Lokmat Sakhi >Food > कोथिंबीर निवडायला वेळ नाही, खूप कंटाळा येतो? १ सोपी ट्रिक- आठवडाभर राहील कोथिंबीर फ्रेश

कोथिंबीर निवडायला वेळ नाही, खूप कंटाळा येतो? १ सोपी ट्रिक- आठवडाभर राहील कोथिंबीर फ्रेश

How To Keep Coriander Fresh For Long: कोथिंबीर निवडत बसण्याचा कंटाळा येत असेल तर ही एक सोपी ट्रिक करा. (simple hack for the storage of green dhaniya)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 12:15 PM2024-06-13T12:15:52+5:302024-06-13T18:35:07+5:30

How To Keep Coriander Fresh For Long: कोथिंबीर निवडत बसण्याचा कंटाळा येत असेल तर ही एक सोपी ट्रिक करा. (simple hack for the storage of green dhaniya)

how to keep coriander fresh for long, simple hack for the storage of green dhaniya | कोथिंबीर निवडायला वेळ नाही, खूप कंटाळा येतो? १ सोपी ट्रिक- आठवडाभर राहील कोथिंबीर फ्रेश

कोथिंबीर निवडायला वेळ नाही, खूप कंटाळा येतो? १ सोपी ट्रिक- आठवडाभर राहील कोथिंबीर फ्रेश

Highlightsअगदी आठवडाभर तरी ती अगदी फ्रेश राहील. पुदिना आणि अन्य पालेभाज्यांसाठीही हा उपाय करून पाहू शकता. 

पालेभाज्या आपण मोठ्या हौशीने घेतो. पण त्या निवडत बसायला हल्ली कोणाला वेळच नसतो. त्यामुळे बऱ्याच जणी मग पालेभाज्या घेणं टाळतात. पण कोथिंबीरीच्या बाबतीत मात्र तसं करता येत नाही. कारण भाजी, वरण, कोशिंबीर अशा पदार्थांमध्ये जोपर्यंत कोथिंबीरीची छानशी पेरणी होत नाही, तोपर्यंत त्या पदार्थांचा रूप आणि स्वाद दोन्हीही खुलून येत नाही (how to keep coriander fresh for long). त्यामुळे कोथिंबीरीला आपण आपल्या स्वयंपाकातून सहजासहजी वगळू शकत नाही. (simple hack for the storage of green dhaniya)

 

त्यामुळे आपण कोथिंबीर तर घरी घेऊन येतो. पण तिची एकेक काडी घेऊन ती निवडत बसण्याचा जाम कंटाळा येतो. काही जणी खरोखरच खूप बिझी असतात.

 

जेवताना ३ चुका करता म्हणून ते पचत नाही, वेटलॉस करायचा तर वाचा आहारतज्ज्ञांचा 'हा' सल्ला

नोकरी, घर हे सगळं सांभाळताना त्यांना अशी निवडण्याची बारीक कामं करण्यासाठी खरंच वेळ नसतो आणि बऱ्याचदा तर त्यांच्यासोबत मदतीलाही काेणीच नसतं. अशावेळी तुमचं किमान कोथिंबीर निवडण्याचं काम तरी सोपं व्हावं, यासाठी हा एक उपाय करून पाहा. हा उपाय chatorichetna and getmyharvest या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी कोथिंबीरीच्या गड्डीला बांधलेली दोरी सोडून ती मोकळी करून घ्या. यानंतर ती चॉपिंग पॅडवर ठेवा आणि सगळी देठं सुरीने एकदम कापून टाका. देठं काढून टाकल्यानंतर जी कोथिंबीर उरेल ती एका पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये टाकून ठेवा.

गळून गळून केस पातळ झाले? खोबरेल तेलात ३ पदार्थ टाकून लावा- नवे केस भराभर उगवतील

ज्याप्रमाणे आपण फ्लॉवर पॉटमध्ये फुलं सजवतो, त्याप्रमाणे कोथिंबीर पाण्यात टाका. देठं पाण्यात बुडालेली आणि पानं बाहेर अशा पद्धतीने कोथिंबीर ठेवली की त्यावर एक प्लास्टिकची पिशवी टाकून द्या आणि हा ग्लास फ्रिजमध्ये ठेवून द्या. यानंतर तुम्हाला जशी पाहिजे तशी कोथिंबीर काढून तुम्ही वापरू शकता. अगदी आठवडाभर तरी ती अगदी फ्रेश राहील. पुदिना आणि अन्य पालेभाज्यांसाठीही हा उपाय करून पाहू शकता. 


 

Web Title: how to keep coriander fresh for long, simple hack for the storage of green dhaniya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.