Join us  

शिळ्या चपात्याही २ दिवस राहतील मऊ, पीठ मिळताना 'हे' पदार्थ चिमूटभर घाला; परफेक्ट चपातीचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 11:29 AM

How To Keep Chapati Soft Longer (Chapati Making Tips) : दूधासारखी पांढरीशुभ्र चपाती होण्यासाठी पीठ मळताना काही बेसिक गोष्टींची काळजी  घ्यावी लागते.

भारतीय जेवणात चपाती हा फार महत्वाचा पदार्थ आहे. प्रत्येक घरांत चपात्या बनवल्या जातात पण रेसिपी सारखीच असली तरीही चपात्यांचा आकार, चव ही प्रत्येक घरांत वेगवेगळी असते. (Homemade Soft Chapati) चपात्या नरम होत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. (Cooking Tips) दूधासारखी पांढरीशुभ्र चपाती होण्यासाठी पीठ मळताना काही बेसिक गोष्टींची काळजी  घ्यावी लागते. अनेकदा प्रयत्न करूनही चपात्या परफेक्ट बनत नसतील तर  चपातीचं पीठ मळताना काही सोप्या टिप्स फॉलो करा ज्यामुळे चपाती गोल, परफेक्ट होतील. (What Is The Secret To Making Soft Chapatis)

चपातीचं पीठ मळताना या २ गोष्टींची काळजी घ्या (What Is The Best Way Of Cooking Chapati)

चपाती परफेक्ट असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. चपाती परफेक्ट होण्यासाठी गव्हाच्या पीठात मैदा, दूध, तेल आणि मीठ हे पदार्थ मिसळायला हवेत.  हे सर्व पदार्थ एकत्र करून  घट्ट पीठ मळून घ्या. चपाती पांढरीशुभ्र होण्यासाठी पीठ योग्य पद्धतीने मळणं फार महत्वाचे आहे.

ना सोडा, ना इनो - ३ मिनिटांत घरीच करा परफेक्ट ढोकळा; मऊ-फुललेल्या ढोकळ्याची सोपी रेसिपी

यासाठी एक मोठा बाऊल घ्या. त्यात १ वाटी गव्हाचे पीठ घाला. त्यानंतर बाऊलमध्ये १ वाटी मैदा घाला त्यानंतर हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या.  चपातीच्या पीठात १ चमचा तेल आणि चुटकीभर मीठ घालून मिसळा. त्यानंतर कोमट पाणी आणि थोडं दूध घालून पीठ मळून घ्या. पीठ सॉफ्ट असेल याची काळजी घ्या. 

दूधाचा वापर करा

तुम्ही पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर करता त्याचप्रमाणे दूधाचाही वापर करू शकता. पीठ तयार झाल्यानंतर  जवळपास १५ मिनिटांसाठी झाकून वेगळं ठेवून द्या. ज्यामुळे पीठ व्यवस्थित सेट होईल. त्यानंतर पीठ पुन्हा मळून घ्या. नंतर एका नॉनस्टिक तव्याला मध्यम आचेवर ठेवून गरम करण्यासाठी ठेवा. नंतर एक नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करून ठेवा. त्यानंतर चपातीचे गोळे तोडून चपात्या लाटून घ्या.

कंबर दुखते-शरीरात कॅल्शियमच कमी? रोज ५ पदार्थ खा, मिळेल भरपूर कॅल्शियम, हाडं मजबूत

चपाती जास्त जाड किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर गरम तव्यावर चपाती घालून शेकून घ्या. काही वेळानंतर चपाती उलटी करून दुसऱ्या बाजूने शेकून घ्या. त्यानंतर चपाती तव्यावर खाली उतरवून घ्या आणि हळूहळू गॅसची फ्लेम तसंच ठेवून दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. एक, एक करून चपात्या शेकून घ्या. ज्यामुळे परफेक्ट चपाती तयार होईल.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न