Lokmat Sakhi >Food > १ सोपा उपाय- कुकरचं गॅस्केट वर्षानुवर्षे टिकेल, खरकटं पाणी बाहेर येऊन झाकण खराबही होणार नाही

१ सोपा उपाय- कुकरचं गॅस्केट वर्षानुवर्षे टिकेल, खरकटं पाणी बाहेर येऊन झाकण खराबही होणार नाही

How To Keep Pressure Cooker Lid Clean While Cooking: कुकरचं पाणी बाहेर येऊन झाकण खराब होत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2024 03:16 PM2024-01-06T15:16:10+5:302024-01-06T15:18:24+5:30

How To Keep Pressure Cooker Lid Clean While Cooking: कुकरचं पाणी बाहेर येऊन झाकण खराब होत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...

How to keep pressure cooker lid clean while cooking? How to increase the life of cooker gasket? | १ सोपा उपाय- कुकरचं गॅस्केट वर्षानुवर्षे टिकेल, खरकटं पाणी बाहेर येऊन झाकण खराबही होणार नाही

१ सोपा उपाय- कुकरचं गॅस्केट वर्षानुवर्षे टिकेल, खरकटं पाणी बाहेर येऊन झाकण खराबही होणार नाही

Highlightsहा उपाय केल्यामुळे कुकरमधून खरकटं पाणी तर बाहेर येणार नाहीच, पण गॅस्केटही खराब होणार नाही.

काही जणींची ही नेहमीची अडचण असते की कुकर लावलं की शिट्टी होताच त्यातून पाणी बाहेर येतं. मग कुकरमध्ये वरण- भात, पुरण, भाजी असं काहीही असलं तरी शिट्टी होताच पाणी बाहेर येतं. कुकरमधून पाणी बाहेर आलं की कुकरचं झाकण तर खराब होतंच, पण ते पाणी बऱ्याचदा गॅसवर, ओट्यावर सांडतं आणि मग सगळाच पसारा होतो. ही अडचण कायमची सोडवायची असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा (How to keep pressure cooker lid clean while cooking?). हा उपाय केल्यामुळे कुकरमधून खरकटं पाणी तर बाहेर येणार नाहीच, पण गॅस्केटही खराब होणार नाही. (How to increase the life of cooker gasket?)

 

कुकरचं गॅस्केट म्हणजे कुकरच्या झाकणाला असणारं रबर. जर हे रबर खराब झालं तर कुकर व्यवस्थित प्रेशर धरत नाही. त्यामुळे मग कुकरची शिट्टी नीट होत नाही, शिवाय अन्न चांगलं शिजायलाही अडचणी येतात.

बाटल्यांमध्ये झाडं लावण्याची 'ही' बघा एकदम वेगळी पद्धत- हिरव्यागार चेंडूंनी फुलून जाईल बाग

म्हणूनच कुकरचं गॅस्केटही चांगलं राहणं गरजेचं आहे. अनेक घरांमध्ये कुकरचं गॅस्केट वारंवार खराब होतं. तुमच्याही गॅस्केटच्या बाबतीत असं होत असेल तर हा उपाय तुमच्याही कामी येऊ शकताे. हा सोपा उपाय manjumittalcookeryhouse या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. कुकर लावण्याआधी झाकणाचं जे गॅस्केट किंवा रबर आहे, त्याला व्यवस्थित तेल लावून घ्या. एवढं एकच काम केलं तरीही शिट्टी होताच कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही. शिवाय गॅस्केटही वर्षानुवर्षे खराब होणार नाही. 

 

हा उपायही करून पाहा

शिट्टी होताच कुकरमधून पाणी येत असेल तर कदाचित तुमच्या पदार्थामध्ये पाणी खूप जास्त झालं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकदा पदार्थांमध्ये तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी घालताय का, हे तपासून पाहा.

ग्रीन चिली सॉस विकत आणण्यापेक्षा घरीच तयार करा- ही घ्या कुणाल कपूर यांची सोपी रेसिपी

कुकर नेहमी खूप मोठा गॅस करून ठेवलं तरीही कुकरमधून शिट्टी होताच पाणी बाहेर येऊ शकतं. त्यामुळे शेगडीच्या आचेमध्येही थोडा बदल करून पाहा. 


 

Web Title: How to keep pressure cooker lid clean while cooking? How to increase the life of cooker gasket?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.