Lokmat Sakhi >Food > विकत आणलेले पनीर भेसळयुक्त असेल तर? ४ ट्रिक्स-२ मिनिटांत ओळखा पनीर आहे की पांढरा भुसा

विकत आणलेले पनीर भेसळयुक्त असेल तर? ४ ट्रिक्स-२ मिनिटांत ओळखा पनीर आहे की पांढरा भुसा

How to Identify Fake 'Paneer' At Home? 4 Simple Tests : घरबसल्या बनावट पनीर कसे ओळखायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2024 01:26 PM2024-06-03T13:26:51+5:302024-06-03T13:28:42+5:30

How to Identify Fake 'Paneer' At Home? 4 Simple Tests : घरबसल्या बनावट पनीर कसे ओळखायचे?

How to Identify Fake 'Paneer' At Home? 4 Simple Tests | विकत आणलेले पनीर भेसळयुक्त असेल तर? ४ ट्रिक्स-२ मिनिटांत ओळखा पनीर आहे की पांढरा भुसा

विकत आणलेले पनीर भेसळयुक्त असेल तर? ४ ट्रिक्स-२ मिनिटांत ओळखा पनीर आहे की पांढरा भुसा

भारतामध्ये अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे सामान्य आहे (Fake Paneer). अधिक नफा मिळविण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये अशी घातक रसायने मिसळली जातात. अलीकडेच देशातील दोन टॉप मसाला ब्रँडच्या विक्रीमध्ये बंदी आणली होती (Kitchen Tips). ही बातमी ताजी असतानाच नुकतंच, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी डेहराडून चार धाम यात्रा मार्गावरील, काही दुकानातील पनीरचे काही नमुने तपासले (Paneer Test). यावेळी त्यांनी ५ क्विंटल नकली पनीर नष्ट केले. पण मग सामान्यांना असा प्रश्न पडतो की, नकली पनीर ओळखावा कसा?(How to Identify Fake 'Paneer' At Home? 4 Simple Tests).

नकली पनीर कसे बनवले जाते?

दुधाच्या पावडरमध्ये पाणी मिसळून भेसळयुक्त पनीर बनवले जातात. त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि व्हिनेगर देखील घातले जाते. पनीर गुळगुळीत आणि चमकदार दिसण्यासाठी त्यात पाम तेल मिक्स केले जाते. अशा प्रकारे भेसळयुक्त पनीर तयार करून बाजारात सर्रास विक्री केली जाते. पण मग भेसळयुक्त पनीर नेमका ओळखावा कसा?

भेसळयुक्त पनीर ओळखण्याची सोपी ट्रिक

पोट, मांड्या-दंड थुलथुलीत दिसतात? 'इवल्याशा' बिया कमी करू शकतात तुमचं वजन..पण कसे?

मॅश करून पनीर ओळखा

आपल्या स्वच्छ हातांनी पनीर मॅश करून, भेसळयुक्त पनीर ओळखू शकता. भेसळयुक्त पनीरमध्ये दूध पावडरचा वापर केला जातो. भेसळयुक्त पनीरला हलक्या हाताने दाब दिल्याने लगेच मॅश होते. तर, असली पनीर लवकर मॅश होत नाही. ते थोडे कडक असते.

आयोडीन टेस्ट

पनीर असली आहे की भेसळयुक्त, यासाठी आपण आयोडीन टेस्ट घेऊ शकता. यासाठी कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात पनीर घालून उकळवण्यासाठी ठेवा. काही वेळानंतर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यानंतर त्यात आयोडीनचे काही थेंब टाका. जर पनीरचा रंग निळा झाला तर, समजून जा पनीरमध्ये भेसळ आहे.

तूरडाळीचा वापर

तूरडाळीच्या वापरानेही आपण भेसळयुक्त पनीर ओळखू शकता. कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात पनीर घाला. पाणी थंड झाल्यावर त्यात थोडी तूरडाळीची पावडर घालून मिक्स करा. १० मिनिटानंतर पनीरचा रंग लाल झालेला पाहायला मिळाला तर, समजून जा पनीरमध्ये भेसळ आहे. त्यात डिटर्जंट किंवा युरिया मिसळले असावे.

पानं सतत पिवळी? रोपांना फळं - फुलंच येत नाही? उरलेल्या चहापत्तीचा करा 'असा' उपयोग'; झाड बहरेल

टेस्ट करून पनीर ओळखा

पनीर खरेदी करण्यापूर्वी नेहमी छोटासा तुकडा चाखून बघा. जर पनीर चवीला आंबट लागत असेल तर, पनीर भेसळयुक्त असू शकते. 

Web Title: How to Identify Fake 'Paneer' At Home? 4 Simple Tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.