to detect if it's adulterated with bran. Stay alert, stay healthy and ensure what you’re consuming is pure and safe. #NoToAdulteration#FSSAI@MoHFW_INDIApic.twitter.com/lO1bPdRp8a
— FSSAI (@fssaiindia) November 2, 2024
पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये १ चमचा कणिक टाका आणि ती चमच्याने हलवून घ्या.
बाथरुममध्ये कुबट- दमट वाटतं? 'ही' रोपं बाथरुमच्या कोपऱ्यात ठेवा, कोंदटपणा कमी होऊन फ्रेश वाटेल
आता चमच्याने हलविल्यानंतर बरीच कणिक ग्लासच्या तळाशी जाऊन बसेल.
यानंतरही जर तुम्हाला पाण्यावर कणकेचे बरेच कण तरंगताना दिसले तर ती कणिक भेसळीची आहे हे ओळखा. कारण जी कणिक शुद्ध असते तिचे खूपच कमी कण पाण्यावर तरंगताना दिसतात.