रोजच्या जेवणात प्रत्येकाच्याच घरी चपात्या, भाकऱ्या असे पदार्थ बनवले जातात. चपात्या केल्यानंतर त्या ताज्या मऊ राहाव्यात यासाठी चपातीच्या डब्यात ठेवल्या जातात. (Perfect Chapati Kashi Karaychi) एकावर एक चपात्या ठेवून झाकण लावले जाते. अशावेळी वाफेने चपात्या ओल्या होण्याची शक्यता असते. चपात्या खराब होऊ नयेत यासाठी काही सोप्या किचन ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर तुमचं काम सोपं होऊ शकतं. (How to keep roti soft for long time)
आपण गरम भांड ठेवण्यासाठी जे स्टॅण्ड वापरतो ते सॅण्ड चपातीच्या डब्यात ठेवा. (What is the secret to making soft chapatis) नंतर त्यावर डायरेक्ट चपात्या ठेवा. यामुळे चपात्यांना लागणारी वाफ थेट खाली जाईल आणि चपात्या ओल्या होणार नाहीत. हवंतर तुम्ही तुम्ही चपात्यांच्या डब्यात स्टॅण्ड ठेवल्यानंतर त्यावर त्यावर गोलाकार कापड ठेवून त्यात चपात्या ठेवा. यामुळे चपात्या राहतील आणि ओल्या होणार नाहीत. (Simple Method to Prevent The Chapati From Getting Wet)
चपात्या मऊ होण्यासाठी काय करायचं?
काहीजण चपातीचं पीठ मळताना त्यात मीठ आणि तेल घालतात. यामुळे चपातीला मऊ,रुचकर चव येते. चपातीची चव दुप्पटीने वाढते. चपाती मऊ होण्यासाठी तुम्ही त्यात तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता. यामुळे चपात्या दीर्घकाळ सॉफ्ट राहतील. तेलाऐवजी तुपाचा वापर केल्याने पीठ मऊ राहील आणि चपात्या कडक होणार नाहीत. तेलाऐवजी तुपाचा वापर आरोग्यासाठी उत्तम मानला जातो.
चपाती काळी होऊ नये म्हणून काय करावं?
जर चपात्या शेकताना काळ्या पडत असतील तर चपातीवर लागलेलं एक्स्ट्रा पीठ झटकून मगच शेका, चपाती जास्तवेळ लाटून उघड्यावर ठेवू नका, जास्त हवा लागल्याने चपात्या काळ्या पडतात आणि शेकल्यानंतर त्या जास्त काळ्या दिसतात.चपाती मऊ राहण्याासाठी व्यवस्थित चाळून मगच पीठ मळा.
थंडीत इडलीचे पीठ अजिबात फुगत नाही? १ ट्रिक, पीठ फुगेल मस्त, करा हलक्या पांढऱ्याशुभ्र इडल्या
जर तुम्ही व्यवस्थित चाळले नाही तर चपात्या कडक बनू शकतात. पीठ मळताना हळूहळू पाणी घाला. एकत्र पाणी घातल्यामुळे कणीक जास्त पातळ होऊ शकते. जर तुम्ही चपातीचं पीठ मळताना त्यात तूप घालायला विसरला असाल तर वरून तूपाचा हात लावून एका सुती, पातळ कापडाने कणीक झाकून ठेवा.