प्रत्येकाच्या घरात साखर असतेच. अनेकांना गोड खायला आवडते. पदार्थातील गोडवा वाढवण्यासाठी साखर लागतेच. काहींना जेवण झाल्यानंतर साखर का असेना गोड खायला लागतेच. काही लोकं वर्षभर पुरेल असं साखर साठवून ठेवतात. पण काही वेळेला साखरेला मुंग्या लागतात.
घरात कुठल्यातरी कोपऱ्यात जरी गोड पदार्थ पडला असेल तर, त्या ठिकाणी रांगेने मुंग्या लागतात. साखरेच्या डब्याभोवती साखर पडली असेल तर, त्याच्या भोवती किंवा डब्याला मुंग्या लागतातच. साखरेला मुंग्या लागल्या की काय करावं हे सुचत नाही. मुंग्यांमुळे साखर खराब होते. जर डब्याभोवती व साखरेला मुंग्या लागल्या असतील तर हे काही टिप्स फॉलो करा. या टिप्समुळे साखरेला मुंग्या लागणार नाही(How to keep sugar safe from ants).
मुंग्यांना साखरेपासून दूर ठेवण्यासाठी उपाय
लवंग
एका छोट्या डब्यात लवंग ठेवा, हा डबा साखरेच्या डब्यात ठेवा. यामुळे मुंग्या साखरेच्या डब्याला लागणार नाही. किंवा आपण लवंगाची पावडर करून डब्याच्या भोवतीने शिंपडा. यामुळे डब्याजवळ मुंग्या फिरकणार नाही. ही पावडर दर ३ ते ४ दिवसांनी साफ करा, व नवीन पावडर शिंपडा.
आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून ४ टिप्स, रस दिसेल पिवळाजर्द-चवही राहील परफेक्ट
ओली हळद
मुंग्यांना साखरेपासून दूर ठेवण्यासाठी आपण ओल्या हळदीचा वापर करू शकता. ओल्या हळदीचे काही तुकडे साखरेच्या कंटेनरमध्ये ठेवा. साखरेच्या भांड्यात ओल्या हळदीचे तुकडे ठेवल्याने, मुंग्या डब्याजवळ येत नाही. हळदीचा सुगंध बराच काळ साखरेच्या डब्यात राहतो, हळदीच्या गरम प्रभावामुळे मुंग्या डब्याजवळ येत नाही.
लिंबाची साल
सर्वप्रथम, लिंबाची साल उन्हामध्ये सुकवून घ्या. ज्यामुळे त्यातून लिंबाचा रस निघणार नाही. आता ही साल साखरेच्या डब्यात ठेवा. लिंबाच्या सालीच्या उग्र गंधामुळे मुंग्या डब्याजवळ येणार नाही.
भेंडी करताना चिकट होते? चिपचिपित भेंडीमुळे चव बिघडते? ८ टिप्स, क्रिस्पी होईल भेंडी
वेलची
मोठी वेलची बाजारात सहज मिळते. डब्याजवळ मुंग्या येत असतील तर, साखरेच्या डब्यात दोन ते तीन अख्खी वेलची ठेवा. यामुळे डब्याजवळ मुंग्या येणार नाही.
दालचिनी
मुंग्यांना साखरेपासून दूर ठेवण्यासाठी दालचिनी उपयुक्त ठरेल. मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी ज्या प्रकारे आपण साखरेच्या भांड्यात मोठी वेलची ठेवतो, त्याचप्रमाणे दालचिनी साखरेच्या डब्यात ठेवा. याच्या उग्र गंधामुळे मुंग्या डब्याजवळ फिरकणार नाही.
कलिंगड नैसर्गिक पद्धतीने पिकवले आहे की केमिकलने, कसे ओळखाल? ३ टिप्स - निवडा रसाळ कलिंगड
तमालपत्र
मुंग्यांना साखरेपासून दूर ठेवण्यासाठी आपण तमालपत्राचाही वापर करू शकता. लवंग, हळद आणि दालचिनी प्रमाणेच तमालपत्रातही नैसर्गिकरीत्या सुगंध असते, जे मुंग्यांना साखरेजवळ येण्यापासून रोखते. यासाठी ३ ते ४ तमालपत्र साखरेच्या डब्यात ठेवा.