Join us  

फ्रिजरमध्ये स्टोअर करून ठेवलेले आईस्क्रीम कडक होते ? १ भन्नाट ट्रिक, आईस्क्रीम राहील कायम सॉफ्ट, मुलायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2024 3:54 PM

Hack to store Ice Cream the Right Way : How To Keep Ice Cream Soft In The Freezer : फ्रिजरमध्ये स्टोअर केलेले आईस्क्रीम कडक होऊ नये तसेच ते बाहेर काढल्यावर खाण्यायोग्य असावे यासाठीच एक खास टीप...

आईस्क्रीम हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. अनेकांना आईस्क्रीम हा जिव्हाळयाचा विषय वाटतो. आईस्क्रीम... ज्याच्या नावातच आईस आणि क्रिम यांचा समावेश आहे, असा सुंदर गोड क्रिमी पदार्थ कोणाला नाही आवडणार. बहुतेक घरांमध्ये जेवणानंतर काहीतरी गोड खावेसे वाटले की आईस्क्रीम अगदी आवडीने खाल्ले जाते. काहीजणांच्या घरी फ्रिजरमध्ये कायम आईस्क्रीमचा एक तरी डबा ठेवलेलाच असतो. काहीवेळा तर स्लाइस आईस्क्रीम, कोन, कँडी, फॅमेली पॅक, कुल्फी असे अनेक प्रकार आपण फ्रिजरमध्ये स्टोअर करुन ठेवतो. फ्रिजरमध्ये स्टोअर करुन ठेवलेले आईस्क्रीम आपण कधीही काढून खाऊ शकतो(How to Keep Ice Cream Soft in the Freezer).

फ्रिजरमध्ये आईस्क्रीम स्टोर करुन ठेवल्यानंतर आपण ते कधी एकदा खातो असे आपल्याला होते. काहीवेळा तर आपल्याला कंट्रोल होत नाही अशावेळी आपण ते आईस्क्रीम लगेच खाऊन संपावतो. परंतु काहीवेळा फ्रिजरमध्ये स्टोअर करुन ठेवलेले आईस्क्रीम हे बरेच दिवस तसेच आत राहते. फ्रिजरमध्ये स्टोर करुन ठेवलेले हे आईस्क्रीम आपण लगेच तीन ते चार दिवसांत खाऊन संपवले नाही तर ते कडक होते. काहीवेळा तर हे आईस्क्रीम इतके कडक होते की, ते खाण्यासाठी थोडावेळ आधी फ्रिजरमधून बाहेर काढून ठेवावे लागते. जेणेकरुन ते आईस्क्रीम थोडेसे वितळून खाण्यायोग्य होईल. अशावेळी हे फ्रिजरमध्ये (Tips For Storing Ice Cream) ठेवलेले आईस्क्रीम कडक होऊ नये तसेच ते फ्रिजरमधून काढल्यानंतर लगेच खाण्यायोग्य असावे यासाठी आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करुन हे आईस्क्रीम आहे तसेच सॉफ्ट, मुलायम ठेवू शकतो(How To Keep Ice Cream Soft In The Freezer). 

फ्रिजरमध्ये स्टोअर करुन ठेवलेले आईस्क्रीम कडक झाले तर... 

फ्रिजरमध्ये डब्यात स्टोर करून ठेवलेले आईस्क्रीम बरेच दिवस खाल्ले नाही तर ते कडक होते. अशावेळी हे कडक आईस्क्रीम नीट खाता येत नाही. त्याचबरोबर खूप दिवस फ्रिजरमध्ये स्टोर करुन ठेवल्याने हे आईस्क्रीम कडक होऊन त्याची चव देखील बदलते. असे होऊ नये म्हणून आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करून आपण आईस्क्रीम आहे तसेच सॉफ्ट, मुलायम ठेवू शकतो. 

फ्रिजरमध्ये आईस्क्रीमचा डबा स्टोअर करुन ठेवताना तो एका झिप - लॉक बॅगमध्ये व्यवस्थित स्टोअर करुन ठेवावा. झिप - लॉक बॅगमध्ये आईस्क्रीम स्टोअर करुन ठेवल्याने आईस्क्रीमचे टेक्श्चर आहे तसेच मुलायम, सॉफ्ट राहण्यास मदत मिळते. कोणत्याही प्रकारचे आईस्क्रीम असो ते आईस्क्रीम तुम्ही झिप - लॉक बॅगमध्ये स्टोअर करुन ठेवल्याने त्या आईस्क्रीम मध्ये बर्फाचे खडे तयार होत नाही.

त्याचबरोबर आईस्क्रीम कडक होत नाही. अशाप्रकारे आईस्क्रीम स्टोअर करून ठेवल्याने आपण कधीही ते फ्रिजमधून काढून खाऊ शकता. या ट्रिकचा वापर केल्याने आपल्याला आईस्क्रीम खाण्याआधी ती नॉर्मल होण्यासाठी बाहेर काढून ठेवावी लागणार नाही.

काहीतरी गोड खावेसे वाटते,  सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगते, १ सोपी रेसिपी - गोड आणि पौष्टीक...

टॅग्स :अन्नकिचन टिप्स