Join us  

कढीपत्ता जास्त दिवस हिरवागार- फ्रेश ठेवण्याचे ३ उपाय; सुकला म्हणून कढीपत्ता फेकण्याची वेळच येणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 5:04 PM

How To Store Curry Leaves: कढीपत्त्याची पानं (kadi patta) अधिककाळ फ्रेश टवटवीत ठेवण्यासाठी हे काही उपाय करून बघा..

ठळक मुद्देकढीपत्ता २- ३ दिवसांतच सुकतो, वाळून जातो. म्हणूनच कमीतकमी काही दिवस तरी तो फ्रेश- हिरवागार रहावा, यासाठी या काही टिप्स

वरणापासून ते ढोकळ्यापर्यंत... वेगवेगळ्या पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी आणि चव आणखी खुलविण्यासाठी कढीपत्ता (curry leaves) खूप उपयोगी ठरतो. केवळ पदार्थाला चव आणण्यासाठीच नव्हे तर कढीपत्त्यामध्ये अनेक पोषणमुल्ये असल्यानेही कढीपत्ता रोजच्या आहारात असायलाच पाहिजे, असंही तज्ज्ञ सांगतात. काही जण झाडाचा फ्रेश कढीपत्ता तोडून स्वयंपाकात लगेच वापरतात. पण बऱ्याच जणांकडे ही सुविधा नसते. त्यामुळे एकदा आणलेला कढीपत्ता २- ३ दिवसांतच सुकतो, वाळून जातो. म्हणूनच कमीतकमी काही दिवस तरी तो फ्रेश- हिरवागार रहावा, यासाठी या काही टिप्स (Tips for storing curry leaves) फॉलो करून बघा. 

 

कढीपत्ता अधिक काळ फ्रेश ठेवण्यासाठी...१. बाजारातून जेव्हा आपण कढीपत्ता आणतो, तेव्हा तो त्याच्या मधल्या काडीसोबत तसाच येतो. घरी आणल्यावर सगळ्यात आधी कढीपत्त्याची मधली काडी आणि पानं वेगवेगळी करून टाका. स्वच्छ पाणी शिंपडून पानं धुवून घ्या. त्यानंतर एका सुती कपड्यावर टाकून कढीपत्त्याची पानं पंख्याखाली वाळवून घ्या.

नवरात्री 2022 : ९ दिवस- ९ रंग, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसाल? सेव्ह करा हा कलर चार्ट

२. पानं वाळलेली दिसत असली, तरी पुन्हा एकदा कढीपत्त्याचं प्रत्येक पान सुती कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. आणखी अर्धा तास ती पानं सुकू द्या

 

३. त्यानंतर एका एअर टाईट डब्यात खाली टिश्यू पेपर टाका. त्यावर कढीपत्त्याची पानं ठेवा. वरतून पुन्हा एक टकश्यू पेपर ठेवा आणि हा डबा फ्रिजमध्ये ठेवून द्या. कढीपत्ता अधिक काळ फ्रेश- हिरवागार राहील.

दही की ताक, कुणी काय खावं आणि काय टाळावं, आयुर्वेदतज्ज्ञ सांगत आहेत दही आणि ताक खाण्याचे ५ नियम

४. दुसरा उपाय म्हणजे एअर टाईट डबा नसेल तर कढीपत्त्याची पानं एखाद्या झीप लॉक असणाऱ्या प्लास्टिक बॅगमध्ये ठेवा. प्रत्येकवेळी या बॅगेतून पाने घेताना बॅगचं लॉक व्यवस्थित लागलेलं असेल, याची खात्री करून घ्या.

५. एवढं करून ही कढीपत्त्याची पानं वाळलीच तर ती उन्हात कडक वाळू द्या. नंतर मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करून घ्या. वरण, भाजी, चटणी यांना चव आणण्यासाठी या पावडरचा खूप चांगला वापर करता येतो. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.