Join us  

केळी आणल्यानंतर एका दिवसात नरम- काळी पडतात? ३ ट्रिक्स, आठवडाभर ताजी राहतील केळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 2:59 PM

How To Keep Banana Fresh Longer : उपवासाच्या दिवसांत केळ्याची मागणी फारच वाढते. नवरात्रीच्या दिवसांतही केळी भरपूर खरेदी केली जातात.

केळी (Banana) एक असं फळ आहे जे प्रत्येक भारतीय घरामध्ये खाल्ले जाते. केळ्यात अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे लोक नाश्त्यासाठी केळ्यांचे सेवन करतात. ज्यामुळे शरीराला इंस्टंट एनर्जी मिळते. असं  म्हटलं जातं की नाश्त्याला २ केळी खाल्ल्यानं संपूर्ण दिवस शरीराला एनर्जी मिळते. उपवासाच्या दिवसांत केळ्याची मागणी फारच वाढते. नवरात्रीच्या दिवसांतही केळी भरपूर खरेदी केली जातात. (How To Keep Banana Fresh Longer Knows 5 Easy And Simple Tips)

केळी घरी आणल्यानंतर काळी पडतात अशी अनेकांची तक्रार असते. डिमांड वाढल्यानंतर लोक महागडी केळीसुद्धा विकत घेतात. पण रात्री आणलेली केळी  सकाळपर्यंत काळी झाली, नरम पडली तर चिडचिड होते. कारण पैसे खर्च करून केळी आणल्यानंतर खराब झाली तर चिडचिड होते. केळी  खराब होऊ नयेत, जास्तवेळ चांगली-ताजी राहावीत यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. 

केळी फ्रिजमध्ये कधी ठेवावीत?

बाजारातून केळी आणताना तुम्ही कशी केळी निवडता याकडे लक्ष द्या. केळी डाग लागलेली असतील तर ती घेऊ नका. जर तुम्ही त्याच दिवशी खाणार असाल तर अशी केळी घेऊ शकता. केळ्याचा रंग आणि आकार यावरून कळतं की केळी किती दिवस फ्रेश राहतील. जर केळी थोडी कच्ची असतील तर थेट फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. २ दिवस किचनमध्ये ठेवू शकता.

वरचे दात पिवळे-आतून किड लागली? दात घास १ छोटा बदल करा, मोत्यांसारखे चमकतील दात 

केळ्याचे टोक कव्हर करा

रिअल सिंपल. कॉमनुसार केळी फ्रेश ठेवण्यासाठी झाकून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण सर्व केळी एका ठिकाणी झाकून ठेवण्यापेक्षा वेगवेगळे  स्टोअर करून ठेवा.  केळीच्या वरच्या टोकाला प्लास्टीकने रॅप करा. ही ट्रिक फॉलो केल्यास केळी दीर्घकाळ चांगले राहतील आणि केळ्यांवर काळे डाग पडणार नाहीत.

खोकून खोकून छाती दुखते-कफ कमीच होत नाही? १ घरगुती उपाय- फुफ्फुसं होतील साफ

व्हिनेगर

केळी लवकर खराब होऊ नये यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी भरून त्यात काही चमचे व्हिनेगर मिसळा. नंतर यात केळी घालून  नंतर केळी बाजूला ठेवा. या ट्रिकने केळी दीर्घकाळ फ्रेश राहण्यास मदत होईल.

ही ट्रिक कामात येईल

व्हिनेगरप्रमाणेच तुम्ही व्हिटामीन सी च्या टॅब्लेटचं पाणीसुद्धा वापरू शकता. यामुळे केळी फ्रेश राहण्यास मदत होईल. यासाठी व्हिटामीन सी ची टॅब्लेट पाण्यात मिसळून ठेवा. ही ट्रिक वापरल्यानंतर केळी लवकर खराब होणार नाहीत. केळी स्टोअर करण्याची ही सोपी पद्धत आहे.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स