आंब्याची ओळख फळांचा राजा म्हणून आहे. आंब्याची चव कोणाला आकर्षित करत नाही. उन्हाळा सुरु झाला की, आंब्याचा हंगाम सुरु होतो. आंब्यामध्ये देखील विविध प्रकार आहेत. मात्र, हापूस आंबा फार फेमस आहे. आंब्याची रसाळ चव चाखण्यासाठी लोकं संपूर्ण वर्ष वाट बघतात. आंब्याचा चढता भाव कितीही असो, हौशी लोकं आंबा खरेदी करून मिटक्या मारत खातात.
आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, फायबर आणि व्हिटॅमिन सी आढळते. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. पण काही आंब्यांपासून सावध राहणे उत्तम ठरेल. बरेच व्यापारी जास्त नफा मिळवण्यासाठी रसायने आणि कार्बाइडचा वापर करतात. जर आपण ते खाल्ले तर शरीरासाठी हानिकारक ठरू शकते(How to identify that the mango is naturally ripen or artificially).
कच्चा आंबा घरी कसा पिकवावा?
काही लोकं आंब्याची पेटी घरी आणतात. त्यात काही पिकलेले तर काही कच्चे आंबे असतात. आपल्याला जर घरच्या घरी आंब्याला नैसर्गिकरित्या पिकवायचे असेल तर, त्यांना गरम ठिकाणी ठेवा. जसे की पोती, भुस्सा असलेलं खोकं, पण त्यात कार्बन मोनॉक्साईड, ॲसिटिलीन वायू यांसारख्या गोष्टींचा वापर केल्यास ते धोकादायक ठरते.
दूध प्यायल्याने वजन वाढते की कमी होते? वजन कमी करताना दूध पिणे फायद्याचे की...
रसायनयुक्त आंबा खाल्ल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम
नैसर्गिकरित्या व रसायनयुक्त आंब्यामध्ये फरक असतो. रसायनयुक्त आंबे खाल्ल्याने मज्जासंस्थेचे नुकसान होते. शिवाय त्वचेचा कर्करोग, कोलन कर्करोग, मेंदूच्या निगडीत आजार, गर्भाशयाचा कर्करोग, अशा बरेच प्रकारचे आजार व्यक्तीला छळू शकतात. यासाठी रसायनयुक्त आंबे ओळखून त्यांना वेळीच खाणे टाळा.
रासायनिक आंबे कसे ओळखाल?
१. आपण बऱ्याचदा आंब्याचा वास घेऊन त्याची खरेदी करतो. त्याचप्रमाणे आंब्याचा वास घ्या, कार्बाइडने पिकवलेला आंबा असेल तर त्याचा तीव्र वास येईल.
२. रसायनयुक्त आंबे खाल्ल्याने ॲस्ट्रिंजंटची चव येईल, रसायन नसेल तर नैसर्गिक चव येईल.
दही आणि योगर्ट यात काय फरक असतो? योगर्ट खाण्याचे फायदे कोणते? त्याने वजन कमी होते?
३. केमिकलने पिकवलेला आंबा काही ठिकाणी पिवळा दिसेल, तर कुठे हिरवा दिसेल. आंबा खरेदी करताना त्याचा रंग पाहून खरेदी करा.
४. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग सगळीकडून सारखाच दिसतो.
५. रासायनिक आंबा कापल्यानंतर, त्याच्या आत हिरवे किंवा पांढरे डाग दिसतात. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा आतून पिवळा दिसतो.