बऱ्याचदा असं होतं की आपण फळं कापतो. पण कापलेली सगळी फळं आपल्याकडून संपत नाहीत. भाज्यांच्या बाबतीतही तसंच होतं. फ्लॉवर, पत्ताकोबी, भोपळा, दोडके अशा प्रकारच्या भाज्या एकदम चिरून आपण त्यांची भाजी करत नाही. त्यामुळे त्यांच्यातला काही भाग कापून आपण फ्रिजमध्ये ठेवून देतो. किंवा इतरही भाज्या आपण चिरतो, पण नंतर लक्षात येतं की एवढं आपल्याला लागणार नाही. त्यामुळे मग उरलेली भाजी आपण फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण बऱ्याचदा असं होतं की फ्रिजमध्ये ठेवूनही या भाज्या किंवा फळं काळी पडतात, सुकून जातात. (how to store left over half cut fruits and vegetables in fridge for long)
म्हणूनच या उरलेल्या भाज्या किंवा फळं योग्य पद्धतीने कशा साठवून ठेवायच्या किंवा त्या भाज्या, फळं फ्रिजमध्ये ठेवण्यापुर्वी काय काळजी घ्यायची ते पाहा.. पण अशा पद्धतीने ठेवलेली भाजी किंवा फळांचे काप ८ ते ९ तासांत वापरून टाका.
१. उरलेल्या भाज्या किंवा फळं तुम्ही एखाद्या एअर टाईट डब्यामध्ये ठेवू शकता. एअरटाईट डबा नसेल तर झिपलॉकची प्लास्टिकची पिशवीदेखील चालेल. पण भाज्या पिशवीत ठेवल्यानंतर एखाद्या स्ट्रॉ च्या मदतीने त्याच्यातली शक्य तेवढी हवा आधी काढून घ्या.
२. ॲल्युमिनियम फॉईलमध्येही तुम्ही उरलेली फळं किंवा भाज्या घालून ते फ्रिजमध्ये ठेवू शकता. यामुळे भाज्या अधिक फ्रेश राहतील.
३. काही भाज्या चिरून ठेवल्या असतील तर त्यावर लिंबू पिळा. त्यानंतर भाजी एकदा हलवून घ्या, जेणेकरून लिंबाचा रस भाजीला सगळीकडे लागेल. त्यानंतर ही भाजी एअरटाईट कंटेनरमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवा.
गोरं होण्याच्या वेडापायी किडनी खराब होऊ शकते, बघा फेअरनेस क्रीम लावण्याचे धोके
४. चिरलेला फ्लॉवर, बटाटा, पत्ताकोबी अशा भाज्या तुम्ही पाण्यात घालूनही फ्रिजमध्ये ठेवू शकता.
५. पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळून भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्या तरी चालेल.