Lokmat Sakhi >Food > मुलांचे वजन वाढत नाही म्हणून काळजी वाटते? ३ गोष्टी करा, मुले होतील स्ट्राँग-भूकही वाढेल

मुलांचे वजन वाढत नाही म्हणून काळजी वाटते? ३ गोष्टी करा, मुले होतील स्ट्राँग-भूकही वाढेल

How to Increase Appetite Of Children : मुलांना द्रवपदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करण्याचा सल्ला द्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 01:05 PM2024-07-31T13:05:46+5:302024-07-31T13:07:50+5:30

How to Increase Appetite Of Children : मुलांना द्रवपदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करण्याचा सल्ला द्या.

How to Increase Appetite Of Children Experts Tells Tips To Increase Appetite In Kids | मुलांचे वजन वाढत नाही म्हणून काळजी वाटते? ३ गोष्टी करा, मुले होतील स्ट्राँग-भूकही वाढेल

मुलांचे वजन वाढत नाही म्हणून काळजी वाटते? ३ गोष्टी करा, मुले होतील स्ट्राँग-भूकही वाढेल

मुलांसाठी  (Kids) असं म्हटलं जातं की त्यांची भूक चिमण्यांसारखी असते. मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांना जास्त भूक लागते पण त्यांचा खुराक खूपच कमी असतो. वाढत्या वयात मुलांना भूक लागायला हवी. जर तुमच्या मुलाचे वय वर्षापेक्षा जास्त असे तर त्याला भूक लागणं फार गरजचं आहे. (Parenting Tips) मुलांनी वयात येताना जर व्यवस्थित खाल्लं नाही तर त्याच्यात पोषक तत्वांची कमतरता जाणवते आणि पचन बिघडते.

अशा स्थितीत तुम्ही आजी-आजोबांच्या काळातील घरगुती उपाय वापरू शकता. (How to Increase Appetite Of Children) नॅच्युरोपेथी एक्सपर्ट डॉ. प्रियंका त्रिवेदी यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Tips To Increase Appetite In Kids)

मुलांची भूक वाढवण्यासाठी घरगुती उपाय

१) पाण्यात जीरं पावडर  घालून प्या

जर मुलांना भूक कमी लागत असेल तर त्यांना पाण्यात जीरं घालून देऊ सकतात. हा उपाय करण्यासठी तुम्हाला जीरं भाजून घ्यावं लागेल त्यानंतर पावडर तयार करावी लागेल. अर्धा ग्लास पाण्यात २ चुटकी जीरं पावडर घालून २ चुटकी काळं मीठ घाला. ज्याचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येईल. हा उपाय तुम्ही लंच आणि डिनरच्यावेळी करू शकता. जीरं आणि काळं मीठ दोन्ही पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरते. या उपायाने पोटात तयार होणारं एसिड कमी होईल ज्यामुळे मुलांना भूक लागेल जीरं आणि काळं मीठ गॅस एसिडीटीचा त्रास कमी करेल.

२) बडिशेप आणि खडिसाखर

मुलांची भूक वाढवण्यासाठी बडिशेप आणि खडीसाखरेचे सेवन फायदेशीर ठरते. या दोन्हींचे मिश्रण लिव्हरमधील उष्णता शांत करते. बडिशेप आणि खडीसाखर थंड असते. याच्या सेवनाने प्राकृतिक स्वरूपात भूक वाढते. जेवल्यानंतर तुम्ही याचे सेवन करू शकता. ज्यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होईल.

३) बेलाचे सरबत

उष्णतेपासून बचावासाठी तुम्ही बेलाचे सरबत मुलांना देऊ शकता. बेलाचे सरबत थंड असते. ज्याच्या सेवनाने मुलांची भूक वाढते. ज्यामुळे पोटही थंड राहते. मुलांच्या रोजच्या आहारात तुम्ही बेलाचे सरबत एड करू शकता. 


'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

१) मुलांची भूक वाढवण्यासाठी त्यांच्या डाएटमध्ये जास्तीतजास्त फायबर्सचा समावेश करा. यासाठी मुलांच्या डाएटमध्ये भाज्या आणि फळांचा समावेश करा. ज्यामुळे मुलांची पचनक्रिया चांगली राहते आणि मुलांना भूकही वेळेवर राहते.

रोज ताक प्यायल्याने वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात ताक प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो

२) मुलांना द्रवपदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करण्याचा सल्ला द्या. ऊन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्या यामुळे टाळता येतात.

३) मुलांना कोणता ना कोणता व्यायाम किंवा गेम खेळण्याची सवय लावा. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहील आणि मुलांना वेळेवेर भूक लागेल या टिप्समुळे मुलांना नैसर्गिकरित्या भूक लागेल. यानंतरही मुलं ऐकत नसतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.

Web Title: How to Increase Appetite Of Children Experts Tells Tips To Increase Appetite In Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.