Join us  

तुम्ही घेतलेला लसूण हायब्रीड आहे की गावरान? लसणाची खरेदी करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2024 2:59 PM

Shopping Tips For Lasun Or Garlic: आपण खरेदी केलेला लसूण हायब्रीड आहे की गावरान आहे, हे ओळखणं अगदी सोपं आहे... त्यासाठीच या काही गोष्टी बघून घ्या. (How to identify hybrid garlic)

ठळक मुद्देआपण खरेदी करतो आहोत तो लसूण हायब्रीड आहे की गावरान आहे, याची एकदा खात्री करून घ्यायलाच पाहिजे.

वरण, भाजी या आपल्या नेहमीच्याच पदार्थांना जेव्हा लसणाचा खमंग तडका लागतो, तेव्हा त्या पदार्थाची चवच बदलून जाते. कोणत्याही पदार्थाला अधिक खमंग आणि चवदार करायचं असेल तर त्यासाठी आपण हमखास लसूण वापरतोच. एखाद्या पदार्थाला येणारा लसणाचा सुगंधच असा असतो, की तो घेऊनच तो पदार्थ खाण्याचं टेम्पटेशन होतं. लसूण अतिशय आरोग्यदायीही आहे. पण हल्ली बाजारात हायब्रीड आणि गावरान अशा दोन्ही पद्धतीचे लसूण मिळतात. हायब्रीड लसूणामध्ये गावरान लसूणाइतकं पोषणमुल्य नसतं. म्हणूनच आपण खरेदी करतो आहोत तो लसूण हायब्रीड आहे की गावरान आहे (Shopping Tips For Lasun Or Garlic), याची एकदा खात्री करून घ्यायलाच पाहिजे. (How to identify difference between hybrid garlic and gavraan lasun in marathi?)

गावरान आणि हायब्रीड लसूण ओळखण्याच्या टिप्स

 

१. गावरान लसूण हा आकाराने लहान असतो तर हायब्रीड लसूण आकाराने मोठा, टपोरा आणि बघताक्षणीच ग्राहकांना आकर्षित करून घेईल असा असतो.

स्नेक प्लांट घरात असण्याचे ३ जबरदस्त फायदे, एखादं तरी स्नेक प्लांट आपल्याकडे असावंच, कारण......

२. हायब्रीड लसूणाचा रंग शुभ्र, चमकदार पांढरा असतो. तर गावरान लसूणामध्ये एक हलकीशी निळसर, जांभळट रंगाची छटा असते.

 

३. लसूण हातात घेतल्यावर ज्याला सुवास येईल, तो लसूण गावरान आहे. हायब्रीड लसूणाला खूप सुगंध नसतो. त्याउलट गावरान लसूणाचा सुगंध अधिक स्ट्राँग असतो आणि तो अधिक तिखट असतो. 

लग्न-मुंजीसाठी सुंदर मुंडावळी घ्यायच्या? बघा ७ लेटेस्ट डिझाईन्स- मुंडावळ इतकी सुंदर की..

४. लसूणाच्या एका बाजुला मुळं असतात. ज्या लसूणाची मुळं काळी किंवा गडद चॉकलेटी रंगाची असतात, तो लसूण खरेदी करावा. मुळांचा रंग जर लसूणाच्या टरफलासारखाच पांढरा, पिवळसर असेल तर तो गावरान लसूण नाही. 

५. हायब्रीड आणि गावरान लसणातला आणखी एक मुख्य फरक म्हणजे हायब्रीड लसूण गावरान लसूणापेक्षा स्वस्त असतो.

 

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सखरेदी