भारतीय घरांमध्ये चपाती (Roti) हमखास खाल्ली जाते (Chapati). काही जण चपाती, पोळी किंवा रोटी म्हणतात. गव्हाच्या पिठाची पोळी खाल्ल्याने पोट गच्च भरते. शिवाय आरोग्याला पोषणही मिळते (Cooking Tips). मऊ - लुसलुशीत पोळी आवडीची भाजी असेल तर, आपण १ एक्स्ट्रा पोळी खातो (Food). पण पोळ्या दिवसभर मऊ राहत नाहीत. त्या कडक होतात, किंवा वातड होतात.
मऊ पोळ्या करण्यासाठी आपण कणिक सॉफ्ट तयार करतो. पण तरीही लंच ब्रेकपर्यंत पोळ्या कडक होतात. सकाळी केलेल्या पोळ्या कडक आणि वातड होत असतील तर, पोळ्या करताना ४ टिप्स लक्षात ठेवा. अगदी काही मिनिटात मऊ पोळ्या तयार होतील. शिवाय दिवसभरही फ्रेश आणि मऊ राहतील(How to keep chapatis soft for several hours).
पोळ्या करताना लक्षात ठेवा ४ टिप्स; चपाती होतील मऊ
बर्फाच्या पाण्याने कणिक मळून घ्या
पोळ्या जास्त वेळ फ्रेश आणि कडक होऊ नये असं वाटत असेल तर, थंड पाण्याचा वापर करा. यासाठी एका मोठ्या भांड्यात थंड पाणी घ्या. त्यात बर्फाचे ६ - ७ तुकडे घाला. नंतर एका परातीत चाळून गव्हाचं पीठ घ्या. त्यात बर्फाचं पाणी घालून कणिक मळून घ्या. आणि कणकेच्या मऊ पोळ्या लाटून - शेकून घ्या. पोळ्या दिवसभर मऊ राहतील.
साबुदाणा भिजत न घालता कुरकुरीत चकली करा इन्स्टंट; फक्त १५ मिनिटात उपवासाची चकली रेडी
पीठ चाळून घ्या
चपात्या नेहमी जाड आणि कडक होत असतील तर, कणिक मळताना पीठ चाळून घ्या. खडबडीत पिठामुळे कणिक व्यवस्थित मळून तयार होत नाही. ज्यामुळे पोळ्या कडक होतात. त्यामुळे कणिक मळताना नेहमी पीठ चाळून घ्यावे.
कोमट पाण्यात मीठ घालून कणिक मळून घ्या
कोमट पाण्यात मीठ घालून कणिक मळून घ्या. यामुळे चपात्या बऱ्याच वेळ मऊ आणि फ्रेश राहतील. जेव्हा आपण कणिक मळतो, तेव्हा त्यात थोडं तूपही घाला. कणिक मळून झाल्यानंतर १० - १५ मिनिटांसाठी सेट करण्यासाठी ठेवा. यामुळे चपात्या मऊ होतील.
रोप वाढते पण गुलाबाची फुलंच येत नाही? कांदा - लसणाचा ' असा ' करा वापर; फुले येतील भरपूर
ॲल्युमिनियम फॉईल
चपात्या झाल्यानंतर ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवा. यामुळे पोळ्या लवकर कडक होणार नाहीत. शिवाय अधिक वेळ मऊ राहतील.