Lokmat Sakhi >Food > लवकर सडू नयेत, शिळ्या होऊन नयेत म्हणून फ्रिजमध्ये भाजी ठेवण्याची पाहा ‘योग्य’ पद्धत; भाज्या राहतील फ्रेश

लवकर सडू नयेत, शिळ्या होऊन नयेत म्हणून फ्रिजमध्ये भाजी ठेवण्याची पाहा ‘योग्य’ पद्धत; भाज्या राहतील फ्रेश

How To Keep Fruits & Veggies Fresh For Longer? Try These Simple Yet Effective Tips & Tricks : भाज्या खराब होऊ नयेत, जास्त काळ फ्रेश राहाव्यात यासाठी काही टिप्स समजून घेऊयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2023 01:24 PM2023-03-04T13:24:20+5:302023-03-04T13:38:17+5:30

How To Keep Fruits & Veggies Fresh For Longer? Try These Simple Yet Effective Tips & Tricks : भाज्या खराब होऊ नयेत, जास्त काळ फ्रेश राहाव्यात यासाठी काही टिप्स समजून घेऊयात.

How To Keep Fruits & Veggies Fresh For Longer? Try These Simple Yet Effective Tips & Tricks | लवकर सडू नयेत, शिळ्या होऊन नयेत म्हणून फ्रिजमध्ये भाजी ठेवण्याची पाहा ‘योग्य’ पद्धत; भाज्या राहतील फ्रेश

लवकर सडू नयेत, शिळ्या होऊन नयेत म्हणून फ्रिजमध्ये भाजी ठेवण्याची पाहा ‘योग्य’ पद्धत; भाज्या राहतील फ्रेश

आपल्यापैकी बरेचजण बाजारांत गेल्यावर आठवडाभर पुरेल इतकी भाजी एकदाच खरेदी करुन आणतात. ही भाजी आपण व्यवस्थित निडवून, स्वच्छ धुवून मग फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवतो. त्यापैकी काही भाज्या या लगेच वापरल्या नाहीत तर खराब होतात. अशा नाशवंत भाज्या आपण पुढील १ ते २ दिवसात लगेच वापरतो. परंतु या भाज्या वापरल्या नाहीत तर खराब होतात. काहीवेळा या भाज्या कितीही व्यवस्थित स्टोअर करुन ठेवल्या तरी काही कालांतराने मऊ पडतात किंवा खराब होतात.

त्याचप्रमाणे काही भाज्या या बाजारातून विकत आणल्यानंतर त्यात काहीवेळा किडी असतात. या किडी कशा काढायच्या हा मोठा प्रश्न आपल्याला पडतो. अशाप्रकारे, आपण आठवडाभर पुरेल इतकी भाजी खरेदी करुन आणली तर त्यांतील काही भाज्या लगेच खराब होतात. या भाज्या खराब होऊ नयेत, जास्त काळ फ्रेश राहाव्यात यासाठी काही टिप्स समजून घेऊयात(How To Keep Fruits & Veggies Fresh For Longer? Try These Simple Yet Effective Tips & Tricks).


नक्की काय उपाय करता येतील ? 

१. हिरवे मटार वापरताना :- हिवाळ्यांच्या सिजनमध्ये बाजारांत मटार मोठ्या प्रामाणात उपलब्ध असतात. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी हे मटार सोलून एका हवाबंद डब्यांत पॅक करुन वर्षभर वापरण्यासाठी स्टोअर करुन ठेवतात. गरम पाण्यांत १ टेबलस्पून साखर, १/२ टेबलस्पून मीठ घालून त्यात हे मटार ३ ते ४ मिनिटांसाठी हलके शिजवून घ्यावेत. त्यानंतर हे मटार भाजी किंवा इतर पदार्थांसाठी वापरायला घ्यावेत. असे केल्याने या मटारचा हिरवागार रंग आणि स्वाद कायम टिकून राहतो. 

२. फ्लॉवर वापरण्याआधी : - बाजारातून विकत आणलेल्या फ्लॉवरचा गड्ड्यामध्ये काहीवेळा किडी असतात. काहीवेळा या किडी फ्लॉवरच्या गड्ड्यामध्ये आत जाऊन लपून बसतात. या किडी आपल्याला कधीकधी डोळ्यांनी नीट दिसत नाहीत. अशावेळी, फ्लॉवरचे छोटे तुकडे करुन हे तुकडे एका भांड्यात घ्यावेत. आता या भांड्यात थोडे गरम पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून मीठ व हळद घालावे. या पाण्यांत फ्लॉवरचे तुकडे किमान १५ मिनिटे भिजत ठेवावेत. असे केल्याने फ्लॉवरच्या आतमध्ये लपून बसलेल्या किडी बाहेर पडतील. यानंतर फ्लॉवर एकदा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून मगच वापरावा. 

३. गाजर मऊ पडल्यास :- आपण बाजारांत भाजी खरेदीला गेल्यावर काही भाज्या एकाचवेळी एकदम विकत आणतो. अशापरिस्थिती, काहीवेळा भाज्या नीट फ्रिजमध्ये ठेवून देखील मऊ पडतात. बहुतेकवेळा आपण बाजारातून गाजर खरेदी करून आणल्यानंतर पुढील १ ते २ दिवसांत त्याचा वापर न केल्यास ते मऊ पडते. यांवर उपाय म्हणून, एका डब्यात पाणी भरुन घ्यावे या पाण्यात ही गाजरं संपूर्ण भिजतील अशी ठेवावीत. मग डब्याचे झाकण लावून डबा फ्रिजमध्ये रेफ्रिजरेट करण्यासाठी ठेवून द्यावा. दर दोन दिवसाआड या डब्यांतील पाणी बदलत राहावे. असे केल्याने गाजर किमान १ आठवडा मऊ न पडता चांगली कडक राहतील. 

४. पालक फ्रेश कसा ठेवावा :- बाजारातून पालक विकत आणल्यानंतर लगेच १ ते २ दिवसांत आपण पालक वापरतो. जर पालक लगेच वापरला गेला नाही तर त्याची पानं मलूल पडतात. या मलूल झालेल्या पालकाच्या पानांची भाजी चवीला देखील फारशी चांगली नाही लागत. पालकाची पाने कायम फ्रेश ठेवण्यासाठी आपण एक सोपा उपाय करू शकतो. एका डब्यात संपूर्णपणे टिश्यू पेपर अंथरुन घ्यावा, आता त्यात पालकची पाने भरून ठेवा व त्यावरून परत अजून एक टिश्यू पेपर लावा. मग डब्याचे झाकण बंद करून हा डबा फ्रिजमध्ये ठेवा. पालकाच्या पानांतील जास्तीचे मॉईश्चर टिश्यू पेपर शोषून घेतो त्यामुळे पालक खराब न होता जास्त काळ टिकतो. 

५. कोथिंबीर फ्रेश कशी ठेवावी :- आपण कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवली तरी काहीवेळा ती मलूल पडते. अशावेळी, एका बाऊलमध्ये थोडे गार पाणी घेऊन त्यात किमान १५ ते २० मिनिटांसाठी ही कोथिंबीर ठेवावी. असे केल्याने कोथिंबीर लगेच ताजीतवानी होईल. असे केल्याने मलूल पडलेली कोथिंबीर फ्रेश व वापरण्यायोग्य होईल.

 

Web Title: How To Keep Fruits & Veggies Fresh For Longer? Try These Simple Yet Effective Tips & Tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.