Join us  

सॅण्डविचसाठी केलेली हिरवी चटणी लगेच काळी पडते? १ सिक्रेट पदार्थ टाका, चटणी राहील हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2023 7:23 PM

Why Does Green Chutney Turn Black?: सॅण्डविचसाठी केलेली हिरवीगार चटणी काही तासांतच काळी पडते. असं होऊ नये म्हणून काय करायचं, यासाठी बघा हा एक सोपा उपाय...

ठळक मुद्देसॅण्डविचसाठी केलेली हिरवी चटणी फक्त ५ ते ६ तासच नाही तर अगदी महिनाभर हिरवीगार आणि फ्रेश रहावी, यासाठी हा एक खास उपाय करून बघा..

घरी जेव्हा आपण सॅण्डविचचा बेत करतो, तेव्हा जवळपास सगळ्यांनाच येणारी एकसारखी अडचण म्हणजे सॅण्डविचची चटणी लगेच काळी पडते. सुरुवातीला अगदी एक ते दिड तासच ती चटणी फ्रेश हिरवीगार दिसते (How to stop green chutney from getting black). आणि त्यानंतर मात्र ती काळी पडू लागते. याउलट आपण हॉटेलमध्ये जाऊन केव्हाही सॅण्डविच खाल्लं तरी तिथली चटणी मात्र कायम हिरवीगार दिसते. चटणीचा हिरवेपणा आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी ते नेमके काय करत असावेत, असा प्रश्न मग मनात डोकावतोच. त्याच प्रश्नाचं उत्तर आता आपण जाणून घेऊया (Why Does Green Chutney Turn Black?)....

 

सॅण्डविचसाठी केलेली हिरवी चटणी काळी पडू नये म्हणून उपाय१. सॅण्डविचसाठी केलेली हिरवी चटणी फक्त ५ ते ६ तासच नाही तर अगदी महिनाभर हिरवीगार आणि फ्रेश रहावी, यासाठी हा एक खास उपाय करून बघा..

हात- पाय खूपच काळपट दिसतात? फक्त १० रुपयांत करा एक खास उपाय- हातापायांवर येईल चमक

२. बर्फ वापरून आपल्याचा चटणीचा हिरवेपणा आणि ताजेपणा टिकवता येतो. पण त्याचा अचूक वापर करता यायला हवा...

३. यासाठी तुम्ही तुमच्या नेहमीच्या पद्धतीने हिरवी चटणी करून घ्या. मात्र चटणी जेव्हा मिक्सरमधून फिरवाल, तेव्हा त्यात बर्फाचे ३ ते ४ तुकडे मात्र अवश्य टाका.

 

४. यानंतर चटणी बर्फाच्या ट्रेमध्ये टाका आणि ते ७ ते ८ तास फ्रिजरमध्ये ठेवून त्याचे आईस क्यूब करून घ्या. जसा वापर करायचा असेल, तसे हे चटणीचे आईस क्यूब काढा आणि वापरा.

गंजलेल्या नळापासून कळकट कपड्यांपर्यंत, सगळं घरच होईल चकाचक- वापरा १ खास पदार्थ

६ ते ७ तास बाहेर ठेवले तरीही चटणी काळी पडणार नाही. तसेच हे आईस क्यूब एका एअर टाईट डब्यात ठेवून फ्रिजरमध्ये ठेवल्यास ते महिनाभर टिकू शकतात. 

 

टॅग्स :अन्नपाककृती 2023कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स