Join us  

उन्हाळ्यात बाटलीतील पाणी जास्त वेळ थंड ठेवण्यासाठी १ सोपी ट्रिक... पाणी राहील गारेगार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2023 12:52 PM

How To Keep Your Water Cool In Summers Without A Fridge : उन्हात बाटली तापून पाणी गरम होतंय? बाटलीतील पाणी जास्त काळासाठी थंड ठेवण्यासाठी सोपा उपाय...

उन्हाळ्यांत शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी पाण्याची विशेष गरज असते. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे जीव नकोसा होतो. गरम्यामुळे अंगाची लाही लाही होते. जसजसा उन्हाळा वाढतो तसतसे आपल्याला जास्तीत जास्त पाणी प्यावेसे वाटते. उन्हाळ्यात आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे फारच गरजेचे असते. उन्हाळ्यात शक्यतो उन्हाळामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्याला वेगळे आजार उद्भवू शकतात. 

उहाळ्यात कडक, रणरणत्या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण फळांचे रस, सरबत, पाणी असे द्रव पदार्थ जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करतो. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे आपल्याला सातत्याने तहान लागत रहाते. आपले शरीर सतत पाण्याची मागणी करत राहते. उन्हातून आल्यानंतर किंवा गरमी वाढली की आपण फ्रिजमधील किंवा माठातील थंड पाणी पिणेच पसंत करतो. उन्हाळा सुरू झाला की थंड पाणी पिण्याची क्रेझ वाढत असते. थंड पाणी प्यायल्याने आपली तहान भागते. उन्हाळ्यात आपण सहसा घराबाहेर पडताना फ्रिजमधील थंड पाण्याची बाटली घेऊनच बाहेर पडतो. परंतु काहीवेळा बाहेर पडल्यानंतर उष्णतेमुळे हे पाणी थंड राहत नाही. उष्णतेमुळे हे पाणी गरम होते. अशावेळी हे गरम झालेले पाणी आपल्याला प्यायची इच्छा होत नाही. अशा परिस्थितीत बाटलीमधील पाणी बराच काळ थंड ठेवण्यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर करुन पाहावा(How To Keep Your Water Cool In Summers Without A Fridge).

उन्हाळ्यात बाटलीतील पाणी दिर्घकाळासाठी थंड ठेवण्यासाठी नेमकं काय करता येईल ?

१. सर्वप्रथम एक रिकामी बाटली घ्यावी. 

२. ही बाटली पाण्याने अर्धी भरुन घ्यावी. 

३. बाटली पाण्याने अर्धी भरुन झाल्यानंतर बाटली एका बाजूला झुकवून आडवी करावी. 

४. बाटली अशी आडवी करुन मगच ती बाटली फ्रिजरमध्ये ठेवावी. ही बाटली आडवी केल्याने त्यातील पाणी बाटलीच्या एका बाजूला जमा होईल. व बाटली अशाच स्थितीत फ्रिजरमध्ये ठेवल्यास जेवढे पाणी बाटलीत आहे त्याचा जमून बर्फ तयार होईल. 

सचिन तेंडुलकर करतो तशी ‘स्पेशल आंबा कुल्फी’ यंदा नक्की करुन पाहा, अशी कुल्फी तुम्ही खाल्ली नसेल...

प्या गारेगार कोकोनट मँगो मिल्कशेक, उन्हाळा सुसह्य करणारी रेसिपी - हॉटेलपेक्षा भारी चव...

५. ही बाटली फ्रिजरमध्ये ६ ते ७ तासांसाठी किंवा बाटलीमध्ये बर्फ जमेपर्यंत तशीच ठेवून द्यावी. 

६. आता जेव्हा कधी उन्हात तुम्ही घराबाहेर पडणार आहात, त्या आधी ही बॉटल फ्रिजरमधून काढून घ्यावी, बॉटल फ्रिजरमधून बाहेर काढल्यानंतर त्या बाटलीच्या अर्ध्या भागात साचलेला बर्फ असेल व उरलेला अर्धा भाग रिकामी असेल. 

७. आता बाटलीच्या अर्ध्या उरलेल्या भागात पाणी भरुन घ्यावे. 

८. आता तुमच्या बाटलीच्या अर्ध्या भागात बर्फ व अर्ध्या भागात पाणी असेल. असे केल्यामुळे बाटलीत असलेल्या बर्फामुळे पाणी जास्त काळासाठी थंड रहाते.

हा झटपट सोपा उपाय करुन आपण आपल्या बाटलीमधील पाणी अधिक काळासाठी थंडगार ठेवू शकतो.

टॅग्स :अन्न