तूप आरोग्यासाठी किती फायद्याचं आहे, हे तर आपण जाणतोच. आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य वाढीसाठीही तुपाचा उपयोग होतो. त्यामुळेच तर महागडं असलं तरी आपण तूप घेतोच. रोजच्या जेवणात थोडंसं का असेना पण तूप हमखास असतंच. आता दुकानांमध्ये चांगल्या ब्रॅण्डचं पॅकबंद डब्यात तूप मिळतं. पण सुटं तूप विकणारेही खूप असतात. हे तूप घरी केलेलं आहे, शुद्ध आहे, असं सांगून त्याची विक्री केली जाते (How to identify adulteration of ghee at home?). आपणही बऱ्याचदा विक्रेत्यांच्या बोलण्यात येतो आणि अव्वाच्या सव्वा किंमत मोजून त्या तुपाची खरेदी करतो. (4 tips to check the purity of ghee)
पण एवढे जास्त पैसे खर्च करून शुद्ध म्हणून आपण जे तूप खरेदी केलं आहे, ते खरोखरच शुद्ध आहे की नाही, हे एकदा तपासून घेतलेलंच बरं. त्यासाठी ते तूप अगदी थोड्या प्रमाणात खरेदी करा.
घरगुती साधनांचा वापर करून त्या तुपाच्या शुद्धतेची घरीच परिक्षा करा आणि नंतर खात्री पटल्यावरच अधिकचं तूप खरेदी करा. आपण घरी आणलेलं तूप शुद्ध आहे की भेसळीचं आहे, हे कसं ओळखायचं याविषयीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या sehatkikunjii या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये देण्यात सांगण्यात आलेले प्रयोग अगदी सोपे आणि आपल्याला सहज करता येतील असे आहेत.
तुपाची शुद्धता ओळखण्याच्या पद्धती
१. एका वाटीत पाणी घ्या. त्यात १ टीस्पून तूप टाका. जर तूप टाकल्यावर लगेचच वाटीच्या तळाशी जाऊन बसलं तर ते भेसळीचं आहे.
सानिया मिर्झाचा नवाबी थाट! परिणितीचा लग्नात घातलेल्या घागऱ्याची किंमत तब्बल ४.५ लाख...
२. एका वाटीत वितळलेलं कोमट तूप घ्या. त्यात अर्धा टीस्पून मीठ टाका. काही वेळाने तुपाचा रंग बदलला तर ते भेसळीचं आहे.
३. एका वाटीत वितळलेलं कोमट तूप घ्या. त्यात अर्धा टीस्पून पिठीसाखर टाका. काही वेळाने तुपाचा रंग बदलला नाही, तर ते शुद्ध तूप आहे.
४. वितळलेलं तूप एका काचेच्या वाटीत भरा. ती वाटी एका तासासाठी फ्रिजरमध्ये ठेवून द्या. त्यानंतर बाहेर काढा. जर तूप एकसंध न दिसता त्यामध्ये वेगवेगळे थर दिसले तर ते तूप भेसळीचं आहे.