Join us  

सफरचंद - बटाटे चिरल्यानंतर काळे पडतात? चमचाभर मिठाचा पाहा सोपा उपाय; फळं राहतील फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2024 2:38 PM

How to Keep Apples and Potatoes from Turning Brown : कापलेलं सफरचंद काळं पडू नये म्हणून १ युक्ति मदत करेल

उत्तम आरोग्यासाठी फळं खाण्याचा सल्ला दिला जातो (Kitchen Hacks). फळं खाण्याचे अनेक फायदे आहेत. फळं खाल्ल्याने शरीराला पौष्टिक घटक मिळतात. फळांमध्ये लोक जास्त प्रमाणात सफरचंद खातात (Fruits and Vegetables). पण सफरचंद चिरल्यानंतर काही वेळाने ते काळं पडल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेलच.

सफरचंदचा बदलेला रंग पाहून अनेकजण खाण्यासही टाळतात.  कितीही चांगल्या क्वॉलिटीचा सफरचंद विकत आणले तरी, त्याला काही वेळाने भुरका रंग येऊ लागतो. पण यामागचं आपल्याला कारण ठाऊक आहे का?(How to Keep Apples and Potatoes from Turning Brown).

श्री श्री रवीशंकर सांगतात, 'हा' पौष्टिक पदार्थ खा; तूप घालून खाल्ल्याने वाढते दुप्पट ताकद..

सफरचंद चिरल्यानंतर त्याचा संपर्क ऑक्सिजनसोबत येतो आणि त्यातून एन्जाइम रिलीज होतात. आणि सफरचंद ऑक्सिफाइड होऊ लागतात. जर चिरल्यानंतर सफरचंद काळपट पडू नये असं वाटत असेल तर, एक जबरदस्त ट्रिक वापरुन पाहा. या टीपमुळे सफरचंद काळपट पडणार नाही.

चिरल्यानंतर सफरचंद काळपट पडू नये म्हणून..

- सफरचंद ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यामुळे ते अधिक काळपट पडू लागतात. यासाठी सफरचंद ऑक्सिजनच्या संपर्कात येण्यापासून रोखणे गरजेच आहे.

- यासाठी एक स्पेशल युक्ति आपल्याला मदत करू शकेल. सर्वात आधी एका बाउलमध्ये बर्फ घ्या. त्यात थंड पाणी घाला. आता त्यात चमचाभर मीठ घालून मिसळा. नंतर त्यात सफरचंद किंवा इतर फळे चिरून घाला. ५ ते ७ मिनिटांसाठी त्याच पाण्यात सफरचंद ठेवा.

ऐन तारुण्यात हाडं ठणठणकतात? रोज खा १ पौष्टिक लाडू; गुडघेदुखी विसराल - केसही होतील दाट

- ५ मिनिटानंतर सफरचंदाचे तुकडे टॉवेलमध्ये काढून पुसून घ्या, आणि टिफिन बॉक्समध्ये भरून ठेवा. या ट्रिकमुळे सफरचंदाचे तुकडे काळपट पडणार नाही.

-  खारट पाणी सफरचंदांना ऑक्सिडायझिंग होण्यापासून रोखेल. आणि त्याची चवही बदलणार नाही. फळे कोणतीही असोत, या ट्रिकमुळे भाज्या आणि फळे काळपट पडणार नाहीत.

- आपण आंबट ज्यूसचा देखील वापर करू शकता. यासाठी कापलेल्या सफरचंदवर लिंबाचा रस किंवा संत्र्याचा रस टाकू शकता. यामुळे फळे काळे पडणार नाहीत. 

टॅग्स :किचन टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.