Join us  

मेथीचा थेपला दोन-तीन दिवसांनीही मऊ राहण्यासाठी ६ टिप्स- थेपला राहील मऊ-लुसलुशीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2024 11:07 AM

How to keep methi thepla soft for long : How to store thepla for a long time : थेपला शिळा झाला तरी मऊच राहावा म्हणून खास टिप्स.

सकाळच्या नाश्त्याला आपण शक्यतो उपमा, पोहे, इडली, डोसा, मेदू वडा असे अनेक पदार्थ खूप आवडीने खातो. परंतु काहीवेळा असे पदार्थ रोज रोज खाऊन आपल्याला त्याचा कंटाळा येतो अशावेळी आपण नवीन काहीतरी म्ह्णून वेगवेगळ्या प्रकारचे थेपले करतो. 'थेपला' (Methi Thepla) हा गुजरातचा एक खास पारंपरिक पदार्थ आहे. गुजरातचा हा आवडता पदार्थ आता देशातील इतर राज्यांमध्येही तितक्याच आवडीने खाल्ला जातो. गव्हाचे पीठ, काही मसाले आणि मेथीची पाने किंवा पालक यांसारख्या वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करुन 'थेपला' तयार केला जातो. 'थेपला' हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे(How To Make Soft Methi Thepla).

मेथीच्या थेपल्यामध्ये मेथी भरपूर प्रमाणांत घालून हा पौष्टीक थेपला तयार केला जातो. थेपला हा तसा झटपट होणारा आणि चवीला अगदी सुंदर लागणारा साधासोपा पदार्थ आहे. थेपला तयार करण्याची रेसिपी जरी सोपी असली तरीही काहीवेळा हा थेपला तयार करताना अगदी मऊ, लुसलुशीत असतो. परंतु थोड्यावेळाने हाच थेपला कडक किंवा वातड होतो. असा कडक किंवा वातड थेपला खायला कुणालाच आवडत नाही. आपल्यापैकी अनेक गृहिणींना थेपला तयार करताना या छोट्याश्या समस्येला सामोरे जावे लागत असेल. थेपला तयार करताना तो थोड्यावेळाने कडक किंवा वातड होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. एकदा थेपला तयार केल्यानंतर तो दिवसभरात कधीही खाल्ला तरी तितकाच मऊ आणि सॉफ्ट राहावा म्हणून काही खास टिप्स लक्षात ठेवूयात(How to keep methi thepla soft for long).

मेथीचा थेपला तयार केल्यानंतर थोड्यावेळाने कडक किंवा वातड होतो ? 

१. मेथीचा थेपला तयार करताना त्यासाठी कणीक मळून घेताना त्यात अर्धा कप दही आणि २ टेबलस्पून तेलाचे मोहन घालावे. पीठ मळताना त्यात तेलाचे प्रमाण हे योग्य मापातच ठेवावे. थेपल्यांसाठीची कणीक मळताना जर तेलाचे प्रमाण जास्त झाले तरी देखील थेपले कडक किंवा वातड होतात. 

२. थेपल्यांसाठीची कणीक मळून घेताना आपण चपातीसाठी जशी मऊ, मुलायम कणीक मळतो तशीच कणीक मळून घ्यावी. त्याचबरोबर थेपल्यांसाठीची कणीक मळून झाल्यानंतर हे कणीक किमान अर्धा तास तरी झाकून ठेवावे. त्यामुळे कणीक व्यवस्थित भिजण्यास मदत होते, यामुळे थेपले कडक किंवा वातड होत नाहीत. 

फक्त १ कप सीताफळाचा गर वापरून १० मिनिटांत करा सीताफळ फ्रुट क्रिम, मुलांसाठी खास पदार्थ...

३. त्यानंतर थेपला लाटताना तो जाड होईल असा न लाटता एकदम पातळ थेपला लाटावा. 

४. थेपला तव्यावर भाजताना गॅस चुकूनही मंद आचेवर ठेवू नका. गॅस मंद आचेवर ठेवून थेपला भाजल्यास थेपला दीर्घकाळानंतर कडक किंवा वातड होतो. त्यामुळे कायम थेपला भाजताना गॅसची आच मोठी करूनच भाजावा.   

इडलीच्या पिठाचे करा खमंग - खुसखुशीत बटाटेवडे फक्त १० मिनिटांत!  पाहा साधीसोपी भन्नाट रेसिपी... 

५. जेव्हा तुम्ही थेपला लाटता, तेव्हा ते व्यवस्थित लाटणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. कधीकधी आपण ते लाटताना खूप दबाव आणतो. तथापि, आपण असे करणे टाळावे, यामुळे थेपला कडक होऊ शकतो. 

६. जर तुम्हाला मऊ थेपले बनवायचे असतील तर पीठ मळताना पाण्याच्या तापमानाची काळजी घ्या. थंड पाण्याऐवजी कोमट पाणी वापरणे चांगले. गरम पाणी पिठात असलेले ग्लूटेन अ‍ॅक्टिव्ह करण्यास मदत करते. हे पीठ अधिक लवचिक बनवते आणि परिणामी थेपला मऊ होतो.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स