Join us  

मूग, मटकी, चवळीला लवकर भुंगा लागतो- किडे होतात? १ सोपा उपाय- कडधान्य चांगलं टिकेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 4:23 PM

How To Keep Food grains Weevil-Free: कोणत्याही कडधान्याला भुंगा लागू नये, म्हणून हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा... (How to store grains properly for long? )

ठळक मुद्देकडधान्य तर खूप लवकर खराब होतं. कडधान्यांमध्ये लगेचच भुंगा पडतो. किडे दिसू लागतात.

बाजारात जाऊन वारंवार खरेदी करणं होत नाही म्हणून वेगवेगळं धान्य, किराण्याचं सामान, डाळी असं सगळं आपण एकदम आणून ठेवतो. पण बऱ्याचदा हे सगळे पदार्थ व्यवस्थित सांभाळून ठेवणं जमलं नाही, तर मग त्यांच्यात किडे होतात. अळ्या पडतात (How to keep foodgrains weevil-free). विशेषत: कडधान्य तर खूप लवकर खराब होतं. कडधान्यांमध्ये लगेचच भुंगा पडतो. किडे दिसू लागतात. अशा पद्धतीने कडधान्य खराब होऊ नये आणि जास्त दिवस टिकावं, यासाठी हा घरगुती उपाय करून पाहा. (How to remove bugs and insects from grain)

कडधान्य जास्त दिवस टिकण्यासाठी उपाय

 

कडधान्य जास्त दिवस टिकण्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयीचा व्हिडिओ thesumptuoussaga या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय अतिशय सोपा असून यासाठी आपल्याला चमचाभर कसूरी मेथी लागणार आहे.

फक्त ५ पदार्थ खा- वय झालं तरी त्वचा सुरकुतणार नाही, त्वचेवरची चमक वाढतच जाईल

साधारण एक किलो कडधान्य असेल तर त्यासाठी १ टेबलस्पून कसूरी मेथी लागेल. कसूरी मेथी एका सुती कपड्यामध्ये टाका आणि तिची छोटी पुरचूंडी तयार करा. बरणीमध्ये पहिले अर्ध धान्य भरा आणि त्यानंतर कसूरी मेथीची पुरचुंडी त्यात टाकून द्या. त्यावरून पुन्हा थोडं धान्य घाला.

१ किलोपेक्षा जास्त कसूरी मेथी असेल तर धान्य भरताना मधेमधे कसूरी मेथीच्या २ ते ३ पुरचुंड्या टाकून ठेवा. यामुळे धान्यामध्ये भुंगा होणार नाही.

 

हे उपायही करून पाहा

१. कडधान्यामध्ये भुंगा होऊ नये म्हणून बरणीमध्ये थोडे हळकूंड टाकून ठेवा. यामुळे हळदीमध्ये असणारे ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्म कडधान्यामध्ये किडे होऊ देत नाहीत.

केस पांढरे झाले, खूप गळतात- वाढही खुंटली? केसांच्या सगळ्या समस्या सोडविणारा १ खास उपाय

२. कडधान्यांमध्ये तेजपान टाकून ठेवल्यानेही धान्याला भुंगा लागत नाही.

३. लवंगदेखील याबाबतीत अतिशय परिणामकारक ठरते. लवंगमुळेही धान्यात किडे होत नाहीत.  

टॅग्स :अन्नस्वच्छता टिप्सकिचन टिप्स