Jaggery Purity Test : प्रत्येक भारतीय किचनमध्ये गूळ असतोच. कारण गुळाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. गूळ गोड चव आणि पोषणाचं प्रतीक मानला जातो. वेगवेगळ्या उत्सवांदरम्यानही गुळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पण बाजारात मिळणारा गूळ शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखाल? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. कारण आजकाल बाजारात भेसळयुक्त गूळ भरपूर विकला जातो.
भेसळ असल्यानं गुळातून त्याचे नॅचरल तत्व नष्ट होतात आणि असा गूळ आरोग्यासाठी नुकसानकारकही ठरू शकतो. अशात शुद्ध गुळाची ओळख पटवणं फार गरजेचं होऊ बसतं. अशात कोणत्या पद्धतीने शुद्ध आणि भेसळयुक्त गुळाची ओळख पटवावी हे जाणून घेऊ.
१) रंगावर द्या लक्ष
शुद्ध गुळाचा रंग हलका भुरका किंवा सोनेरी पिवळसर असतो. जर गूळ जास्त चमकदार आणि आकर्षक दिसत असेल तर त्यात आर्टिफिशिअल रंग मिसळला असण्याची शक्यता असते. टेस्ट करण्यासाठी गुळाचा एक छोटा तुकडा पाण्यात विरघळू द्या. जर पाण्याचा रंग बदलला तर त्यात रंग मिसळला असं समजा. शुद्ध गूळ रंग न सोडता पाण्यात विरघळतो.
२) चाक पावडर आणि सोडा भेसळ
गुळात वजन वाढवण्यासाठीही कधी कधी चाक पावडर किंवा वॉशिंग सोडा मिक्स केला जातो. यांची ओळख पटवण्यासाठी गुळाचा एक तुकडा पाण्यात टाका. जर ग्लासमध्ये खाली काही पांढरे कण दिसत असतील तर त्यात भेसळ असू शकते. शुद्ध गूळ पूर्णपणे विरघळतो.
३) बनावट आणि कठोरतेची टेस्ट
गुळाची बनावट ही त्याच्या शुद्धतेचा संकेत देते. शुद्ध गूळ हलका मुलायम आणि सहजपणे तुटणारा व सोबतच थोडा चिकट असतो. तेच भेसळयुक्त गूळ जास्त कठोर असू शकतो कारण यात इतर रसायन मिक्स केले जातात.
४) सल्फरची टेस्ट
गूळ आकर्षक दिसावा यासाठी आणि शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी सल्फरचा वापर केला जातो. याची टेस्ट करण्यासाठी गुळाचा तुकडा पाण्यात टाका आणि त्यात थोडं हायड्रोक्लोरिक अॅसिडचे काही थेंब टाका. जर फेस किंवा बुडबुडे तयार होत असतील तर हा सल्फर टाकल्याचा संकेत असू शकतो.
५) चव आणि गंध
शुद्ध गुळाची चव गोड असते आणि त्यातून मातीचा हलका सुगंधही येतो. जर गुळाची चव अधिक गोड, रासायनिक किंवा तिखट लागत असेल तर त्यात भेसळ आहे.
६) वितळण्याची टेस्ट
शुद्ध गूळ गरम केल्यावर समान रूपाने वितळतो आणि घट्ट होतो. भेसळयुक्त गूळ वितळल्यावर साखरेचे दाणे किंवा अवशेष राहतात.
FSSAI चा सल्ला
FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण नुसार, शुद्ध गूळ नेहमी गर्द रंगाचा असतो. बाजारात मिळणाऱ्या पिवळ्या गुळापासून दूर रहा. भेसळ केल्यानं गुळातील पोषक तत्व नष्ट होतात आणि आरोग्याचं नुकसानही होतं.