Join us  

बदाम विकत घेताना ४ गोष्टी तपासा; नकली आणि उत्तम क्वालिटीच्या बदामातला फरक लगेच कळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 2:18 PM

Diwali 2023 Tips to Identify Real and Fake Dry Almonds : अस्सल ड्रायफ्रुट्स आणि भेसळयुक्त ड्रायफ्रुट्स यातला फरक ओळखणं कठीण असतं.

आजकाल मार्केटमध्ये बरेच पदार्थ बनावट किंवा भेसळयुकक्त असलेले पाहायला मिळतात.  खाण्यापिण्याच्या पदार्थांतही बरीच भेसळ झालेली पाहायला मिळते. (Diwali 2023) असे पदार्थ खाल्ल्याने तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. (Tips to Identify Real and Fake Dry Alm0nds) दिवाळीत ड्रायफ्रटुस मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. (Nakli badam kase olkhayche) अशात अस्सल ड्रायफ्रुट्स आणि भेसळयुक्त ड्रायफ्रुट्स यातला फरक ओळखणं कठीण असतं. काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही या बदामातील फरक ओळखून घरी चांगल्या क्वाटिलिटीचेच बदाम घरी आणू शकता. (Tips And Tricks To Identify Real And Fake Dry Fruits)

भेसळयुक्त बदाम कसे ओळखावेत?

1) बदामात भरपूर पोषण असते. पण अनेकदा आपण भेसळयुक्त बदाम घरी आणतो ज्यामुळे शरीराला त्याचा पुरेपूर फायदा मिळत नाही. ड्रायफ्रुट्समध्ये भेसळ केली जाते. भेसळयुक्त आणि चांगले बदाम ओळखण्याचा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे हातांनी रगडून तपासा. बदाम घासल्यानंतर किंवा रगडल्यानंतर त्याचा रंग निघून जात अससेल तर समजून घ्या की बदाम बनावट आहेत. असे बदाम बनवण्यासाठी केमिकल्सयुक्त पावडर शिंपडली जाते.

दिवाळीसाठी खमंग मक्याचा चिवडा फक्त १५ मिनिटांत करा; चटपटीत चिवड्याची सोपी रेसिपी

२) बदामाच्या रंगावरूनही तपासू शकता. अस्सल बदामाचा रंग ब्राऊन असतो तर नकली बदामाचा रंग खूपच जास्त डार्क असतो. याशिवाय  जर तुम्ही बदाम विकत घेताना कन्फ्यूज होत असाल तर काहीवेळ बदाम एका पांढऱ्या कागदात दाबून ठेवा. बदामातून तेल बाहेर येऊन कागद तेलकट झाला असेल तर समजून जा  की बदाम असली आहे. 

3) बनावट बदाम तुम्ही पॅकींगवरूनही ओळखू शकता. दोन्ही बदाम  विकत घेताना पाकीटावर लिहिलेला मजकूर व्यवस्थित वाचून घ्या.  केमिकल्सयुक्त बदाम खाल्ल्यानं शरीराला पोषण तर मिळणार नाही पण इतर आजारही होण्याचा धोका जास्त असतो.  म्हणून भेसळयुक्त पदार्थ खाणं टाळा.

१ किलो भाजणीची चकली- कुरकुरीत, काटेरी चकलीसाठी पिठात 'हा' पदार्थ मिसळा; परफेक्ट बनेल

भेसळयुक्त मनुके कसे ओळखाल

4) मनुके फ्रेश दिसण्यासाठी त्यात कॅनोला तेलाचे कोटींग केले जाते. जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत. असे बदाम अजिबात फ्रेश नसतात. तेलाचा इफेक्ट कमी झाल्यानंतर त्यातून वास येऊ लागतो. अनेकदा खराब मनूके उन्हात सुकवून पुन्हा विकले जातात. म्हणून विकत घेताना मनुक्यांचा वास घेऊन पाहा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससुंदर गृहनियोजनदिवाळी 2023