Join us  

भेसळयुक्त पनीर कसे ओळखावे ? ३ सोप्या घरगुती ट्रिक्स, शुद्ध पनीर ओळखा झटपट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2024 7:40 PM

How to Identify Fake ‘Paneer’ At Home 3 Simple Tests : हेल्दी आहे म्हणून पनीर खाताय पण त्यातली भेसळ आरोग्याला हानिकारक ठरु शकते, ही भेसळ कशी ओळखावी यासाठी टिप्स...

'पनीर' हा असा एकमेव पदार्थ आहे जो सगळ्यांनाच आवडतो. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच पनीर खाणे पसंत करतात. घरी खास बेत असला किंवा काही खास प्रसंग असला की हमखास पनीरची एक तरी डिश बनवली जाते. अशावेळी आपण पनीर बाहेरून विकत आणतो किंवा घरीच दुधापासून पनीर तयार करतो. बाहेरुन विकत आणलेले पनीर चांगलेच असेल असे नाही. काहीवेळा हे पनीर खराब असते तर कधी ते शुद्ध नसून त्यात भेसळ केलेली असते. अशा भेसळयुक्त किंवा खराब झालेल्या पनीरपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो(How to check the quality of paneer at home?)

घरी बनवलेले पनीर हे कायम फ्रेश व चांगले असते. या पासून बनवले जाणारे पदार्थ हे चवीला अतिशय छान लागतात. याउलट विकतचे पनीर आणले तर ते काहीवेळा खराब किंवा नासलेले असते. खरंतर गरमी आणि पावसाळ्यात अन्नपदार्थ खराब होण्याची शक्यता ही जास्त असते. त्याचबरोबर पनीर योग्य पद्धतीने स्टोअर करुन ठेवले नाही तरी ते खराब होऊ शकते. विकतचे पनीर आणल्यावर ते काहीवेळा फारच रुक्ष आणि कठीण असते. तर काहीवेळा त्यातून आंबट दुर्गंधी येऊन ते अधिक चिकट होते. विकत आणलेले पनीर शुद्ध आहे की भेसळयुक्त ? तसेच पनीर नासलेले तर नाही ना ते चांगल्या दर्जाचे (How to check paneer quality at home) आहे का हे तपासून पाहण्यासाठी काही खास टिप्स( 3 Simple Ways To Check The Purity Of Paneer At Home).

पनीर भेसळयुक्त आहे की नाही , असे तपासून पाहा... 

१. खराब झालेले किंवा नासलेले पनीर खाल्ल्याने आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. भेसळयुक्त पनीरमध्ये हानिकारक पदार्थ किंवा आरोग्याला अपायकारक ठरतील असे घटक असू शकतात. ज्यामुळे ते खाऊन आपण आजारी पडू शकतो. जेव्हा आपण पनीर खरेदी करता तेव्हा प्रथम त्याचा रंग काळजीपूर्वक पाहा. जर ते पांढरे किंवा ऑफ - व्हाइट रंगाचे असेल तर ते पनीर शुद्ध आहे. त्याचबरोबर ते पनीर हातात घेतल्यावर हाताला गुळगुळीत, मुलायम लागले तर ते चांगले फ्रेश आहे असे समजावे. जर पनीर हलके गुलाबी किंवा हिरवे दिसले तर ते अजिबात विकत घेऊ नये, असे पनीर भेसळयुक्त असू शकते. 

२. पनीर विकत घेताना ते थोडेसे बोटांनी कुस्करुन पाहावे, जर ते आतून भुसभुशीत, दाणेदार असेल तर ते पनीर शुद्ध असते. पनीर अतिशय मऊ किंवा कडक असेल तर ते घेणे टाळावे. शुद्ध पनीर मऊ असले तरीही ते किंचित घट्ट असते. 

साऊथ इंडियन पारंपरिक मुरुक्कु करण्याची सोपी रेसिपी, पावसाळ्यात चहासोबत मुरुक्कू खा, अनुभवा मौसम का जादू...

३. पनीर थोडेसे खाऊन बघावे जर ते अधिक आंबट लागत असेल तर ते शिळे असू शकते. शुद्ध पनीरचा सुगंध हा सौम्य दुधा सारखा येतो, त्याचप्रमाणे त्याची चव ही दुधाच्या चवीप्रमाणेच असते. जर पनीर मधून खूप आंबट दुर्गंध येत असेल तर असे पनीर घेणे टाळावे. 

४. आपण घरच्या घरी एक झटपट सोपी ट्रिक वापरुन पनीरची शुद्धता ओळखू शकतो. यासाठी एक ग्लास पाण्यांत पनीरचा एक छोटासा तुकडा टाकून बघावा. शुद्ध पनीर पाण्यात बुडून ग्लासच्या तळाशी जाईल. त्याचप्रमाणे हे पनीर पाण्यात विरघळणार नाही किंवा त्याचे तुकडे पडणार नाही. याउलट भेसळयुक्त पनीर पाण्यावर तरंगते, त्याचे तुकडे पडू शकतात किंवा ते पाण्यात विरघळू शकते. 

कोकणात करतात तशी अस्सल पारंपरिक कुळथाची पिठी करा, पावसाळ्यात जेवणाचा बेत जमेल झक्कास!

५. पनीरचा छोटा तुकडा घेऊन तो गरम तव्यावर काही मिनिटांसाठी ठेवून द्या. पनीर जर शुद्ध असेल तर ते गरम होऊन त्यातील जास्तीचे पाणी बाहेर टाकेल. त्याचबरोबर त्या तुकड्याचा शेप न बिघडता तो आहे तसाच राहील. याउलट, भेसळयुक्त पनीरच्या तुकड्याचा शेप बिघडेल व ते कोरडे पडेल. 

६. पाण्यात पनीरचा तुकडा घालून ते पाणी उकळवून घ्यावे. त्यानंतर त्यात आयोडीन टिंचरचे काही थेंब घालावेत. त्यानंतर जर या पनीरचा रंग निळा झाला तर असे पनीर बनवताना त्यात स्टार्च मिसळले आहे असे समजावे. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स