आपल्या भारतीय थाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांना एक विशेष महत्व आहे. आपल्या रोजच्या जेवणात तोंडी लावायला म्हणून आपण ओली किंवा सुकी अशा दोन्ही प्रकारच्या चटण्या आवडीने खातो. ओल्या चटणीच्या प्रकारात सगळ्यात लोकप्रिय आहे ती आपली नेहमीची हिरवी चटणी. ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर असे जिन्नस वापरुन तयार केलेली हिरवी चटणी एकदम टेस्टी लागते. डोसा,उत्तपा, थालीपीठ, मेदू वडा, कटलेट्स, पराठा, इडली यांसारख्या वेगवेगळ्या पदार्थांसोबत ही हिरवी चटणी खाल्ली जाते. कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी चटणी पुरेशी असते(Tips To Prevent Green Chutney From Turning Black Quickly).
या हिरव्यागार चटणीला छान दाटसरपणा आणि गडद हिरवा रंग आला तरच अशी चटणी खायला अधिक चविष्ट लागते. परंतु काहीवेळा ही चटणी तयार केल्यानंतर थोड्यावेळाने काळी पडते. तिचा गडद हिरवा रंग बदलून हळुहळु काळा होऊ लागतो. यामुळे या चटणीचा रंग बदलल्याने तिच्या चवीत देखील फरक पडतो. काहीवेळा आपण ही हिरवी चटणी एकदम एकाचवेळी बनवून ती किमान आठवडाभर फ्रिजमध्ये स्टोअर (Simple Trick to Retain Green Chutney's Green Colour Even After Storing For Days) करुन ठेवतो. अशावेळी कधी कधी या चटणीचा रंग बदलतो. काही दिवसानंतर ही स्टोअर करुन ठेवलेली चटणी बाहेर काढल्यास तिचा रंग बदलून ती काळपट दिसू लागते. ही हिरवी चटणी (Green Chutney) तयार केल्यावर छान हिरवीगार असते परंतु नंतर हळुहळु तिचा रंग बदलून ती थोडी काळपट होऊ लागते अशावेळी या हिरव्या चटणीचा रंग आहे तसाच छान हिरवागार ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात(How To Keep Green Chutney Green).
हिरवी चटणी काळी का पडते ?
कोणत्याही पदार्थांसोबत खाण्यासाठी आपण हिरवी चटणी तयार करतो. हिरवी चटणी तयार करताना आपण सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात एकत्रित करून घालतो आणि मिक्सर फिरवून ही चटणी तयार करून घेतो. जेव्हा आपण ही चटणी मिक्सरमध्ये वाटून घेतो तेव्हा मिक्सरचे भांडे सारखे फिरुन त्यात उष्णता निर्माण होते आणि याच उष्णतेमुळे भांड तापते. या भांड्याच्या उष्ण तापमानामुळेच भांड्यातील चटणी कालांतराने हिरवीगार न राहता तिचा रंग बदलून काळी पडते.
चटणीचा रंग हिरवागार राहावा यासाठी....
१. कोथिंबीर - पुदिन्याचा असा करा वापर :- ही हिरवीगार चटणी तयार करताना आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस घालतो. या हिरव्या चटणीचा रंग छान हिरवागार यावा म्हणून आपण यात भरपूर कोथिंबीर आणि पुदिना घालतो. कालांतराने चटणीतील कोथिंबीर आणि पुदिना यांचा रंग बदलून चटणी काळी पडते. अशावेळीचटणी तयार करण्यापूर्वी त्यात घालायची कोथिंबीर आणि पुदिना १० ते १५ मिनिटे थंड पाण्यांत भिजत ठेवावा. त्यानंतर चटणीसाठी असा पाण्यात भिजत ठेवलेला पुदिना, कोथिंबीर वापरल्यास चटणी कितीही दिवस स्टोअर करुन ठेवल्यास तिचा रंग बदलून ती काळी पडत नाही. या टिपचा वापर केल्याने चटणीचा रंग आहे तसाच हिरवागार राहतो.
गरम पाण्याच्या किटलीत करा १० मिनिटांत पोडी इडली, पाहा इडलीपात्राशिवाय झटपट इडली करण्याची रेसिपी...
पापडाची चटणी खा, झणझणीत कुरकुरीत सुकी चटणी म्हणजे निव्वळ सुख, तोंडाला येईल चव...
२. मीठ लिंबाचा रस, चिल्ड वॉटर :- चटणी तयार करण्यासाठी सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घेऊन एकदा हलकेच मिक्सर फिरवून घ्यावे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व थोडासा लिंबाचा रस हे दोन्ही जिन्नस एकाचवेळी घालावेत. यासोबतच चटणी पातळ करण्यासाठी आपण त्यात थोडेसे पाणी घालतो. हे पाणी घालताना ते पाणी फ्रिजमधील थंड पाणी घालावे. नॉर्मल साध्या पाण्याचा वापर करु नये. यामुळे चटणी खूप दिवस स्टोअर करुन ठेवली तरीही ती चांगली राहते.याशिवाय तिचा रंग आणि चव देखील आहे तशीच राहते.
३. चटणीत शेव, गाठीया घाला :- चटणी तयार करताना काहीजण त्यात शेंगदाणे घालतात. परंतु चटणीमध्ये आपण शेंगदाण्या ऐवजी नमकीन शेव किंवा गाठिया घालू शकता यामुळे चटणीला चांगले टेक्श्चर येण्यास मदत मिळते. तसेच नमकीन शेव आणि गाठिया घातल्याने चटणीला चांगली टेस्ट येते.
भाज्या लवकर शिळ्या - खराब होऊ नयेत म्हणून पाहा सोपी पद्धत, आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश...